1 हजाराहून अधिक कोविड बाधित महिलांची प्रसूती, मुंबईच्या नायर रुग्णालयाचा आगळावेगळा विक्रम

| Updated on: May 08, 2021 | 1:57 PM

कोरोनाग्रस्त गर्भवती महिलांची यशस्वी प्रसूती करणारं नायर रुग्णालय हे देशातील पहिलं रुग्णालय ठरलं आहे. (Mumbai Nair Hospital Covid Infected delivered babies)

1 हजाराहून अधिक कोविड बाधित महिलांची प्रसूती, मुंबईच्या नायर रुग्णालयाचा आगळावेगळा विक्रम
new born baby
Follow us on

मुंबई : राज्यातील कोरोनाबाधितांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. तर दुसरीकडे मुंबईतील नायर रुग्णालयात आतापर्यंत 1 हजाराहूंन अधिक कोरोनाग्रस्त गर्भवती महिलांची यशस्वीरित्या प्रसूती करण्यात आली आहे. कोरोनाच्या महामारीत इतक्या मोठ्या प्रमाणात कोरोनाग्रस्त गर्भवती महिलांची यशस्वी प्रसूती करणारं नायर रुग्णालय हे देशातील पहिलं रुग्णालय ठरलं आहे. (Mumbai Nair Hospital 1,001 Covid Infected Women successfully delivered babies)

मुंबईतील मुंबई सेंट्रल येथील नायर रुग्णालय हे पालिकेच्या अखत्यारीत येते. कोरोना महामारीच्या काळात या रुग्णालयाचे सर्वात मोठे योगदान राहिले आहे. गेल्या मार्च-एप्रिल महिन्यात कोरोना काळात 1022 कोरोनाग्रस्त गर्भवती महिलांची यशस्वीरित्या प्रसूती करण्यात आली आहे. यात 19 जुळ्या आणि एका तिळ्या चिमुकल्यांचाही समावेश आहे.

विशेष बाब म्हणजे यात जन्माला आलेल्या मुलांना कोरोनाची बाधा झालेली नाही. तसेच ही मुलं आपल्या आईजवळ राहतात. दूध पितात, तरीही त्यांना कोरोनाचे संक्रमण झालेले नाही. त्यामुळे हा चमत्कार असल्याचे बोललं जात आहे.

एका वर्षात 1000 पेक्षा जास्त कोरोनाग्रस्त महिलांची प्रसूती

गेल्या कोरोना लाटेत 750 महिलांची प्रसूती करण्यात आली. दुर्देवाने यातील सात महिलांचा मृत्यू झाला. तर दुसऱ्या लाटेत 250 महिलांची प्रसूती करण्यात आले. दुर्देवाने 20 गर्भवती स्त्रियांचा मुलाला जन्म होण्यापूर्वीच मृत्यू झाला. तरी देखील एका वर्षात 1000 पेक्षा जास्त सुरक्षित प्रसूती करण्यात आली.

दरम्यान आई कोरोनाबाधित असेल तर जन्माना आलेल्या बाळाची कोविड-19 चाचणी करणं बंधनकारक आहे. गेल्या एक वर्षात अनेक बालकं कोरोनाबाधित आढळली, परंतु त्यांच्या कोणतीही लक्षणे नव्हती. या बालकांची चाचणी निगेटिव्ह आल्यानंतरच त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला, असं पालिकेने  पत्रकात म्हटलं आहे.

आदित्य ठाकरेंकडून अभिनंदन 

यानंतर राज्याचे पर्यावरण आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनीही नायर रुग्णालयातील डॉक्टर, नर्स यांच्यासह कर्मचाऱ्यांचं अभिनंदन केलं आहे. गेल्यावर्षी कोरोना काळात कोरोनाग्रस्त महिलांची यशस्वीरित्या प्रसूती केली गेली. त्यामुळे नायर हॉस्पिटलमधील डॉक्टर, मेडिको, नर्स आणि इंटर्न यांना हार्दिक अभिनंदन! असे ट्वीट आदित्य ठाकरेंनी केले आहे.

(Mumbai Nair Hospital 1,001 Covid Infected Women successfully delivered babies)

संबंधित बातम्या : 

मोदी-ठाकरेंची फोनवर चर्चा; 18 वर्षांवरील व्यक्तिंच्या लसीकरणाला गती येणार?

आधी Cowin अ‍ॅपबाबत मुख्यमंत्र्यांचं पत्र, मग पंतप्रधान मोदींचा थेट उद्धव ठाकरेंना फोन

या कोविडयोद्ध्यांना सलाम; नऊ वर्षांच्या मुलीला एकटं घरी ठेवून डॉक्टर आई-बाबा कामावर