घरातच बनावट नोटांचा कारखाना, मुंबईतून भामट्याला अटक

कांदिवलीतील चारकोप येथे बनावट नोटा छापणाऱ्या एका भामट्याला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून अडीच लाख रुपयांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या (Fake Notes in Mumbai) आहेत.

घरातच बनावट नोटांचा कारखाना, मुंबईतून भामट्याला अटक
| Updated on: Oct 19, 2019 | 11:26 PM

मुंबई : कांदिवलीतील चारकोप येथे बनावट नोटा छापणाऱ्या एका भामट्याला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडली आहे. त्याच्याकडून अडीच लाख रुपयांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. आरोपीचे नाव अद्याप कळू शकले नसून पोलीस अधिक तपास करत (Fake Notes in Mumbai) आहेत.

दिवाळीचा सण जवळ आला आहे. त्यामुळे बाजारात मोठ्या प्रमाणात वस्तू किंवा इतर सामान घेण्यासाठी ग्राहकांची गर्दी होत आहे. याचाच फायदा घेऊन मुंबईतील बाजारात बनावट नोट बनवणाऱ्या एका भामट्याला पोलिसांनी अटक (Fake Notes in Mumbai)  केली.

या आरोपीच्या घरात एकून अडीच लाखांच्या बनावट नोटा सापडल्या आहेत. जमा केलेल्या नोटांमध्ये 500 आणि 2 हजारच्या नोटा आहेत. यांसह घरात कटर, झेरॉक्स प्रिंटर आणि कार्टेज अशा वस्तू सापडल्या आहेत. क्राईम ब्रँचच्या युनिट 5 ने ही कारवाई (Fake Notes in Mumbai) केली.

आरोपी गेल्या चार महिन्यांपासून बनावट नोटा मार्केटमध्ये चालवत आहे. त्यामुळे आता पर्यंत लाखोंच्या नोटा मार्केटमध्ये चालवल्या असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.