वरळी कोळीवाड्याला पुन्हा कोरोनाचा विळखा, 197 जण बाधित

वरळी कोळीवाडा हा पर्यावरण मंत्री अदित्य ठाकरे यांचा मतदार संघ म्हणून देखील ओळखला जातो. (Worli Koliwada 197 corona positive)

वरळी कोळीवाड्याला पुन्हा कोरोनाचा विळखा, 197 जण बाधित
worli corona
Follow us
| Updated on: Apr 18, 2021 | 7:45 AM

मुंबई : राज्यात कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढत चालला आहे. महाराष्ट्रात दररोज 60 हजाराहून अधिक जणांना कोरोनाची लागण होत आहे. देशभरात वरळी पॅटर्न या नावाने ओळखला गेलेल्या वरळी कोळीवाड्याला पुन्हा एकदा कोरोनाचा विळखा बसत आहे. गेल्या काही दिवसात वरळी कोळीवाडा आणि आजूबाजूच्या परिसरात तब्बल 197 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांचा मतदारसंघ पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. (Worli Koliwada 197 people tested corona positive)

वरळी कोळीवाड्यात कोरोनाचा शिरकाव

वरळी कोळीवाड्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा कहर पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसात वरळी कोळीवाडा आणि आसपासच्या परिसरात तब्बल 197 जणांना कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यात वरळी कोळीवाड्यातील 97, जनता कॉलनी 21 आणि आदर्शनगरमध्ये 69 कोरोनाबाधितांचा समावेश आहे.

वरळी कोळीवाडा भागात दाटीवाटीची लोकवस्ती असल्यामुळे या ठिकाणी कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने पसरत आहे. या पार्श्वभूमीवर वरळी कोळीवाड्यातील नगरसेविका हेंमागी वरळीकर यांनी नागरिकांना कोरोनाचे नियम पाळण्याचं आवाहन केले आहे.

पहिल्या लाटेत वरळी कोळीवाडा सील

कोरोनाच्या पहिल्या लाटेत वरळी कोळीवाड्यात कोरोना रूग्ण सापडल्यामुळे हा भाग सील करण्यात आला होता . तब्बल 60 ते 70 दिवस या भागातील नागरिकांना बाहेर न पडण्याच्या सूचना करण्यात आल्या होत्या. वरळी कोळीवाडा सील केल्यानंतर कोविड प्रादुर्भाव रोखण्यासाठी येथे प्रभावी योजना येथे राबवण्यात आल्या होत्या. त्यानंतर याच पॅटर्न पुढे ‘वरळी पँटर्न’ संपू्र्ण देशभरात चर्चिला गेला होता.

केंद्रीय पथकाकडून वरळी कोळीवाडा पॅटर्नचं कौतुक

केंद्रीय पथकाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे वरळी कोळीवाडा पॅटर्नचं कौतुक केलं होतं. कोरोनाची दुसरी लाट संपूर्ण महाराष्ट्रात थैमान घालत असताना दुसरीकडे आता वरळी कोळीवाड्यातही कोरोनाचा शिरकाव झाला आहे. वरळीतील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेदिवस वाढताना पाहायला मिळत आहे. वरळी कोळीवाडा हा पर्यावरण मंत्री अदित्य ठाकरे यांचा मतदार संघ म्हणून देखील ओळखला जातो. त्यामुळे येत्या काळात वरळी कोळीवाडा आणि आसपासची रूग्णसंख्या कमी करण्यासाठी कोणकोणत्या उपाययोजना केल्या जातात, हे पाहणं महत्वाचं ठरेल. (Worli Koliwada 197 people tested corona positive)

काय होता देशात चर्चिला गेलेला ‘वरळी पॅटर्नं ?

1. कोरोनाचे सात आठ रूग्ण सापडल्यानंतर संपूर्ण कोळीवाडा सील करण्यात आला आतील कुठल्याही नागरिकाला वरळी कोळीवाड्याच्या बाहेर जाण्याची परवानगी नव्हती किंवा बाहेरील नागरिकांना आत येण्याची परवानगी नव्हती . तब्बल 60 ते 70 दिवस हा संपूर्ण भाग सील होता

2. अत्यावश्यक सेवेची दुकानही केवळ दोन ते तीन तास खुली करण्यास परवानगी देण्यात आली होती .

3. नागरिकांनी घराच्या बाहेर पडू नये यासाठी सतत स्पीकर व्दारे भागात पोलिसांमार्फत सूचना दिल्या जात होत्या.

4. कोरोना रूग्ण आढळून येणाऱ्या चाळी सील करून त्यांचं लगेच सँनिटायझेशन केलं जात होतं.

5. वरळी कोळीवाड्यात विविध भागात आरोग्य कँम्प आयोजित करण्यात येत होते.

6. घरोघरी जाऊन सर्वांची कोरोनाची तपासणी करण्यात आली (आँक्सिजन, तापमान तपासणी केली)

7. या भागातील ज्येष्ठ नागरिकांची माहिती घेऊन त्यांची तपासणी करणाऱ्यावर भर देण्यात आला.

या सर्व प्रभावी अमलबंजावणीमुळे वरळी कोळीवाड्यात परसलेला कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आला होता. मात्र आता पुन्हा या भागात कोरोनाने डोकं वर काढल्याने नागरिकांकडून चिंता व्यक्त केली जात आहे. (Worli Koliwada 197 people tested corona positive)

संबंधित बातम्या : 

मुंबईत ऑक्सिजनचा तुटवडा, बीएमसीच्या 6 रुग्णालयांमधील 168 कोरोना रुग्ण सुरक्षित ठिकाणी हलवले

मुंबईत अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्या गाड्यांसाठी कलर कोड, नियम मोडणाऱ्यांना कठोर शिक्षा, पोलीस आयुक्तांच्या सूचना

मुंबईची परिस्थिती बिकट, कुंभमेळ्यातून येणाऱ्यांना थेट क्वारंटाईन करणार, किशोरी पेडणेकरांची माहिती

Non Stop LIVE Update
मोदींवरील त्या वक्तव्यावर नवनीत राणांचं स्पष्टीकरण, विरोधकांवर घणाघात
मोदींवरील त्या वक्तव्यावर नवनीत राणांचं स्पष्टीकरण, विरोधकांवर घणाघात.
मशाल आहे की आईस्क्रीमचा..., भाजपच्या बड्या नेत्याची ठाकरे गटाला टोला
मशाल आहे की आईस्क्रीमचा..., भाजपच्या बड्या नेत्याची ठाकरे गटाला टोला.
सासूचे 4 दिवस संपले, आता सूनेचे दिवस...,दादांचा शरद पवारांना खोचक टोला
सासूचे 4 दिवस संपले, आता सूनेचे दिवस...,दादांचा शरद पवारांना खोचक टोला.
गद्दारी करणाऱ्यांना... ओमराजे निंबाळकरांची शिंदेंच्या खासदारावर टीका
गद्दारी करणाऱ्यांना... ओमराजे निंबाळकरांची शिंदेंच्या खासदारावर टीका.
खासदाराच्या प्रचारसभेत आमदाराला आली चक्कर, रुग्णालयात उपचार सुरु
खासदाराच्या प्रचारसभेत आमदाराला आली चक्कर, रुग्णालयात उपचार सुरु.
काँग्रेसचा जाहीरनामा मुस्लिमांना प्राधान्य देणारा? भाजपच्या टीकेवर....
काँग्रेसचा जाहीरनामा मुस्लिमांना प्राधान्य देणारा? भाजपच्या टीकेवर.....
राणेंच्या उमेदवारीवरून धाकधूक, नितेश राणेंचं वक्तव्य; एक दिवस थांबा...
राणेंच्या उमेदवारीवरून धाकधूक, नितेश राणेंचं वक्तव्य; एक दिवस थांबा....
नरेंद्र मोदी खोटारडे... त्यांच्या घोषणा भपंक, राऊतांचा मोदींवर घणाघात
नरेंद्र मोदी खोटारडे... त्यांच्या घोषणा भपंक, राऊतांचा मोदींवर घणाघात.
घड्याळ चिन्हाचं प्रकरण न्यायप्रविष्ट, दादांच्या जाहिरातीत काय म्हटलंय?
घड्याळ चिन्हाचं प्रकरण न्यायप्रविष्ट, दादांच्या जाहिरातीत काय म्हटलंय?.
उन्हाचा तडाखा वाढलाय, मुंबईसह 'या' शहरात उष्णतेची लाट, उन्हाची काहिली
उन्हाचा तडाखा वाढलाय, मुंबईसह 'या' शहरात उष्णतेची लाट, उन्हाची काहिली.