AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबईत NCB ची मोठी कारवाई, 1745 कोटींचा कोकीन साठा पकडला, अमित शाहंकडून टीमचं कौतुक

आरोपी महिला पुण्याची राहणारी आहे. मुंबई आणि महाराष्ट्रात पसरलेल्या एका मोठ्या ड्रग रॅकेटमधील ती एक महत्वाचा दुवा असू शकते. पोलिसांनी अश्विनीला टिटवाळ्याच्या पद्मावती रॉयल्स सोसायटीमधून अटक केली.

मुंबईत NCB ची मोठी कारवाई, 1745 कोटींचा कोकीन साठा पकडला, अमित शाहंकडून टीमचं कौतुक
Drugs
| Updated on: May 01, 2026 | 12:37 PM
Share

देशाची आर्थिक राजधानी मुंबईत कोकीनचा मोठा साठा जप्त करण्यात आला आहे. नार्कोटिक्‍स कंट्रोल ब्‍युरोच्या टीमने मिळालेल्या टीपच्या आधारावर ही कारवाई केली. 349 किलोग्रॅम कोकीन जप्त केलं. NCB ने जप्त केलेल्या या कोकीनची बाजारातील अंदाजित किंमत 1775 कोटी आहे. नशेच्या पदार्थाचा इतका मोठा साठा कुठून आला? कोणी आणला? कुठे जाणार होता? हा तपासाचा विषय आहे. कोकीनचा एवढा मोठा साठा पकडल्याने NCB ची टीम सुद्धा चक्रावून गेली आहे. कोकीन जप्तीसह आंतरराष्ट्रीय ड्रग्स रॅकेटचा पर्दाफाश केल्याचा दावा एनसीबीने केला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी या कारवाईसाठी NCB ला शुभेच्छा दिल्या आहेत.

NCB च्या या यशाबद्दल अमित शाह यांनी एक्सवर पोस्ट केली आहे. नशा तस्करी विरोधात कठोर कारवाई सुरु ठेवण्याचा संकल्प बोलून दाखवलाय. त्यांनी एक्सवर लिहिलय की, एनसीबीने मुंबईत मोठी कारवाई केली. 349 किलो हायग्रेड कोकीन जप्त केलं. ज्याची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत 1745 कोटी रुपये आहे. हे ऑपरेशन म्हणजे एजन्सीच्या बॉटम टू टॉप अप्रोचच उदहाण आहे. सरकार ड्रग कार्टेलला मूळापासून संपवण्यासाठी कटिबद्ध असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

पद्मावती रॉयल्स सोसायटीमधून अटक

याआधी मुंबई पोलिसांनी ड्रग तस्करी विरोधात मोठी कारवाई करताना एका पूर्व बार डान्सरला अटक केली होती. पोलिसांनी आरोपीकडून जवळपास 6 कोटी रुपयांच्या 5,000 एमडीएमए (एक्स्टेसी) गोळ्या जप्त केल्या होत्या. अश्विनी पॉल असं अटक केलेल्या महिलेचं नाव आहे. आरोपी महिला पुण्याची राहणारी आहे. मुंबई आणि महाराष्ट्रात पसरलेल्या एका मोठ्या ड्रग रॅकेटमधील ती एक महत्वाचा दुवा असू शकते. पोलिसांनी अश्विनीला टिटवाळ्याच्या पद्मावती रॉयल्स सोसायटीमधून अटक केली. छापेमारी दरम्यान पाच मोबाइल फोन आणि आठ सीम कार्ड पोलिसांनी जप्त केले आहेत. जोडीदार तुरुंगात गेल्यानंतर अश्विनीची या ड्रग व्यवसायात एन्ट्री झाल्याचं प्राथमिक तपासातून समोर आलय.

त्यांच्याकडे 200 गोळ्या सापडलेल्या

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अश्विनीने 2012 साली मुंबईत येऊन डान्स बारमध्ये काम सुरु केलं. वेळेबरोबर तिने पार्टीत ड्रग सप्लाय करायला सुरुवात केली. हळूहळू तिचं नेटवर्क मुंबईसह महाराष्ट्रतील अन्य शहरात पसरलं. खासकरुन कॉलेजला जाणारी मुलं तिच्या रडारवर असायची. एका गोळीसाठी ती 1500 ते 2000 रुपये घ्यायची. या प्रकरणात पोलिसांनी साकीनाका भागातून इरफान अन्सारी आणि सूफियान या दोन आरोपींना अटक केली होती. त्यांच्याकडे 200 गोळ्या सापडलेल्या. त्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारेच पोलीस अश्विनीपर्यंत पोहोचले.

Follow Us
सह्याद्रीवर धुक्याची चादर, दऱ्याखोऱ्यात धबधबे; ‘मिसिंग लिंक’चं हे...
सह्याद्रीवर धुक्याची चादर, दऱ्याखोऱ्यात धबधबे; ‘मिसिंग लिंक’चं हे दृश्य पाहाच!
संजय राऊतांवर अमृता फडणवीस संतापल्या, थेट म्हणाल्या राऊतांसारखं....
संजय राऊतांवर अमृता फडणवीस संतापल्या, थेट म्हणाल्या राऊतांसारखं बरळण्यापेक्षा...
डॉ. डी. वाय. पाटील यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. डी. वाय. पाटील यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
शिवसेना चिन्हाबाबतच्या सुनावणीनंतर शिंदे गटाकडून पहिली प्रतिक्रिया...
शिवसेना चिन्हाबाबतच्या सुनावणीनंतर शिंदे गटाकडून पहिली प्रतिक्रिया समोर, एका वाक्यातच...
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा व्हिडीओ Delete केल्याप्रकरणी
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा व्हिडीओ Delete केल्याप्रकरणी अखेर Metaने मागितली माफी, पहा व्हिडीओ
वाल्मिक कराड पुन्हा चर्चेत, राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या ट्वीटने खळ
Walmik Karad | वाल्मिक कराड पुन्हा चर्चेत, राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या ट्वीटने खळबळ
शिवसेना कुणाची? कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद; शिंदे गट अडचणीत?
शिवसेना कुणाची? कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद; शिंदे गट अडचणीत? सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
शिंदे गटाचे सर्व आमदार अपात्र ठरणार?; सुनावणीनंतर राऊतांचा मोठा दावा
Sanjay Raut On SC Hearing | शिंदे गटाचे सर्व आमदार अपात्र ठरणार?; सुनावणीनंतर संजय राऊतांचा मोठा दावा
शिवसेना कुणाची? जोरदार युक्तावादनंतर आजची सुनावणी संपली, कोर्टात...
शिवसेना कुणाची? जोरदार युक्तावादनंतर आजची सुनावणी संपली, कोर्टात नेमकं काय घडलं?
कुणबी प्रमाणपत्र अवैध, मराठा समाजाच्या... छत्रपती संभाजीनगरातून...
Kunbi Certficate | कुणबी प्रमाणपत्र अवैध, मराठा समाजाच्या... छत्रपती संभाजीनगरातून मोठी अपडेट समोर!