
मेट्रो मार्गिका 7 (गुंदवली –ओवरीपाडा) ला मेट्रो मार्गिका 9 (पहिला टप्पा – दहिसर पूर्व ते काशीगाव) शी जोडण्याच्या कामासाठी आवश्यक प्रणाली एकत्रीकरण आणि सुरक्षा चाचण्या हाती घेण्यात येत आहेत. या कारणामुळे 12 ते 18 ऑक्टोबर 2025 या कालावधीत मेट्रो मार्गिका 2A(दहिसर पूर्व–डी.एन. नगर) व मेट्रो मार्गिका 7 या दोन्ही मार्गांवरील सकाळच्या मेट्रो सेवा नेहमीपेक्षा थोड्या उशिरा सुरू होणार आहेत.
ही तात्पुरती वेळापत्रकातील सुधारणा ‘लाल मार्गिका विस्तार’ या प्रकल्पातील एक महत्त्वाचा टप्पा असून, अंधेरी (पूर्व) ते मिरा-भाईंदर दरम्यान अखंड व सुसंगत प्रवासासाठी अत्यावश्यक आहे. सध्या मेट्रो मार्गिका 7 वर 13 स्थानकांदरम्यान सेवा सुरू असून, मार्गिका 7 ची विस्तारित मार्गिका 9 चे काम अंतिम टप्प्यात आहे. RDSO ची तपासणी २३ सप्टेंबर २०२५ रोजी यशस्वीरीत्या पूर्ण झाली असून, Independent Safety Assessor (ISA) चाचण्या आणि ट्रायल रन सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर गुंदवली ते काशीगाव (लाईन 9) दरम्यान ट्रायल रन घेण्यात येतील. त्यामुळे सकाळी 5.25वाजता सुरू होणाऱ्या मेट्रो सेवात खालीलप्रमाणे सुधारित वेळापत्रक लागू राहील:
डहाणूकरवाडीहून गुंदवली कडे पहिली मेट्रो सोमवार ते शुक्रवार सकाळी 7:01 वाजता सुटणार आहे. तसेच शनिवारी सकाळी 7:00 वाजता आणि रविवारी सकाळी 7:04 वाजता सुटणार आहे. अंधेरी पश्चिमकडे जाणारी पहिली मेट्रो सोमवार ते शुक्रवार – सकाळी 7:06 वाजता, शनिवारी सकाळी 6:58 वाजता आणि रविवारी सकाळी 6:59 वाजता सुटणाक आहे.
दहिसर पूर्वहून अंधेरी पश्चिमकडे पहिली मेट्रो सोमवार ते शुक्रवार सकाळी 6:58 वाजता, शनिवारी सकाळी 7:02 वाजता आणि रविवारी सकाळी 7:02 वाजता सुटणार आहे. गुंदवलीकडे कडे पहिली मेट्रो सोमवार ते शुक्रवार सकाळी 6:58 वाजता, शनिवारी सकाळी 7:06 वाजता आणि रविवारी सकाळी 7:01 वाजता सुटणार आहे.
अंधेरी पश्चिमहून गुंदवलीकडे पहिली मेट्रो सोमवार ते शुक्रवार सकाळी 7:01 वाजता शनिवारी सकाळी 7:02 वाजता, रविवारी सकाळी 7:04 वाजता सुटणार आहे. गुंदवलीहून पहिली मेट्रो अंधेरी पश्चिमकडे जाणारी पहिली मेट्रो सोमवार ते शुक्रवार सकाळी 7:06 वाजता, शनिवारी सकाळी 7:02 वाजता रविवारी सकाळी 7:00 वाजता सुटणार आहे.
प्रवाशांनी प्रवासाचे नियोजन करताना MumbaiOne (मुंबई वन)ॲप, महा मुंबई मेट्रोचे चे अधिकृत सोशल मीडिया हँडल्स व स्थानकावरील माहिती फलक यांवर उपलब्ध अद्ययावत वेळापत्रक तपासावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
महा मुंबई मेट्रो तर्फे सर्व प्रवाशांच्या सहकार्याबद्दल मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात येत असून, हे प्रणाली एकत्रीकरण आणि सुरक्षा चाचण्या मेट्रो मार्गिका 9 (पहिला टप्पा) कार्यान्वयनाच्या दिशेने एक महत्त्वाचा टप्पा आहेत. लवकरच गुंदवली ते मिरा गाव दरम्यान थेट, सुसंगत आणि अखंड मेट्रो सेवा उपलब्ध होणार असून, पश्चिम उपनगरांतील प्रवास अधिक जलद आणि सोयीस्कर होणार आहे.