मुंबईत विनाकारण बाहेर पडणाऱ्यांवर कारवाई, पोलिसांकडून 4 हजार 864 गाड्या जप्त, नवी नियमावली जाहीर

| Updated on: Jun 29, 2020 | 12:20 AM

मुंबई पोलिसांनी विनाकारण दुचाकीने रस्त्यावर भटकणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला (Mumbai Police Action on Violating Curfew) आहे.

मुंबईत विनाकारण बाहेर पडणाऱ्यांवर कारवाई, पोलिसांकडून 4 हजार 864 गाड्या जप्त, नवी नियमावली जाहीर
Follow us on

मुंबई : राज्यात अनलॉकच्या पहिल्या टप्प्यात काही थिथीलता देण्यात आल्या आहे. मात्र याचा गैरफायदा घेत विनाकारण घराबाहेर पडत आहे. अशा लोकांवर मुंबई पोलिसांनी कडक कारवाई केली आहे. मुंबई पाोलिसांनी दिवसभरात 4 हजार 864 गाड्या जप्त केल्या आहेत. (Mumbai Police Guidelines Action on violating Curfew during Unlock)

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशानंतर मुंबई पोलीस सतर्क झाले आहे. त्यानुसार पोलिसांना विनाकारण  रस्त्यावर भटकणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. यात पोलिसांनी दिवसभरात 4 हजार 864 गाड्या जप्त केल्या आहेत. मरिन ड्राईव्हपासून दहिसर-मुलुंडपर्यंत ही कारवाई केली आहे. विशेष म्हणजे झोन 10 मध्ये सर्वाधिक 1 हजार 297 गाड्या जप्त केल्या आहेत.

लॉकडाऊनमधून सूट मिळाल्यानंतर अनेक मुंबईकर कामाव्यतिरिक्त रस्त्यावर फिरताना पाहायला मिळत होते. त्यामुळे पोलिसांच्या या कारवाईनंतर त्यांना चांगलाच वचप बसेल, असं बोललं जात आहे.

मुंबईत अनलॉक झाल्यानंतर अनेक जण विनाकारण घराबाहेर पडत आहे. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे मुंबई पोलिसांनी विनाकारण बाईक किंवा मोटारसायकलवरुन फिरताना आढळले तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल. तसेच त्यांच्याकडून दंड वसूल केला जाईल, असे संकेत पोलिसांनी दिले.

अत्यावश्यक सेवा, वैद्यकीय सेवा किंवा कार्यलयीन कामाव्यतिरिक्त जर कोणी विनाकारण फिरताना आढळले तर त्याच्यावर कारवाई होणार असल्याचे मुंबई पोलिसांनी सांगितले. (Mumbai Police Guidelines Action on Violating Curfew during Unlock)

मुंबई पोलिसांची नियमावली 

राज्य सरकारतर्फे ‘Mission Begin Again’ अंतर्गत अनेक परवानग्या दिल्या आहेत. कोविड -19 चा धोका अजूनही कायम असल्याने सर्वांनी सुरक्षेसाठी Personal Safety आणि Social Distancing च्या नियमांचे पालन करावे.
अनेकजण या नियमांचे उल्लंघन करतात. त्यामुळे स्वतःच्या आणि इतरांच्या आरोग्यासाठी राज्य शासनाने जारी केलेल्या लॉकडाऊन मार्गदर्शक तत्त्वांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन मुंबई पोलिसांनी केले आहे.

1. घराबाहेरील हालचाली केवळ अत्यावश्यक सेवांसाठीच कराव्यात.
2. घराबाहेर फिरताना चेहऱ्यावर मास्क अनिवार्य आहे.
3. घरापासून फक्त 2 कि.मी.च्या परिसरात असलेल्या बाजारपेठ, दुकाने इत्यादी ठिकाणी जाता येईल. 2 कि.मी. च्या बाहेर जाऊ नये.
4. व्यायामाची परवानगी घरापासून 2 कि.मीच्या परिघातील मोकळ्या जागेपुरतीच मर्यादित आहे.
5. कार्यालयात किंवा वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीत 2 कि.मी च्या बाहेर जाण्याची परवानगी आहे.
6. Social Distancing च्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे.
7. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल.
8. Social Distancing चे निकष न पाळणारी दुकाने इत्यादी बंद करण्यात येतील.
9. रात्री 09. 00 ते पहाटे 05.00 वा. दरम्यानच्या कर्फ्युमध्ये अत्यावश्यक सेवेशिवाय इतर व्यक्तींनी बाहेर फिरल्यास कडक कारवाई केली जाईल.
10. वैध कारणाशिवाय आपल्या स्थानिक भागापासून दूर आढळून येणारी सर्व वाहने जप्त केली जातील. (Mumbai Police Guidelines Action on Violating Curfew during Unlock)

संबंधित बातम्या : 

30 जूननंतर लॉकडाऊन उठणार नाही : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

कोरोनामुक्त झालेल्यांनी पुढे येऊन प्लाझ्मा दान करा, मुख्यमंत्र्यांचे आवाहन