AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

युवकाने स्विमिंग पूलमध्ये मारली उडी, ७२ वर्षीय व्यक्तींवर पडला, मग काय झाले?

Mumbai : २० वर्षीय युवकाला स्विमिंग पुलमधील उडी चांगलीच महागात पडली. त्या युवकाने जंप मारली, अन् तो एका ७२ वर्षीय व्यक्तीवर पडला. मग या अपघातात तो ७२ वर्षीय व्यक्ती जखमी झाला. त्यांना रुग्णालयात नेण्यात आले. पण त्यांचा मृत्यू झाला.

युवकाने स्विमिंग पूलमध्ये मारली उडी, ७२ वर्षीय व्यक्तींवर पडला, मग काय झाले?
स्विमिंग पूलमध्ये उडी घेताना तरुण वृद्धाच्या अंगावर पडलाImage Credit source: Google
Jitendra Zavar
Jitendra Zavar | Updated on: May 08, 2025 | 12:11 PM
Share

मुंबई : राज्यात तापमान वाढले आहे. अंगाची लाहीलाही होत आहे. मग गारवा मिळेल, त्याठिकाणी गर्दी होत आहे. यामुळे राज्यातील स्विमिंग पूलमधील गर्दी मार्च महिन्यापासून वाढायला लागली आहे. युवक, युवतीप्रमाणे ज्येष्ठ मंडळीही स्विमिंग पूलमध्ये आंघोळीसाठी नेहमी जात आहे. या स्विमिंग पूलमध्ये मुंबईत एका अपघात झाला. या अपघातात एका ७२ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. मुंबईतील गोरेगावमध्ये हा प्रकार घडला. यामुळे स्विमिंग पुलमध्ये आंघोळीसाठी जाताना खबरदारी घेऊनच आंघोळ करणे गरजेचे आहे.

काय घडला प्रकार

मुंबईतील स्विमिंग पूलमध्ये आंघोळ करताना एका तरुणाने उंचावरून उडी मारली. यावेली तो सरळ एका वृद्धाच्या अंगावर पडला. या घटनेत वृद्ध गंभीर जखमी होऊन त्यांचा मृत्यू झाला. मृताच्या कुटुंबीयांनी तरुणावर निष्काळजीपणाचा आरोप केला आहे. मुंबईच्या गोरेगावच्या पश्चिम भागातील ओझोन जलतरण तलावात ही घटना घडली.

ती उडी सरळ त्यांच्या अंगावर

72 वर्षीय विष्णू सामंत येथे आंघोळ करण्यासाठी पोहोचले होते. या ठिकाणी 20 वर्षीय तरुणही पोहोचला होता. त्याने अचानक उंचावरून स्विमिंग पूलमध्ये उडी मारली. तो थेट विष्णू सामंत यांच्यावर पडला. या अपघातात विष्णू सामंत गंभीर जखमी झाले. त्याच्या मानेवर आणि शरीराच्या इतर अनेक भागांवर जखमा झाल्या. त्यांना जखमी अवस्थेत जवळच्या रुग्णालयात दाखल केले असता त्यांना मृत घोषित करण्यात आले.

त्या तरुणावर आरोप

या घटनेनंतर विष्णू सावंत यांच्या पत्नीने तरुणावर निष्काळजीपणे उडी मारल्याचा आरोप केला आहे. विष्णूच्या मृत्यूला तरुणच जबाबदार असल्याचा दावा सावंत यांच्या पत्नीने केलाय.

कर्नाटकमध्ये झाला होता अपघात

कर्नाटकातील बेंगळुरू येथे यापूर्वी अपघात झाला होता. येथे दोन मित्रांचा जलतरण तलावात बुडून मृत्यू झाला. मृत्युमुखी पडलेली दोन्ही मुले 13 वर्षांची होती. दोघेही शाळा बंक करून तलावात पोहायला गेले. दोन्ही मृत्यू निष्काळजीपणामुळे झाले आहेत.

चांगला व्यायम प्रकार

तंदुरुस्त राहण्यासाठी पोहणे चांगला व्यायाम आहे. विशेष म्हणजे याच तलावात अनेक खेळाडू देखील सरावासाठी येत असतात. तापमान वाढतच चालल्याने नागरिकांचेही पाऊले हळूहळू वळू लागले आहे. तापमान वाढत असल्यामुळे 40 स्विमिंग करून काहीसा गारवा मिळवण्यासाठी आणि व्यायाम देखील होत असल्याने नागरिकांचा प्रतिसाद वाढला आहे. यातून पालिकेच्या तिजोरीला हातभार लागत असल्याने पालिकेनेही मोठ्या सुविधा उपलब्ध करून दिल्या आहे. अनुभवी प्रशिक्षक, चांगल्या दर्जाचे पाणी उपलब्ध करून दिले आहे.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?