मुंबई महापालिकेचा हलगर्जीपणा, रुग्णालयात ऑक्सिजन प्लांट उभारण्यास दुर्लक्ष

| Updated on: Apr 18, 2021 | 11:00 AM

या घटनेमुळे कोट्यवधी रुपयांचा अर्थसंकल्प असलेल्या महापालिकेची सर्वच स्तरावर बदनामी होत आहे. (BMC neglect oxygen plant setup in hospital)

मुंबई महापालिकेचा हलगर्जीपणा, रुग्णालयात ऑक्सिजन प्लांट उभारण्यास दुर्लक्ष
मुंबईकरांना तिसऱ्या लाटेचा धोका? इमारत सील होणार, कुणालाही प्रवेश नाही, वाचा पालिका आयुक्तांचे निर्देश
Follow us on

मुंबई : राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहेत. त्यामुळे ठिकठिकाणी ऑक्सिजन, रेमडेसिव्हीरसह इतर औषधांचा तुटवडा जाणवत आहेत. मुंबईसह राज्यातील रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनच्या पुरवठ्याचा तुटवडा निर्माण झाल्याच्या तक्रारी येत आहेत. तर दुसरीकडे ऑक्सिजन प्लांट उभारायला महापालिकेकडूनच दुर्लक्ष झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.  (Mumbai BMC neglect to set up an oxygen plant in the hospital)

प्रस्तावावर आरोग्य विभागाचे अधिकारी अडून 

गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील वाढत्या रुग्णसंख्येमुळे रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे हजारो नातेवाईक तक्रारी करत आहेत. मुंबईतील बोरिवलीमधील भगवती रुग्णालय आणि गोवंडीतील पंडित मदनमोहन मालवीय रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन साठा संपला आहे. त्यामुळे रुग्णांना चक्क कोविड सेंटरमध्ये हलवण्यात आले आहे. पण मुंबई महापालिकेच्या 16 उपनगरीय रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन प्लांट बसवण्याचा प्रस्तावाच्या फाईलवर आरोग्य विभागाचे अधिकारी अडून राहिले आहेत.

महापालिकेची सर्वच स्तरावर बदनामी

गेल्या वर्षभरापासून सर्व उपनगरीय रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन प्लांट बसवण्याची मागणी होत आहे.पण याकडे आरोग्य विभागाचे अधिकारी दुर्लक्ष करत आहेत. या अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे दोन उपनगरीय रुग्णालयांमधील रुग्णांना ऑक्सिजन अभावी अन्य कोविड केंद्रात हलवण्याची नामुष्की महापालिकेवर आली आहे. या घटनेमुळे कोट्यवधी रुपयांचा अर्थसंकल्प असलेल्या महापालिकेची सर्वच स्तरावर बदनामी होत आहे.

केवळ 12 कोटींचा खर्च करणे कठीण जाते का?

मुंबई महापालिकेच्या विशेष रुग्णालयांपैकी कस्तुरबा रुग्णालय आणि जोगेश्वरी ट्रामा केअर रुग्णालयात ऑक्सिजन प्लांट बसवण्यात आले आहेत. याच धर्तीवर उर्वरीत 16 उपनगरीय रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन प्लांट बसवण्याचा निर्णय गेल्या वर्षांपासून प्रलंबित आहे. महापालिका आयुक्तांकडून हे प्लांट बसवण्यास मंजुरीही देण्यात आलेली आहे.

या एका ऑक्सिजन प्लांटच्या उभारणीसाठी सुमारे 70 लाख रुपयांचा खर्च येत आहे. त्यामुळे सुमारे 39 हजार कोटींचा अर्थसंकल्प असलेल्या मुंबई महापालिकेला केवळ 12 कोटींचा खर्च करणे कठीण जाते का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

16 महापालिका रुग्णालयाचा प्रस्ताव तयार 

सध्या वांद्रे भाभा, कुर्ला भाभा, व्ही.एन.देसाई रुग्णालय, गोरेगाव सिध्दार्थ रुग्णालय, एस.के. पाटील रुग्णालय, मालाड एम.व्ही.देसाई रुग्णालय, बोरीवली भगवती रुग्णालय, बोरीवली कस्तुरबा रुग्णालय, कांदिवली डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय, चेंबूर माँ रुग्णालय, घाटकोपर राजावाडी रुग्णालय, घाटकोपर संत मुक्ताबाई रुगाालय,  विक्रोळी महात्मा ज्योतिबा फुले रुग्णालय, मुलुंड एम.टी. अगरवाल, मुलुंड स्वातंत्र्यवीर सावरकर रुग्णालय इत्यादी उपनगरीय 16 महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये कोविडच्या पार्श्वभूमीवर ऑक्सिजन प्लांट उभारला जावा, असा प्रस्ताव तयार करण्यात आला होता.   (Mumbai BMC neglect to set up an oxygen plant in the hospital)

संबंधित बातम्या : 

मुंबईत ऑक्सिजनचा तुटवडा, बीएमसीच्या 6 रुग्णालयांमधील 168 कोरोना रुग्ण सुरक्षित ठिकाणी हलवले

वरळी कोळीवाड्याला पुन्हा कोरोनाचा विळखा, 197 जण बाधित