कोरोनामुक्त झालेल्यांनी पुढे येऊन प्लाझ्मा दान करा, मुख्यमंत्र्यांचे आवाहन

कोरोनामुक्त झालेल्यांनी पुढे येऊन प्लाझ्मा दान करा, मुख्यमंत्र्यांचे आवाहन

कोरोनामुक्त झालेल्यांनी स्वत: पुढे येऊन प्लाझ्मा दान करा," असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी (CM Uddhav Thackeray On Plasma Therapy) केले.

Namrata Patil

|

Jun 28, 2020 | 2:59 PM

मुंबई : “राज्यातील जे कोरोना रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यांनी पुढे येऊन प्लाझ्मा दान करा. प्लाझ्मा थेरपीने अनेकांचे जीव वाचवता येऊ शकतात. त्यामुळे कोरोनामुक्त झालेल्यांनी स्वत: पुढे येऊन प्लाझ्मा दान करा,” असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. “कदाचित देशातील प्लाझ्मा थेरपीचा देणार किंवा वापर करणारं महाराष्ट्र हे पहिलं राज्य ठरेल,” असेही उद्धव ठाकरे म्हणाले. (CM Uddhav Thackeray On Plasma Therapy For Covid Pandemic)

“रक्तदानाशी निगडीत प्लाझ्मा थेरपी हा विषय आहे. प्लाझ्मा थेरपी ही आपण मार्चपासून सुरु केली आहे. सुरुवातीला एक-दोन ठिकाणी प्लाझ्मा थेरपी वापरली जात होती. आतापर्यंत जर आपण 10 जणांवर उपचार केले असतील, तर त्यातील 9 जण बरे झाले. त्यामुळे प्लाझ्मा थेरपीही उपयोगी पडतं आहे. त्यासाठी उद्या त्याचे केंद्र वाढवत आहोत. पहिल्यांदा दोन केंद्र  होती. आता त्याचा व्याप वाढवत आहोत,” असेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सांगितले.

“केंद्र वाढवणं या सर्व सुविधा झाल्या आहेत. मात्र जे कोरोनातून बरे झाले, त्यांना एक विनंती आहे की, रक्तदान कोणीही करु शकतो. प्लाझ्मा हा रक्तगटाप्रमाणे वापरावा लागतो. पण ज्यांना कोरोना होऊन ते बरे झालेत. ज्यांच्या शरीरात त्या अँटीबॉडी तयार झाल्यात. अशांचे रक्त घेऊन त्यातील प्लाझ्मा घेऊन त्या त्या रक्तगटाच्या रुग्णाला आवश्यकतेनुसार प्लाझ्मा वापरला. तर आपण अनेक जीव वाचवू शकतो,” असे उद्धव ठाकरेंनी सांगितले.

“खासकरुन जे रुग्ण बरे होऊन घरी गेलेत त्यांनी पुढे या. शासकीय वैद्यकीय विद्यालय, डॉक्टरांना संपर्क करुन रक्तदानाप्रमाणे प्लाझ्मा दान करा. जेणेकरुन आपण वाचलात, आपल्या माध्यमातून इतर काही जीव वाचतील. याला एकजूट म्हणतात. ती आपल्या रक्तात आहे. लढण हे आपलं रक्तात आहे. जेव्हा रक्ताचा तुटवडा होता. त्यावेळी रक्तदान करुन आपण तो लढाऊपणा सिद्ध केला. आता प्लाझ्मा दान करुन तो पुन्हा एकदा सिद्ध करण्याची गरज आहे,” असेही मुख्यमंत्री म्हणाले. (CM Uddhav Thackeray On Plasma Therapy For Covid Pandemic)

“मार्चपासून कोरोनाचे संकट आल्यापासून आपल्या हातात जे शस्त्र आलं ते घेऊन लढत आहोत. लॉकडाऊन, ट्रॅकिंग, ट्रेसिंग, चाचण्या वाढवणे, उपचार पद्धती यासारखे अनेक शस्त्र आहेत. राज्यातील रक्ताची टंचाई दूर झाली आहे,” असेही उद्धव ठाकरेंनी सांगितले.

“आपल्या महाराष्ट्रात मुंबईत डॉक्टर किंवा टास्क फोर्स उपचाराच्या बाबत जगाच्या बरोबरी आपण चालत आहे. कुठेही ही सूतभरही आपण त्याच्या मागे नाही. सर्वत्र आपली नजर आहे, कोणत्या देशात काय सुरु आहे, कोणते औषध, कोणते उपचार या सर्व गोष्टी होत आहेत. बीबीसीला ब्रेक-थ्रू नावाचं औषधाची बातमी होती. मी फोन करुन विचारल्यावर हे औषध आपण वापरत आहोत असे समजले,” असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

“केंद्राकडून ज्या औषधांना परवानगी मिळत आहे त्याचा वापर सुरु आहे. रेमडेसीवीरसारखी औषधे मोफत उपलब्ध करुन देणार आहेत. औषधांचा तुटवडा भासू देणार नाही. ही औषधे शासकीय आणि निमशासकीय रुग्णालयात मोफत उपलब्ध करण्याचा प्रयत्न असेल,” असेही उद्धव ठाकरेंनी सांगितले.  (CM Uddhav Thackeray On Plasma Therapy For Covid Pandemic)

संबंधित बातम्या : 

30 जूननंतर लॉकडाऊन उठणार नाही : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें