मुंबईत ऑक्सिजनचा तुटवडा, बीएमसीच्या 6 रुग्णालयांमधील 168 कोरोना रुग्ण सुरक्षित ठिकाणी हलवले

मुंबईत ऑक्सिजनचा तुटवडा, बीएमसीच्या 6 रुग्णालयांमधील 168 कोरोना रुग्ण सुरक्षित ठिकाणी हलवले
मुंबईत लॉकडाऊनच्या हालचालींना वेग

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या 6 रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनची कमतरता पडल्याने 168 रुग्णांना प्राणवायू उपलब्ध असलेल्या इतर कोविड रुग्णालय किंवा कोविड केंद्रांमध्ये सुरक्षितरित्या स्थलांतरीत करण्यात आलेय.

प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

|

Apr 17, 2021 | 11:04 PM

मुंबई : कोविड बाधित रुग्णांची संख्या संपूर्ण देशात वाढली आहे. त्यामुळे रुग्णांना प्राणवायू (ऑक्सिजन) पुरवठा करण्याची गरज मोठ्या प्रमाणावर निर्माण झालीय. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या 6 रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनची कमतरता पडल्याने 168 रुग्णांना प्राणवायू उपलब्ध असलेल्या इतर कोविड रुग्णालय किंवा कोविड केंद्रांमध्ये सुरक्षितरित्या स्थलांतरीत करण्यात आलेय. प्राणवायू पुरवठा सुरळीत राहण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेकडूनही प्रयत्न सुरु आहेत (BMC shifted 168 corona patient due to shortage of Oxygen in Mumbai).

दरम्यान, मुंबई महानगरपालिका हद्दीतील सर्व 24 प्रशासकीय विभागात प्राणवायू पुरवठा सुरळीत राखण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. यासाठी अन्न व औषध प्रशासन तसेच प्राणवायू उत्पादक आणि संबंधित सहायक आयुक्त यांच्यासमवेत समन्वय साधण्यासाठी महानगरपालिकेच्या वतीने 6 समन्वय अधिकारी नुकतेच नियुक्त करण्यात आले. हे समन्वय अधिकारी 24×7 या स्वरुपात कार्यरत राहणार आहेत. यामुळे प्राणवायू पुरवठ्याबाबतची अडचण लागलीच निकाली निघण्यास मोलाची मदत होत आहे. भविष्यातही प्राणवायू पुरवठा संबंधी अशी कोणतीही अडचण उद्भवणार नाही, याची पूर्ण खबरदारी महानगरपालिका प्रशासनाने घेतली आहे.

कोरोना रुग्णांची संख्या वाढल्याने ऑक्सिजनची गरज वाढली

“मुंबई व महाराष्ट्रसह संपूर्ण देशात कोरोना बाधित रुग्णांची संख्या अलीकडे मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. कोरोना संसर्ग बाधितांना वैद्यकीय उपचार देताना प्राणवायू अर्थात ऑक्सिजन पुरविण्याची गरज स्वाभाविकच वाढली आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयांमध्ये तसेच समर्पित कोविड आरोग्य केंद्रामध्ये प्राणवायू असलेल्या रुग्णशय्या (बेड्स) उपलब्ध आहेत. संपूर्ण महाराष्ट्र राज्यात ऑक्सिजन वितरण करताना शासकीय यंत्रणेवर प्रचंड ताण येतो आहे. अशा स्थितीत बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयांमध्ये जिथे प्राणवायूची पुरेशी व्यवस्था आहे अशा सुरक्षित ठिकाणी संसर्ग बाधितांना स्थलांतरित करण्यात येत आहे, जेणेकरून कोणतीही अडचण उद्भवू नये,” अशी माहिती बीएमसीने दिलीय.

‘या’ 6 रुग्णालयातील कोरोना रुग्ण सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित

महानगरपालिकेच्या वांद्रे स्थित भाभा रुग्णालय, कुर्ला स्थिती भाभा रुग्णालय, बोरिवलीतील भगवती रुग्णालय, गोवंडी येथील शताब्दी रुग्णालय, मुलुंड येथील एम. टी. अग्रवाल रुग्णालय, जोगेश्वरीतील ट्रॉमा रुग्णालय या 6 रुग्णालयातील एकूण 168 रुग्णांना इतर रुग्णालये/समर्पित कोविड आरोग्य केंद्रात सुरक्षितपणे स्थलांतरित करण्यात आले आहे.

प्राणवायू उपलब्धतेसह कोविड बाधितांची आवश्यक काळजी घेतल्याचा बीएमसीचा दावा

मुंबईच्या महापौर किशोरी किशोर पेडणेकर, सर्व पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधी तसेच महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांच्यासह सर्व अतिरिक्त आयुक्त परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. तसेच सक्रियपणे यंत्रणेला मार्गदर्शन करत आहेत. रुग्ण व्यवस्थापन करण्यासाठी सर्व सहायक आयुक्त आणि त्यांचे सहकारी, संपूर्ण आरोग्य विभाग रात्रंदिवस कार्यरत आहेत. प्राणवायू उपलब्धतेसह कोविड बाधितांची आवश्यक ती सर्व काळजी घेण्यात येत आहे. महानगरपालिका प्रशासन आणि संपूर्ण आरोग्य यंत्रणा सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. सर्व संबंधितांनी प्रशासनास सहकार्य करावे, अशी विनंती बीएमसीने केलीय.

हेही वाचा :

Mumbai Corona | मुंबईत 10 हजार 797 मजले सील, सर्वाधिक मायक्रो कंटेनमेंट झोन कोणत्या वॉर्डमध्ये?

कोरोना कसा आटोक्यात येणार?; मुंबई लोकलमधून दररोज 15 ते 16 लाख लोकांचा प्रवास!

PHOTO | राज्यभर संचारबंदी लागू, कुठं सुनसान तर कुठं वर्दळ; लोकांचा प्रतिसाद कसा ?

व्हिडीओ पाहा :

BMC shifted 168 corona patient due to shortage of Oxygen in Mumbai

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें