AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mumbai Rain and Cyclone Tauktae : मुंबईत कधीही न झालेलं वादळ, आढावा घेण्यासाठी आदित्य ठाकरे कंट्रोल रुममध्ये

पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे हे मुंबई महापालिकेच्या कंट्रोल रुममध्ये पोहोचले. तिथून त्यांनी मुंबईतील परिस्थितीचा आढावा घेतलाय.

Mumbai Rain and Cyclone Tauktae : मुंबईत कधीही न झालेलं वादळ, आढावा घेण्यासाठी आदित्य ठाकरे कंट्रोल रुममध्ये
आदित्य ठाकरे यांची मुंबई महापालिकेच्या कंट्रोल रुमला भेट
sagar joshi
sagar joshi | Updated on: May 17, 2021 | 4:47 PM
Share

मुंबई : तौत्के चक्रीवादळाचा फटका कोकण किनारपट्टीसह मुंबई शहर आणि उपनगरांमध्येही मोठ्या प्रमाणात बसल्याचं पाहायला मिळत आहे. मुंबईतील हिंदमाता आणि अन्य सखल भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचलंय. तर अनेक भागात झाडे उन्मळून पडली आहेत. अशावेळी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे हे मुंबई महापालिकेच्या कंट्रोल रुममध्ये पोहोचले. तिथून त्यांनी मुंबईतील परिस्थितीचा आढावा घेतलाय. त्याचबरोबर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना महत्वाच्या सूचनाही केल्या आहेत. वादळाची तीव्रता संध्याकाळ किंवा रात्रीपर्यंत कायम राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुंबईकरांनो विनाकारण घराबाहेर पडू नका, असं आवाहन आदित्य ठाकरे यांनी केलंय. (Aditya Thackeray visits BMC control room on the backdrop of the cyclone)

वादळची दिशा गुजरातकडे आहे, वाऱ्याचा वेग प्रचंड आहे, सखल भागात पाणी साचलंय, जम्बो सेंटर्सच्या मेंटेन्सनची कामं सुरु आहेत, रात्रीपर्यंत ही परिस्थिती अशीच राहील, विनाकारण घराबाहेर पडू नका, हे वादळ आहे, मुंबईत कधीही न झालेलं वारं आपण पाहात आहोत, अशी प्रतिक्रिया आदित्य ठाकरे यांनी दिली आहे. तसंच 160 मिमी, 120 मिमी पाऊस वादळ आणि वाऱ्यासह होतोय. मनुष्यहानी होणार नाही, याची काळजी घेत आहोत. हायटाईड आहे, ती निघून जाईल. पण त्यानंतरही खबरदारी घ्यावी लागेल. कधीही न पाहिलेलं चक्रीवादळ मुंबई आता पाहत असल्याचंही आदित्य ठाकरे म्हणाले.

मुख्यमंत्री, पंतप्रधानांमध्ये चर्चा

त्याचबरोबर चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात चर्चा झाल्याची माहितीही त्यांनी दिलीय. केंद्र आणि राज्यात चर्चा होते, आवश्यक सूचना दिल्या जातात, एकमेकांशी समन्वय साधून, सर्वजण मिळून काम करत आहोत, असंही ते म्हणाले.

चक्रीवादळामुळे  बीकेसी कोविड सेंटरला कोणतेही नुकसान नाही

मुंबईतील वांद्रे-कुर्ला संकुल (बीकेसी) स्थि‍त समर्पित कोविड आरोग्‍य केंद्र (जम्‍बो कोविड सेंटर) संरचनेला ‘तौत्के’ चक्रीवादळाच्‍या प्रभावाने वाहणाऱ्या वादळी वाऱ्यामुळे कोणतेही नुकसान पोहोचलेले नाही. या कोविड केंद्राची मुख्‍य संरचना स्थिर आहे. प्रतीक्षालयातील छताला वादळामुळे हानी पोहोचू नये म्‍हणून प्रशासनाने स्‍वतःच प्रतीक्षालय काढून ठेवले आहे. वादळ आणि पाऊस ओसरताच बीकेसी कोविड सेंटरमध्‍ये स्‍वच्‍छतेसह प्रतीक्षालय पूर्ववत उभारण्‍याचे काम हाती घेण्‍यात येणार आहे.

कोरोना रुग्णांचं सुरक्षित स्थळी स्थलांतर

‘तौत्के’ चक्रीवादळाच्‍या प्रभावामुळे मुंबईत ताशी सुमारे 80 किलोमीटर या वेगाने वारे वाहून मुसळधार पाऊस कोसळण्‍याचा अंदाज लक्षात घेऊन, खबरदारीचा उपाय म्‍हणून महानगरपालिका प्रशासनाने या कोविड केंद्रातील 243 कोविड बाधित रुग्‍णांना शनिवारी रात्रीच इतर रुग्‍णालयांमध्‍ये सुरक्षितपणे स्‍थलांतरित केले आहे. महानगरपालिका आयुक्‍त इकबाल सिंह चहल यांच्‍या निर्देशानुसार अतिरिक्‍त महानगरपालिका आयुक्‍त (पश्चिम उपनगरे) सुरेश काकाणी यांच्‍या मार्गदर्शनाखाली योग्‍य ती सर्व कार्यवाही करण्‍यात आली आहे.

संबंधित बातम्या :

Photo Story: ‘तौक्ते’चा तडाखा, मुंबईत दोन तासात 132 झाडे पडली, सी-लिंक बंद; विमानांचे उड्डाणही थांबवले

Tauktae Cyclone in Mumbai | तौत्के चक्रीवादळ मुंबईपासून 150 किमी अंतरावर, पाऊस आणि वाऱ्याचा वेग वाढणार, ऑरेंज अलर्ट जारी

Aditya Thackeray visits BMC control room on the backdrop of the cyclone

Follow Us
ज्ञानेश कुमार यांच्या आग्रा निवासस्थानाबाहेर आंदोलन, काँग्रेसच्या...
ज्ञानेश कुमार यांच्या आग्रा निवासस्थानाबाहेर आंदोलन, काँग्रेसच्या नेत्यांना अटक
Thane Case : ठाण्यात ठाकरेंच्या पदाधिकाऱ्याला संपवलं, CCTV फुटेज समोर
Thane Case : ठाण्यात ठाकरेंच्या पदाधिकाऱ्याला संपवलं, CCTV फुटेज समोर
छत्रपती संभाजीनगराचे नाव पुन्हा औरंगाबादच करावे; बड्या नेत्याच्या...
छत्रपती संभाजीनगराचे नाव पुन्हा औरंगाबादच करावे; बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ, मनसे आक्रमक
मतदार नोंदणीबाबत मोठी बातमी! Form 6 ची जुनी ऑनलाइन प्रक्रिया सुरू
मतदार नोंदणीबाबत मोठी बातमी! Form 6 ची जुनी ऑनलाइन प्रक्रिया पुन्हा सुरू; अतिरिक्त...
सचिन वाझेचा जामीन कायम राहणार? कोर्टाने पुन्हा सुनावणी नाकारली; कारण..
सचिन वाझेचा जामीन कायम राहणार? कोर्टाने पुन्हा सुनावणी नाकारली; कारण...
कर्जमाफीचा तिसरा हप्ता आला; शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट पैसे जमा...
मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता आला; शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट पैसे जमा...
AI चं नाव बदललं? डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; आता...
Donald Trump : AI चं नाव बदललं? डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; आता Artificial Intelligence नव्हे तर....
अरबी समुद्रात ड्रग्ज तस्करांना झटका! एवढे किलो हेरॉईन-मेथाफेमाईन जप्त
Lakshadweep : अरबी समुद्रात ड्रग्ज तस्करांना मोठा झटका! तब्बल एवढे किलो हेरॉईन-मेथाफेमाईन जप्त; थेट पाकिस्तानी...
माझ्या डॅडला न्याय द्या! प्रदीप पूर्णेकरांच्या मुलाचा टाहो; म्हणाले...
माझ्या डॅडला न्याय द्या! प्रदीप पूर्णेकरांच्या मुलाचा टाहो; मुख्यमंत्र्यांना केलं भावनिक आवाहन, म्हणाले...
प्रदीप पूर्णेकर यांना का संपवलं?; राऊतांनी सांगितलं खरं कारण म्हणाले..
Sanjay Raut : प्रदीप पूर्णेकर यांना का संपवलं?; संजय राऊतांनी सांगितलं खरं कारण, म्हणाले...