AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

11 वर्षांचे प्रेमसंबंध, मुंबईतील 28 वर्षीय तरुणीचा पालघरमध्ये खून, वयाने लहान बॉयफ्रेण्डला अटक

कॅरल मिस्किटा मुंबईतील एका बीपीओ कंपनीत नोकरी करत होती. ती आपल्या 56 वर्षीय आईसह पार्ल्यात राहत होती. 2011 पासून आरोपी झिको मिस्किटासोबत तिचे प्रेमसंबंध होते. आरोपी तिच्यापेक्षा वर्षाने लहान आहे. मध्यंतरी त्यांचे ब्रेकअप झाले होते, मात्र नंतर ते पुन्हा एकत्र आले.

11 वर्षांचे प्रेमसंबंध, मुंबईतील 28 वर्षीय तरुणीचा पालघरमध्ये खून, वयाने लहान बॉयफ्रेण्डला अटक
प्रातिनिधिक फोटो
| Edited By: | Updated on: Feb 06, 2022 | 3:40 PM
Share

मुंबई : जवळपास गेल्या 10 दिवसांपासून बेपत्ता असलेल्या मुंबईकर तरुणीची हत्या (Mumbai Murder) झाल्याचं उघडकीस आलं आहे. मुंबईतील विले पार्ले भागात राहणारी 28 वर्षीय कॅरल मिस्किटा (CAROL MISQUITTA) पालघरमधील वाघोबा घाट परिसरात (Waghoba Ghat Palghar) मृतावस्थेत आढळली. कॅरलच्या हत्ये प्रकरणी पोलिसांनी तिच्या बॉयफ्रेण्डसह दोघा जणांना अटक केली आहे. 24 जानेवारीच्या रात्री कॅरल विले पार्ल्यातील घरातून प्रियकराला भेटण्यासाठी बाहेर गेली, त्यानंतर बेपत्ता झाली होती. 3 फेब्रुवारीला तिचा मृतदेह मुंबईला लागून असलेल्या पालघर जिल्ह्यात आढळला. गुन्ह्यात वापरलेला चाकू कॅरलच्या छातीत अडकल्याचे शव विच्छेदनादरम्यान आढळून आले. बीपीओमध्ये काम करणारी कॅरल आपल्या 56 वर्षीय आईसोबत राहत होती. कॅरल रिलेशनशीपमध्ये असलेला तिचा प्रियकर झिको मिस्किटा (27 वर्ष) आणि त्याच्या अन्य एका साथीदाराला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

कॅरलच्या कुटुंबीयांनी 25 जानेवारी रोजी स्थानिक पोलिसात ती हरवल्याची तक्रार दाखल केली होती, मात्र पोलिसांनी तक्रारीची गांभीर्याने दखल घेतली नसल्याचा दावा केला जातो. म्हणून तिला न्याय मिळवून देण्यासाठी रविवारी संध्याकाळी विलेपार्ले येथील सेंट फ्रान्सिस झेवियर्स चर्च येथून एक कँडल मार्च काढण्यात येणार आहे.

नेमकं काय घडलं?

कॅरल मिस्किटा मुंबईतील एका बीपीओ कंपनीत नोकरी करत होती. ती आपल्या 56 वर्षीय आईसह पार्ल्यात राहत होती. 2011 पासून आरोपी झिको मिस्किटासोबत तिचे प्रेमसंबंध होते. आरोपी तिच्यापेक्षा वर्षाने लहान आहे. मध्यंतरी त्यांचे ब्रेकअप झाले होते, मात्र नंतर ते पुन्हा एकत्र आले.

24 जानेवारी रोजी रात्री 10 वाजताच्या सुमारास कॅरल तिच्या स्कूटीवरुन बॉयफ्रेण्ड झिकोला भेटण्यासाठी निघाली. झिकोही त्याच्या स्कूटरवरून आला होता. त्याचा सहकारी कुमार देवेंद्र (30) त्याच्यासोबत होता. मध्यरात्री 12.20 च्या सुमारास कॅरलने तिच्या आईला फोन केला आणि थोड्याच वेळात आपण घरी परत येणार असल्याचे तिने आईला सांगितले.

पहाटे 3 ते 4 वाजताच्या दरम्यान पालघरमधील मुंबई-अहमदाबाद महामार्गावर कॅरल आणि झिको यांच्यात वाद झाला. त्यानंतर झिकोने कॅरलचा गळा दाबून खून केला आणि तिच्यावर चाकूने वारही केल्याचा आरोप आहे. तसेच तिचा चेहरा विद्रूप करण्यासाठी त्याने दगडाने ठेचला.

वाघोबा घाटात मृतदेह फेकला

झिको हा चाकू सोबत घेऊन गेला होता, असा दावा पोलिसांनी केला आहे. हत्या केल्यानंतर झिको आणि त्याच्या साथीदाराने वाघोबा घाट परिसरात मुख्य रस्त्यापासून सुमारे 15 फूट अंतरावर तिचा मृतदेह फेकून दिला. त्यानंतर त्यांनी तिची स्कूटर दुसऱ्या ठिकाणी झुडपात लपवून ठेवली आणि सकाळी सहा वाजताच्या सुमारास ते मुंबईला परतले, असे पोलिसांनी सांगितले.

असा लागला शोध

कॅरल घरी परतली नाही तेव्हा तिच्या आईने दुसऱ्या दिवशी सकाळी सांताक्रूझ पोलिसांशी संपर्क साधला. सांताक्रूझ पोलिसांनी तपास सुरू केला पण तिचा शोध लागत नव्हता. 10 दिवसांनंतर, 3 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 5.30 च्या सुमारास रस्त्याशेजारील झाडाजवळ लघुशंका करण्यासाठी गेलेल्या एका व्यक्तीला तिच्या कुजलेल्या मृतदेहाचा उग्र वास आला आणि त्याने पालघर पोलिसांना याविषयी माहिती दिली.

पालघर पोलिसांनी जवळपासच्या जिल्ह्यांमधील बेपत्ता व्यक्तींबाबत तक्रारींचा शोध घेतला आणि कॅरलची ओळख पटली. त्यानंतर त्यांनी संपूर्ण मार्गावरील सीसीटीव्ही कॅमेरे तपासले, तेव्हा दोघे आरोपी निश्चित झाले. या प्रकरणाचा तपास करत असलेल्या पालघर पोलिसांच्या उपविभागीय पोलिस अधिकारी (SDPO) नीता पाडवी यांनी सांगितले की, “आम्ही दोघा आरोपींना अटक केली आहे आणि त्यांना न्यायालयात हजर केले असून दोघांना 10 फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.” गुन्ह्यात वापरलेला चाकू शव विच्छेदनादरम्यान कॅरलच्या छातीत अडकल्याचे आढळून आले.

संबंधित बातम्या :

घरापासून 100 मीटरवर अल्पवयीन मुलीचा अर्धनग्न मृतदेह, ऊसाच्या शेतात दोन आरोपी सापडले

बाळाच्या किरकिरण्याचा वैताग, बापाने दोन वर्षांच्या लेकीला संपवलं, स्टोव्हवरुन पडून अपघाताचा बनाव

मित्र म्हणाला माझ्याकडे पैसे नाहीत, काकाला येऊ दे, चिडलेल्या तरुणाने जीवलगालाच संपवलं

वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?.
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास.
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा.
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा.