आदित्य पंचोलीवर बलात्काराचा गुन्हा दाखल

अभिनेता आणि निर्माता आदित्य पंचोलीवर मुंबई पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. आता पुन्हा एकदा आदित्याच्या अडचणीत वाड होण्याची शक्यता दिसत आहे.

आदित्य पंचोलीवर बलात्काराचा गुन्हा दाखल
Follow us
| Updated on: Jun 27, 2019 | 7:43 PM

मुंबई : अभिनेता आणि निर्माता आदित्य पंचोलीवर मुंबई पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे पुन्हा आदित्य पंचोलीच्या अडचणीत वाढ झाली आहे. काही दिवसांपूर्वी आदित्यने अभिनेत्री कंगना राणावत आणि तिची बहीण रंगोलीवर अब्रूनुकसानीचा गुन्हा दाखल केला होता. गेले काही दिवसांपासून आदित्य आणि कंगनामध्ये वाद सुरु आहेत. याबद्दल कंगनानेही अनकेदा माध्यमांसमोर आदित्यने मला मारहाण केल्याचे म्हटले होते.

कंगना आणि रंगोलीच्या विरोधात नुकतेच कोर्टाने चार समन्स दिले आहेत. एक आदित्य पंचोली विरुद्ध कंगना राणावत, दुसरा आदित्य पंचोली विरुद्ध रंगोली चंदेल आणि जरीना वहाब विरुद्ध कंगना राणावत आणि जरीना वहाब विरुद्ध रंगोली चंदेल. 26 जुलै रोजी होणाऱ्या सुनावणीसाठी कंगना आणि रंगोली या दोघींना कोर्टात हजर राहावे लागणार आहे.

झोन 9 चे उपायुक्त परमजीत सिंह दहिया म्हणाले, “मुंबईच्या वर्सोवा पोलीस स्टेशनमध्ये कलम 376, 328, 342, 323, 506 नुसार गुन्हा दाखल केला आहे. ही घटना 10 वर्षापूर्वीची आहे. यामध्ये पुरावे जमा आणि चौकशी करण्यासाठी कठीण जाईल. गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला आहे”.

काही दिवसांपूर्वी आदित्य पंचोलीने कंगना आणि रंगोलीच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता. यानंतर कंगनाने आदित्य पंचोलीच्या विरोधात मारहाणीचा गुन्हा वर्सोवा पोलीस स्टेशनमध्ये दाखल केला होता. हे सर्व आरोप आदित्यने फेटाळून लावत कंगना आणि रंगोलीवर अब्रूनुकसानीचा गुन्हा दाखल केला होता.

नुकतेच आदित्य पंचोलीची पत्नी आपल्या पतीच्या बचावासाठी उतरली आहे. ती म्हणाली, “मी इतरांपेक्षा माझ्या पतीला चांगले ओळखते. माझ्यापासून ते काही लपवत नाहीत. मला माहित आहे मागे काय झाले होते. ते त्यांनी काही चुकीचे काम केले नाही”.

Non Stop LIVE Update
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा.
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा.
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?.
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण...
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण....