Mumbai Rains Maharashtra Weather : कोकणातील 2 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट, राज्यात कुठे कुठे पाऊस होणार?

| Updated on: Sep 05, 2021 | 7:38 AM

रविवारसाठी रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी ऑरेज अलर्ट देण्यात आला आहे तर राज्यातील उर्वरित जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. ऑरेंज अलर्ट दिलेल्या जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे.

Mumbai Rains Maharashtra Weather : कोकणातील 2 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट, राज्यात कुठे कुठे पाऊस होणार?
Rain Update
Follow us on

मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरांत शनिवारी रिमझिम पाऊस झाला. राज्याच्या काही भागांतही पावसाने हजेरी लावली. येत्या 48 तासांत उत्तर आणि मध्य बंगालाच्या उपसागरात हवेच्या कमी दाबाचं क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर आज रविवारी कोकणातील दोन जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट तर राज्यातील उर्वरित जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आलेला आहे.

राज्यात कुठे कुठे पाऊस होणार?

रविवारसाठी रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी ऑरेज अलर्ट देण्यात आला आहे तर राज्यातील उर्वरित जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. ऑरेंज अलर्ट दिलेल्या जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे तर यलो अलर्ट दिलेल्या जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामान शास्त्र विभागाने वर्तवली आहे.

पुढचे चार दिवस राज्यात जोरदार पाऊस हजेरी लावण्याची शक्यता आहे. राज्यात मान्सून वापसीचे संकेत मानले जात आहेत. राज्या आजपासून पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण पट्ट्यात हळूहळू पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. आज रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. या दोन जिल्ह्यांत उद्या अनेक ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी तीव्र मुसळधार पावसाची शक्यता आहे.

पुढचे तीन दिवस पावसाची परिस्थिती कशी असणार?

भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या माहितीनुसार, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, लातूर, परभणी, नांदेड, हिंगोली या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट तर 7 सप्टेंबर रोजी मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, पुणे, नाशिक, औरंगाबाद, जालना या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

8 सप्टेंबर रोजी पालघर, रायगड, रत्नागिरी, सातारा, पुणे या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे. या काळात किनारपट्टीवरच्या मच्छीमारांना सावधानगिरीचा इशारा देण्यात आला आहे.

राज्यात येत्या 4 दिवसांत मुसळधार पावसाचा इशारा

राज्यात येत्या 4 दिवसांत काही ठिकाणी विजांच्या गडगडाटासहित पावसाची शक्यता आहे, तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. कोकणात 6 आणि 7 सप्टेंबरला काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे.

(Mumbai Rain Maharashtra Weather update Todays Rain konkan Ratnagiri Sindhudurg orange Alert many district yellow Alert )

हे ही वाचा :

Mumbai Rains Maharashtra Weather : दक्षिण मुंबईत जोरदार पाऊस, राज्यात विविध ठिकाणी पावसाच्या सरी