AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबई पुणे एक्स्प्रेसवर खाजगी बसचा भीषण अपघात, उभ्या ट्रकवर बस आदळली

mumbai pune expressway accident: मुंबई लेनवर उभ्या असणाऱ्या ट्रकवर बस आदळली. या अपघातामध्ये 15 प्रवासी जखमी झाले आहेत. त्यापैकी 8 जणांची प्रकृती गंभीर आहे. जखमींना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मुंबई पुणे एक्स्प्रेसवर खाजगी बसचा भीषण अपघात, उभ्या ट्रकवर बस आदळली
उभ्या ट्रकवर बस आदळली
Jitendra Zavar
Jitendra Zavar | Updated on: Nov 09, 2024 | 12:09 PM
Share

Mmbai PuneExpressway Accident: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवर खाजगी बसचा भीषण अपघात झाला आहे. खोपोलीजवळ शनिवारी पहाटे 4 वाजता ही घटना घडली आहे. कोल्हापूरकडून मुंबईकडे जाताना असलेल्या मार्गावर हा अपघात झाला. मुंबई लेनवर उभ्या असणाऱ्या ट्रकवर खासगी बस आदळली. या अपघातामध्ये बसमधील 15 प्रवासी जखमी झाले आहेत. त्यापैकी 8 जणांची प्रकृती गंभीर आहे. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघाताची माहिती मिळाल्यानंतर बोरघाट पोलीस, खोपोली पोलीस, आय आर बी यंत्रणा, अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी घटनास्थळी दाखल झाल्या. वाहतूक पोलीस मार्ग सुरळीत करण्याचा प्रयत्न करत आहे.

कोल्हापूर येथे फुटबॉल ट्रॉफी जिंकून परतणारी टीम या अपघातात बाधीत झाली. अपघातामध्ये गंभीर जखमी झालेल्या प्रवाशांना पनवेलच्या एमजीएम रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या टीममधील चार मुलींना एमजीएम हॉस्पिटल येथे शिफ्ट केले आहे. उर्वरित सर्वांना मुंबई येथे पर्यायी वाहनाने पाठवण्यात आले आहे.

परशूराम घाटात अपघातामुळे ठप्प झालेली वाहतूक

परशुराम घाटात अपघात, वाहतूक कोंडी

मुंबई गोवा महामार्गावर परशुराम घाटात दुसरा अपघात झाला आहे. यामुळे वाहतूक कोंडी निर्माण झाली. गणपती उत्सव काळात परशुराम घाटात दरड कोसळल्याची घटना घडली होती. मात्र अजूनही पूर्ण दरड हटवण्याचे काम महामार्ग प्रशासनाने केले नाही. महामार्गावर आजही मलबा कायम आहे. यामुळेच या महामार्गावर अपघातीच्या घटना घडतात. आता या ठिकाणी अपघात झाला आणि महामार्ग पूर्ण बंद पडला आहे. सध्या एकेरी वाहतूक चालू करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.

अपघातानंतर परशुराम घाटातील वाहतूक ठप्प आहे. मात्र, एकेरी वाहतूक चालू करण्यात महामार्ग पोलिसांना यश आले आहे. घाटातील एक लाईन वाहतुकीसाठी यापूर्वीच होती बंद होती. तसेच दुसरी लाईन रस्ता क्रॅक झाल्यामुळे मागील पंधरा दिवसापासून बंद आहे. महामार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलिसांच्या टीम परशुराम घाटात दाखल झाल्या आहेत.

Follow Us
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्नचिन्ह; शिंदे गटाचा...
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्न चिन्ह, शिंदे गटाचा युत्किवाद ठाकरेंचं टेन्शन वाढवणार?
बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची व्यवस्था
Beed Maratha Protesters | बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची मोठी व्यवस्था
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले...
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले दर्शन; खास सजावटीने वेधले लक्ष!
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच...
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच, नेमका अर्थ काय?
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात...
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात... नेमकं काय म्हणाल्या?
जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत...
Manoj Jarange Patil : जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत मंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी
शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत...
Shivsena Hearing Big Update | शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत असं काय घडलं?
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे...
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे गटाचा युक्तिवाद; पक्षाचे चिन्ह कोणाला मिळणार?
CM फडणवीसांचं मराठा आंदोलनाबाबत मोठं विधान; 12 मागण्या मान्य, एक...
CM फडणवीसांचं मराठा आंदोलनाबाबत मोठं विधान; 12 मागण्या मान्य, एक मागणी... नेमकं काय म्हणाले?
कोल्हापूरच्या महालक्ष्मी गाभाऱ्याची कुडाळमध्ये हुबेहूब प्रतिकृती...
कोल्हापूरच्या महालक्ष्मी गाभाऱ्याची कुडाळमध्ये हुबेहूब प्रतिकृती, पर्यावरणपूरक गणपती देखावा