कोव्हिड काळातील रेमडेसिव्हिर घोटाळ्यात आदित्य ठाकरे अडचणीत, निकटवर्तीयाची चौकशी

aditya thackeray | मुंबई महानगरपालिकेच्या ५.९६ कोटी रूपयांच्या रेमडेसिव्हिर खरेदी प्रकरणात मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने चौकशी सुरु केली आहे. या प्रकरणी शिवसेना उबाठा पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय पुण्यशाली उर्फ पुण्य पारेख यांची चौकशी करण्यात आली आहे. बुधवारी सात तास त्यांची चौकशी झाली.

कोव्हिड काळातील रेमडेसिव्हिर घोटाळ्यात आदित्य ठाकरे अडचणीत, निकटवर्तीयाची चौकशी
Follow us
| Updated on: Dec 21, 2023 | 12:10 PM

मुंबई, दि.21 डिसेंबर | मुंबई महापालिकेच्या माध्यमातून ठाकरे परिवाराला घेरण्याची तयारी सरकारने सुरु केली आहे. कोव्हिड काळात दिलेले टेंडर आणि इतर प्रकरणाची चौकशी मुंबई पोलिसांच्या आर्थिक शाखेकडून करण्यात येत आहे. ५.९६ कोटी रूपयांच्या रेमडेसिव्हिर खरेदी प्रकरणात मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने शिवसेना उबाठा पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय पुण्यशाली उर्फ पुण्य पारेख यांची चौकशी सुरु केली आहे. बुधवारी सात तास त्यांची चौकशी झाली. या चौकशीत रेमडेसिव्हिर कंत्राटाबाबत प्रश्न विचारण्यात आले. यामुळे आदित्य ठाकरे यांची अडचण वाढणार आहे.

त्या बैठकीची घेतली माहिती

कोव्हिड काळातील कथित रेमडेसिव्हिर घोटाळा प्रकरणाची चौकशी सुरु झाली. पुण्यशिल पारेख यांची बुधावारी सहा तासांपेक्षा जास्त काळ चौकशी करण्यात आली. कोव्हिड काळात आदित्य ठाकरे यांच्या सामाजिक कार्याच्या टीममध्ये पारेख होते. यासंदर्भात मायलॅन कंपनी सोबत कंत्राटाची चर्चा होत असताना पारेख त्या बैठकीला उपस्थित होते. महापौर बंगल्यावर झालेल्या या बैठकीत पारेख का उपस्थित होते? या टेंडरचा त्यांच्याशी काय संबंध आहे, मुंबई मनपाच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी रेमडेसिव्हिर बाबात त्यांचा सल्ला घेतला का? याबाबत चौकशी झाली. व्यवसायने चार्टड अकाउंटट असलेल्या पारेख यांना या प्रकरणाचा कोणताही लाभ झाला का? याबाबतचे पुरावे मिळाले नाही.

हे सुद्धा वाचा

इतर कंत्राटदार रडारवर

रेमडेसिव्हर प्रकरणात आणखी एक कंत्राटदार कंपनी चौकशी यंत्रणेच्या रडारवर आहे. मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने ५.९६ कोटी रूपयांच्या कथित घोटाळ्याची चौकशी सुरु केली आहे. या प्रकरणात रेमडेसिव्हिरची खरेदी जादा दराने झाल्याचा आरोप आहे. पारखे यांची दुपारी १२ वाजता चौकशी सुरु झाली ती सायंकाळी सातपर्यंत सुरु होती. याप्रकरणी एका महानगरपालिका अधिकाऱ्याचा काही दिवसांपूर्वी जबाब नोंदवला गेला होता. त्यावेळी जबाबात त्या अधिकाऱ्याने रेमडेसिव्हीर कंत्राटाबाबत पारेख यांच्या सहभागाची माहिती दिली होती. त्याची पडताळणी करण्यासाठी पारेख यांची चौकशी झाली.

Non Stop LIVE Update
मुंबईत आज 2 मोठ्या जाहीर सभा, दिग्गज नेते दिसणार एकाच मंचावर
मुंबईत आज 2 मोठ्या जाहीर सभा, दिग्गज नेते दिसणार एकाच मंचावर.
अजितदादा महायुतीच्या प्रचारातून गायब? पुन्हा राजकीय भूकंपाचे संकेत?
अजितदादा महायुतीच्या प्रचारातून गायब? पुन्हा राजकीय भूकंपाचे संकेत?.
युती तुटली, तेव्हा मातोश्रीत नेमकं काय घडलं? उद्धव ठाकरेंचा गौप्यस्फोट
युती तुटली, तेव्हा मातोश्रीत नेमकं काय घडलं? उद्धव ठाकरेंचा गौप्यस्फोट.
बाळासाहेबांच्या खोलीत नेमकी काय चर्चा झाली? उद्धव ठाकरेंचा मोठा खुलासा
बाळासाहेबांच्या खोलीत नेमकी काय चर्चा झाली? उद्धव ठाकरेंचा मोठा खुलासा.
'आताही बॅगा घेऊन आलोय', राऊतांच्या आरोपावर एकनाथ शिंदेंचं उत्तर
'आताही बॅगा घेऊन आलोय', राऊतांच्या आरोपावर एकनाथ शिंदेंचं उत्तर.
मोठी बातमी : नाशिकमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बॅगांची तपासणी
मोठी बातमी : नाशिकमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बॅगांची तपासणी.
Monsoon Update:नागरिकांची उकाड्यापासून सुटका, यंदा मान्सून लवकर धडकणार
Monsoon Update:नागरिकांची उकाड्यापासून सुटका, यंदा मान्सून लवकर धडकणार.
पैसा फेको तमाशा देखो हाच शिंदे गटाचा जाहीरनामा : संजय राऊत
पैसा फेको तमाशा देखो हाच शिंदे गटाचा जाहीरनामा : संजय राऊत.
मोदींच्या कांदा प्रश्नावर शरद पवार यांचं चोख प्रत्युत्तर, म्हणाले...
मोदींच्या कांदा प्रश्नावर शरद पवार यांचं चोख प्रत्युत्तर, म्हणाले....
मोदींनी भर सभेत शिंदेंना उठवलं आणि म्हणाले, तुम्ही जा, मी इथे सांभाळतो
मोदींनी भर सभेत शिंदेंना उठवलं आणि म्हणाले, तुम्ही जा, मी इथे सांभाळतो.