मुंबईच्या टाटा हॉस्पिटलमध्ये कॅन्सरचे उपचार घ्यायला येणाऱ्यांना मोठा दिलासा; रस्त्यावरची फरफट थांबणार?

| Updated on: Feb 06, 2022 | 7:29 PM

उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) बिहार (BIHAR) आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यांमधून मुंबईत उपचार घेण्यासाठी येणाऱ्या कॅन्सरग्रस्त रुग्णांच्या नातेवाईकांसाठी तसेच पर्यटकांसाठी बांद्रा पूर्वमध्ये उत्तर भारतीय संघाच्या वतीने भव्य अशा अतिथिगृहाची (Guest House) निर्मिती करण्यात आली आहे.

मुंबईच्या टाटा हॉस्पिटलमध्ये कॅन्सरचे उपचार घ्यायला येणाऱ्यांना मोठा दिलासा; रस्त्यावरची फरफट थांबणार?
51 लाखांचा चेक पदाधिकाऱ्यांकडे सोपावला
Follow us on

मुंबई : उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) बिहार (BIHAR) आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यांमधून मुंबईत उपचार घेण्यासाठी येणाऱ्या कॅन्सरग्रस्त रुग्णांच्या नातेवाईकांसाठी तसेच पर्यटकांसाठी बांद्रा पूर्वमध्ये उत्तर भारतीय संघाच्या वतीने भव्य अशा अतिथिगृहाची (Guest House) निर्मिती करण्यात आली आहे. या अतिथिगृहात विविध सोईसुविधांच्या निर्माणासाठी जागतिक कर्करोग दिनाचे औचित्य साधून, उत्तरभारतीय संघाचे नवनिर्वाचित अध्यक्ष संतोष आरएन सिंह यांनी पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये 51 लाखांची देणगी दिली आहे. या गेस्ट हाऊसला संतोष सिंह यांचे वडील आर. एन. सिंह यांचे नाव देण्यात येणार आहे. आर. एन. सिंह हे उत्तर भारतीय संघांचे माजी अध्यक्ष होते. तसेच ते भाजपाचे आमदार देखील होते. दोन जानेवारी रोजी संतोष सिंह यांचे वडील आरएन सिंह यांचे निधन झाले आहे. संतोष सिंह यांनी उत्तर भारतीय संघाकडे 51 लाखांचा चेक सोपवला आहे. हा चेक सोपवताना आपण आपल्या वडिलांचे अपूर्ण राहिले स्वप्न पूर्ण करत असल्याचे संतोष सिंह यांनी सांगितले.

6 हजार 800 स्केअर फूटमध्ये बांधकाम

बाद्रा पूर्वेमध्ये असलेल्या टीचर कॉलनीच्या मागे या भव्य अशा गेस्ट हाऊची निर्मिती करण्यात आली आहे. 6 हजार 800 स्केअर फूटमध्ये हे भवन बांधण्यात आले आहे. यामध्ये 50 बेडची तसेच पाच एसी रुमची व्यवस्था करण्यात आली आहे. उत्तर प्रदेश, बिहार आणि महाराष्ट्रातून कर्करोगाच्या उपचारासाठी टाट रुग्णालयात आलेल्या किंवा अन्य ठिकाणी उपचार घेत असलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांच्या राहण्याची सोय या ठिकाणी होणार आहे. हे भवन ना नफा ना तोटा तत्त्वावर चालवण्यात येणार असल्याची माहिती उत्तर भारतीय संघाचे अध्यक्ष संतोष सिंह यांनी सांगितले. मुंबईच्या टाटा रुग्णालयात कर्करोगाच्या उपचारासाठी राज्यभरातून रुग्ण येतात. या रुग्णांसोबत येणाऱ्या नातेवाईंकाच्या राहण्याची गैरसोय होते. हीच गैरसोय दूर करण्यासाठी अतिथि भवनची निर्मित करण्यात आल्याची माहिती संतोष सिंह यांनी दिली.

नाममात्र शुल्कात निवास भोजनाची सोय

पुढे बोलताना संतोष आरएन सिंह यांनी सांगितले की, मुंबईमध्ये कर्करोगाच्या उपचारासाठी उत्तर प्रदेश, बिहार आणि महाराष्ट्रातल्या दुर्गम भागातील अनेक रुग्ण येतात. मुंबईमध्ये आल्यानंतर कुठे राहिचे असा प्रश्न त्यांच्यासोबत आलेल्या नातेवाईकांना पडतो. अनेकांना मुंबईत राहण्याचा खर्च परवडणारा नसतो. त्यामुळे अशा व्यक्तींच्या राहण्याची सोय या गेस्ट हाऊसमध्ये करण्यात येणार आहे. सोबत जे पर्यटक इतर राज्यातून महाराष्ट्रात फिरण्यासाठी येतात त्यांना देखील इथे रूम उपलब्ध करून दिली जाणार आहे. त्यासाठी नाममात्र शुल्क आकारण्यात येणार असून, भोजनाची देखील व्यवस्था करण्यात येणार आहे.

संबंधित बातम्या

Lata Mangeshkar Funeral : पंतप्रधान मोदींनी शिवाजी पार्कवर वाहिली लतादीदींना श्रद्धांजली, दिग्गजांची उपस्थिती

Lata Mangeshkar Funeral Pics : अंत्ययात्रेत जनसागर उसळला! अखेरचा निरोप देताना अश्रू अनावर

Lata Mangeshkar: लता मंगेशकर यांच्या निधनामुळे दुखवटा; उद्या राज्यात सार्वजनिक सुट्टी जाहीर