AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘डोनेशन गँग’च्या मुंबई पोलिसांनी मुसक्या आवळल्या

ब्रिजभान जैसवार, टीव्ही 9 मराठी, मुंबई : खोट्या संस्थांच्या नावाने पावत्या फाडून वर्गणी गोळा करणाऱ्या ‘डोनेशन गँग‘च्या मुंबई पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. कुठेच संस्था किंवा कार्यालय नसताना लोकांच्या घरोघरी जाऊन, ही गँग लोकांना भावनिक आवाहनं करुन पैसे गोळा करत असे आणि डमी पावती देत असे. ‘डोनेशन गँग‘ नेमकं काय करत असे? तुम्ही जर धार्मिक प्रवृत्तीचे […]

'डोनेशन गँग'च्या मुंबई पोलिसांनी मुसक्या आवळल्या
| Edited By: | Updated on: Jul 05, 2019 | 5:02 PM
Share

ब्रिजभान जैसवार, टीव्ही 9 मराठी, मुंबई : खोट्या संस्थांच्या नावाने पावत्या फाडून वर्गणी गोळा करणाऱ्या ‘डोनेशन गँग‘च्या मुंबई पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. कुठेच संस्था किंवा कार्यालय नसताना लोकांच्या घरोघरी जाऊन, ही गँग लोकांना भावनिक आवाहनं करुन पैसे गोळा करत असे आणि डमी पावती देत असे.

‘डोनेशन गँग‘ नेमकं काय करत असे?

तुम्ही जर धार्मिक प्रवृत्तीचे असाल आणि दान-धर्म करत असाल किंवा तशी तुमची इच्छा असेल तर जरा जपून, कारण सध्या दान-धर्माच्या नावाखाली खंडणी उकळली जात असल्याचा समोर आला आहे. अनाथ मुलांचे पालपोषण आणि त्यांना शिकवण्यासाठी आम्ही आश्रम चालवतो. त्यामुळे पैसे  दान करुन हातभार लावा. देवीचे मोठे मंदिर आहे, भंडाऱ्यासाठी अन्नदान करा, असे सांगत ‘डोनेशन गँग‘ लोकांना फसवत असे.  

अशी जाळ्यात सापडली ‘डोनेशन गँग‘

मुंबईतील वांद्रे येथील जसलोक गारमेंटमध्ये दोघे आरोपी गेले. अनाथाश्रम चालवत असल्याचे सांगत त्यांनी वाकोल्यातील एका आश्रमाचं नाव असलेली पावती पुस्तक या दुकानदाराला दाखवलं. दुकानदार पैसे देण्यास टाळाटाळ करु लागल्याने हे दोघे त्याच्यावर जबरदस्ती करु लागले. यामुळे या दुकानदाराला संशय आला. त्यांनी दिलेली पावतीही बोगस वाटल्याने दुकानदाराने निर्मल नगर पोलिसांत तक्रार केली. तपासामध्ये पावतीमध्ये नमूद केलेला कोणतेच अनाथ आश्रम अस्तित्त्वात नसल्याचे समोर आले. दोन्ही आरोपींनी व्यापाऱ्यांकडून 20 हजार मागितले, मात्र वाटाघाटी करुन 8 हजार रुपये घेतले.

पोलिस या प्रकरणाच्या खोलात शिरले, कसून तपास केला, तेव्हा लक्षात आले की, भावनिक आवाहनं करुन लोकांकडून पैसे उकळणाऱ्यांची मोठी गँग आहे. शिवाय, या गँगने मुंबईत अनेकांना लुबाडल्याचेही समोर आले.

पोलिसांनी या गँगच्या काही जणांच्या मुसक्या आवळल्य असल्या, तरी मुंबईकरांनी सतर्क राहण्याची नितांत गरज आहे. कारण आपल्या संवेदनशीलतेचा आणि धार्मिक भावनांचा गैरफायदा घेत, डोनेशन गँग फसवू शकते.

Follow Us
हल्लेखोरांकडून अमिताभ, सलमान, अक्षय, आमीरच्या घराची रेकी- सूत्र
Tiger Shroff Case : हल्लेखोरांकडून अमिताभ, सलमान, अक्षय, आमीरच्या घराची रेकी- सूत्र
मनोज जरांगे यांचा एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर आरोप; संजय राऊत म्हणाले.
Sanjay Raut : मनोज जरांगे यांचा एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर आरोप; संजय राऊत म्हणाले....
येळकोट येळकोट जय मल्हारच्या जयघोषात मर्दानी दसऱ्याला सुरुवात
Jejuri Dasara Sohala : येळकोट येळकोट जय मल्हारच्या जयघोषात जेजुरीच्या मर्दानी दसऱ्याला सुरुवात
एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होणार, जो आडवा येईल.....
Shivsena : एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होणार, जो आडवा येईल.....; त्या बड्या नेत्याचं मोठं विधान
एकनाथ शिंदेंनी मला 500 कोटी रुपये दिल्याचं... मनोज जरांगे पाटलांचा...
एकनाथ शिंदेंनी मला 500 कोटी रुपये दिल्याचं... मनोज जरांगे पाटलांचा थेट सवाल, नेमकं प्रकरण काय?
2029 मधील निवडणुकीबाबत मनोज जरांगे पाटलांचं मोठं विधान, म्हणाले, मराठी
2029 मधील निवडणुकीबाबत मनोज जरांगे पाटलांचं मोठं विधान, म्हणाले, मराठी बांधवांसाठी...
मनोज जरांगे दसरा मेळाव्यात संतापले! समर्थकांना खडसावत म्हणाले...
मनोज जरांगे दसरा मेळाव्यात संतापले! समर्थकांना खडसावत म्हणाले...
एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री करण्याची तयारी? बड्या नेत्याचं विधान
एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री करण्याची तयारी? बड्या नेत्याच्या विधानाने चर्चांना उधाण
एकनाथ शिंदेंच्या दसरा मेळाव्यात शेतकऱ्यांसाठी खास संदेश! त्या बॅनरची..
एकनाथ शिंदेंच्या दसरा मेळाव्यात शेतकऱ्यांसाठी खास संदेश! 'त्या' बॅनरची तुफान चर्चा
पुण्यातील महालक्ष्मी देवीचे राजेशाही रूप! 16 किलो सोन्याची साडी
पुण्यातील महालक्ष्मी देवीचे राजेशाही रूप! दसऱ्यानिमित्त नेसवली 16 किलो सोन्याची साडी, दर्शनासाठी भाविकांची गर्दी