राज्यात कोरोनाचा दहावा बळी, एकाच दिवसात दोघांचा मृत्यू, पुणे-मुंबईतील 2 रुग्णांचा अंत

| Updated on: Mar 30, 2020 | 6:14 PM

राज्यात कोरोनाचा दहावा बळी गेला (Mumbai Corona Patient died) आहे. मुंबईत आणखी एका वृद्धाचा खासगी रुग्णालयात मृत्यू झाला आहे.

राज्यात कोरोनाचा दहावा बळी, एकाच दिवसात दोघांचा मृत्यू, पुणे-मुंबईतील 2 रुग्णांचा अंत
Follow us on

मुंबई : राज्यात कोरोनाचा दहावा बळी गेला (Mumbai Corona Patient died) आहे. मुंबईत आणखी एका वृद्धाचा खासगी रुग्णालयात मृत्यू झाला आहे. मुंबईत खासगी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या 80 वर्षांच्या वृद्धाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मुंबईतील कोरोना बळींची संख्या ही 8 वर पोहोचली आहे. तर महाराष्ट्रातील कोरोना बळींची संख्या ही 10 वर पोहोचली आहे.

दरम्यान आज (30 मार्च) मुंबईत मृत्यू झालेल्या 80 वर्षीय रुग्णावर मुंबईतील फोर्टिस्ट रुग्णालयात उपचार सुरु होते. त्यांची कोरोनाची टेस्टही पॉझिटिव्ह आली होती. उपचारादरम्यानच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यामुळे मुंबईतील मृतांची संख्या 8 वर तर राज्यातील कोरोनाबळींची संख्या दहावर पोहोचली आहे. यापूर्वी बुलडाण्यात काल एकाचा तर पुण्यात आज एका कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला.

राज्यात कोरोनाबाधितांची आकडा 215 वर पोहोचला आहे. यात सर्वाधिक 88 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण हे मुंबईत आढळले आहेत.

तर दुसरीकडे आज (30 मार्च) पुण्यात कोरोनाचा पहिला बळी गेला आहे. कोरोनाबाधित 52 वर्षीय रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. या रुग्णावर पुण्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. तिथेच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पुण्यातील कोरोनाचा हा पहिला बळी ठरला आहे.

पुण्यात आज मृत्यू झालेल्या कोरोना रुग्णाला विविध व्याधी होत्या. त्यामध्ये त्यांना कोरोनाचीही लागण झाली होती. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पुण्यात पहिला बळी गेल्याने पुणेकरांसाठी ही अत्यंत चिंतेची बाब आहे. पुण्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे.

कोरोनामुळे महाराष्ट्रात कुठे किती मृत्यू?

मुंबई – 64 वर्षीय वृद्धाचा मृत्यू (1) – 17 मार्च
मुंबई – 63 वर्षीय वृद्धाचा मृत्यू (1) – 22 मार्च
*मुंबई – फिलिपाईन्सच्या 68 वर्षीय वृद्धाचा मृत्यू– 23 मार्च (कोरोना निगेटिव्ह, मृत्यूचं कारण अन्य)*
मुंबई – 65 वर्षीय वृद्धाचा मृत्यू (1) – 23 मार्च
मुंबई – एकाचा मृत्यू (1) -25 मार्च
नवी मुंबई – वाशीतील 65 वर्षीय महिलेचा मृत्यू (1)– 26 मार्च
मुंबई – 63 वर्षीय महिलेचा मृत्यू (1)– 26 मार्च
बुलडाणा – 45 वर्षीय पुरुषाचा मृत्यू – 28 मार्च
मुंबई – 40 वर्षीय महिलेचा मृत्यू – 28 मार्च
पुणे – 52 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू – 30 मार्च
मुंबई – 80 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू – 30 मार्च

महाराष्ट्रात कोरोनाचे वाढते रुग्ण

देशभरात लॉकडाऊन जारी केल्यानंतरही ‘कोरोना’ग्रस्तांचे आकडे वाढतानाच दिसत आहेत. महाराष्ट्रातील ‘कोरोना’बाधितांचा आकडा 215 वर पोहोचला आहे. मुंबई, पुणे, नागपूर, कोल्हापूर, नाशिकमध्ये गेल्या बारा तासात नवे रुग्ण सापडले आहेत. (Rise in Maharashtra Corona Patients)

पुण्यात 5, मुंबईत 3, नागपुरात 2, तर कोल्हापूर-नाशिकमध्ये प्रत्येकी एक नवा रुग्ण सापडला आहे. आरोग्य विभागाने ही आकडेवारी जाहीर केली आहे. गेल्या 24 तासात राज्यात कोरोनाचे 26 नवे रुग्ण सापडले (Mumbai Corona Patient died) आहेत.