Mumbai Rains Maharashtra Weather : दक्षिण मुंबईत जोरदार पाऊस, राज्यात विविध ठिकाणी पावसाच्या सरी

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: |

Updated on: Sep 04, 2021 | 4:29 PM

भारतीय हवामान विभागाच्या पावसाच्या अंदाजानुसार मुंबईसह राज्यातल्या तुरळक ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. राज्यात कालही (शुक्रवार) पावसाने बऱ्याच ठिकाणी दर्शन दिलं होतं. आजही विविध ठिकाणी पाऊस बरसण्याची शक्यता आहे.

Mumbai Rains Maharashtra Weather : दक्षिण मुंबईत जोरदार पाऊस, राज्यात विविध ठिकाणी पावसाच्या सरी
mumbai Rain

मुंबई : भारतीय हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजानुसार राज्यात अनेक भागांत पाऊस कोसळत आहे. दक्षिण मुंबईत तर पावसाने जोरदार हजेरी लावली. तर इतर भागात सध्या ढगाळ वातावरण असून अजूनही काही ठिकाणी रिमझिम पाऊस बरसत आहे. राज्यात काल (शुक्रवार) पावसाने बऱ्याच ठिकाणी दर्शन दिलं होतं. आजही विविध ठिकाणी पाऊस बरसण्याची शक्यता आहे. मुंबईत तर अगदी पहाटेपासून पाऊस सुरु आहे. मुंबईतील चुनाभट्टी, दादर, लालबाग परिसरात जोरदार पावसाने हजेरी लावली.

मुंबईत पहाटेपासून रिमझिम पाऊस

मुंबईमध्ये रात्री अनेक ठिकाणी रिमझिम पाऊस पडत होता. तर उपनगरांत ढगाळ वातावरण पाहायला मिळालं. अगदी आज सकाळी पहाटेपासूनच पावसाने मुंबईकरांना दर्शन दिलं. काही दिवसांच्या विश्रांतीनंतर आता पावसाचं पुनरागमन होत आहे. राज्यात 4 ते 6 सप्टेंबर दरम्यान या दोन दिवशी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

राज्यात येत्या 5 दिवसांत मुसळधार पावसाचा इशारा

राज्यात येत्या 5 दिवसांत काही ठिकाणी विजांच्या गडगडाटासहित पावसाची शक्यता आहे, तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. कोकणात 6 आणि 7 सप्टेंबरला काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे.

राज्याच्या विविध ठिकाणी पाऊस, कुठे आणखी प्रतिक्षा!

वाशिम

हवामान खात्याने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार वाशि च्या मानोरा शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागात जोरदार पाऊस झाला. तीन दिवसांच्या विश्रांतीनंतर जोरदार पाऊस झाल्याने काढणीला आलेल्या उडीद, मूग पिकांचं नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे आधीच अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांच्या चिंतेत आणखी वाढ झाली आहे.

सोलापूर

मध्यरात्री सोलापूर शहरात अर्धा तासा जोरदार पाऊस बरसला. त्यामुळे उकाड्याने त्रस्त असलेल्या नागरिकांना दिलासा मिळाला. दुसरीकडे मात्र ग्रामीण भागात पावसाचा आणखीनही थांगपत्ता नाहीय. त्यामुळे सोलापूरचा ग्रामीण भाग आणखीनही पावसाच्या प्रतिक्षेत आहे.

पुणे

पुण्यात शुक्रवारी पावसाने दर्शन दिलं नाही. आकाश स्वच्छ आणि निरभ्र होतं. दुपारच्या सुमारास ढगाळ वातावरण झालं होतं पण काही वेळातच पुन्हा कडक ऊन पडलं. गुरुवारी पुण्याच्या ग्रामीण भागांत पावसाने हजेरी लावली. पण शुक्रवारी पावसाने दडी मारली.

नंदूरबार 

पावसाळा सुरू होऊन जवळपास दोन महिने उलटले मात्र नंदुरबार जिल्ह्यात यावर्षी सरासरीपेक्षा अत्यल्प पाऊस झाला आहे त्याचा परिणाम पिकांवर झाला असून जिल्ह्यातील काही भागात तिबार पेरणी करावी लागली आहे. जिल्ह्यात अजून चांगला पाऊस न झाल्याने  पिकाच्या उत्पादन क्षमतेवर परिणाम झाला आहे. परिणामी उत्पादन घटल्याने केलेला खर्चही निघणार नसल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. जिल्ह्यात खरीप हंगामामध्ये मोठ्या प्रमाणावर भात, ज्वारी, मका, कापूस, सोयाबीन आणि मिरचीची लागवड केली जाते. मात्र यंदा अवघा तीस टक्के पाऊस पडल्यामुळे आणि रोजच्या हवामान बदलामुळे पिकांवर याचा परिणाम होत आहे.

(Mumbai rains Maharashtra weather update live update today rain lashes in several parts of chunabhatti , dadar, lalbaug)

हे ही वाचा :

मोठी बातमी: चंद्रकांत पाटलांच्या नावाने वनविभागाची पुण्यातील 18 एकर जमीन बळकावण्याचा प्रयत्न

महिलांना दहा जणांची लाथाबुक्क्यांनी मारहाण, रिक्षाचालकाचा प्रताप!

‘ईडीची कारवाई ठराविक पक्ष आणि नेत्यांवरच कशी होते?, पण लढायला आम्ही समर्थ’, शिवसेना नेता गरजला

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI