मोहित कंबोज यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा; इंडियन ओव्हरसीज बँकेची 52 कोटींची फसवणूक

बँकेतील कर्ज प्रकरणी मोहित कंबोज आणि इतरांविरुद्ध भारतीय दंड संहिता कलम 409 लोकसेवक, किंवा बँकर, व्यापारी किंवा एजंटद्वारे विश्वासार्हतेचा गुन्हेगारी उल्लंघन आणि 420 म्हणजेच फसवणूक आणि अप्रामाणिकपणे मालमत्तेचे वितरण या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोहित कंबोज यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा; इंडियन ओव्हरसीज बँकेची 52 कोटींची फसवणूक
भाजपच्या मोहित कंबोजवर गुन्हा
Follow us
| Updated on: Jun 01, 2022 | 5:19 PM

मुंबईः भाजपचे नेते मोहित कंबोज (BJP leader Mohit Kamboj) यांच्यावर आता मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने फसवणूक केल्याच्या आरोपाखाली त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. इंडियन ओव्हरसीज बँकेच्या (Indian Overseas Bank) व्यवस्थापकाच्या तक्रारीनंतर त्यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा (crime of fraud)  दाखल केला आहे. यावेळी मुंबई पोलिसांनी सांगितले आहे की, बँक व्यवस्थापकाने मोहित कंबोजवर आरोप केला आहे की, मोहित कंबोज हे एका कंपनीवर संचालक म्हणून काम करतात. कंपनीच्या तीन संचालकांपैकी ते एक असल्याने त्यांनी 52 कोटींचे कर्ज बँकेकडून घेतले होते. मात्र ते कर्ज ज्या कारणासाठी त्यांनी घेतले होते, त्या कामासाठी त्यांनी ते पैसे वापरले नाहीत. त्या पैशाचा इतर ठिकाणीच त्यांनी वापर केला आहे.

आणखी दोन संचालकांवर गुन्हा

बँकेतील कर्ज प्रकरणी मोहित कंबोज आणि इतरांविरुद्ध भारतीय दंड संहिता कलम 409 लोकसेवक, किंवा बँकर, व्यापारी किंवा एजंटद्वारे विश्वासार्हतेचा गुन्हेगारी उल्लंघन आणि 420 म्हणजेच फसवणूक आणि अप्रामाणिकपणे मालमत्तेचे वितरण या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मोहित कंबोज यांच्याबरोबर मुंबईचे आणखी दोन संचालक असल्याचे मुंबई पोलिसांनी सांगितले.

मला मारण्याचा प्रयत्न

या वर्षी एप्रिलमध्ये, भाजप नेत्यांकडून जाहीर आरोप केला होता की शिवसेनेचे कार्यकर्त्यांकडून आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून त्यांना “मारण्याचा” प्रयत्न करण्यात आला होता. मात्र, या घटनेत कोणीही जखमी झाले नसल्याचे त्यांनी सांगितले. या घटनेनंतर मुंबई पोलिसांकडे दोन्ही बाजूंच्या तक्रारी दाखल करण्यात आल्या होत्या.

जमवाकडून कारवर हल्ला

कलानगर जंक्शन येथे शुक्रवारी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांच्या जमावाने त्यांच्या गाडीवर हल्ला केल्याचा आरोप कंबोज यांनी केला आहे. याच ठिकाणी मातोश्री-उद्धव ठाकरे यांचे खाजगी घर आहे. तर शिवसेनेने आपल्या तक्रारीत कंबोज मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाची रेकी करत असून त्यांच्या गाडीत शस्त्रे असल्याचा आरोप केला आहे.

Non Stop LIVE Update
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?.
किरण सामंतांची भावावर नाराजी? कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर हटवले
किरण सामंतांची भावावर नाराजी? कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर हटवले.
शिवसेना का सोडली? बाळासाहेबांना लिहिलेल्या पत्रात राणेंनी काय म्हटलं?
शिवसेना का सोडली? बाळासाहेबांना लिहिलेल्या पत्रात राणेंनी काय म्हटलं?.
महायुतीत कुठल्या पक्षाला, किती जागा? जागावाटपाचा फॉर्म्युला कसा?
महायुतीत कुठल्या पक्षाला, किती जागा? जागावाटपाचा फॉर्म्युला कसा?.
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेची उमेदवारी, छगन भुजबळ नाराज? काय म्हणाले?
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेची उमेदवारी, छगन भुजबळ नाराज? काय म्हणाले?.
ठाणे लोकसभेतून उमेदवारी जाहीर, नरेश म्हस्केंची पहिली प्रतिक्रिया काय?
ठाणे लोकसभेतून उमेदवारी जाहीर, नरेश म्हस्केंची पहिली प्रतिक्रिया काय?.
अखेर कल्याण-ठाण्याचे उमेदवार शिंदे गटातून जाहीर, कुणाला लोकसभेच तिकीट?
अखेर कल्याण-ठाण्याचे उमेदवार शिंदे गटातून जाहीर, कुणाला लोकसभेच तिकीट?.
मुख्यमंत्र्यांची पुन्हा तत्परता; रस्त्यात अपघात, शिंदेंनी ताफा थांबवला
मुख्यमंत्र्यांची पुन्हा तत्परता; रस्त्यात अपघात, शिंदेंनी ताफा थांबवला.
घोडे समजून ज्यांना घेतलं ती खेचरं अन्.. ठाकरेंची शिंदे-फडणवीसांवर टीका
घोडे समजून ज्यांना घेतलं ती खेचरं अन्.. ठाकरेंची शिंदे-फडणवीसांवर टीका.
आमच्या डोक्यात प्रकाश पडायला 17 वर्ष लागली, अजितदादांचा निशाणा कुणावर?
आमच्या डोक्यात प्रकाश पडायला 17 वर्ष लागली, अजितदादांचा निशाणा कुणावर?.