‘ईडीची कारवाई ठराविक पक्ष आणि नेत्यांवरच कशी होते?, पण लढायला आम्ही समर्थ’, शिवसेना नेता गरजला

ईडी आणि सीबीआय चौकशीवरुन उद्योग मंत्री सुभाष देसाई (Maharashtra Minister Subhash Desai) यांनी भाजप आणि केंद्र सरकारवर निशाण साधलाय. 'ईडीची कारवाई ठराविक पक्ष आणि नेत्यांवरच कशी होते?, अशी शंका त्यांनी उपस्थित केलीय.

'ईडीची कारवाई ठराविक पक्ष आणि नेत्यांवरच कशी होते?, पण लढायला आम्ही समर्थ', शिवसेना नेता गरजला
सुभाष देसाई (औद्योगिकमंत्री, शिवसेना नेते)

अहमदनगर : ईडी आणि सीबीआय चौकशीवरुन उद्योग मंत्री सुभाष देसाई (Maharashtra Minister Subhash Desai) यांनी भाजप आणि केंद्र सरकारवर निशाण साधलाय. ‘ईडीची कारवाई ठराविक पक्ष आणि नेत्यांवरच कशी होते?, अशी शंका उपस्थित करत या सगळ्याविरोधात लढायला आम्ही समर्थ असल्याचं सांगत केंद्र सरकार आणि भाजपविरोधात त्यांनी दंड थोपटले आहेत.

देशात आणि महाराष्ट्रात कसं आणि कोणतं राजकारण चाललंय, हे सध्या सर्वांना माहिती आहे. नेमक्या ठराविक लोकांवर आणि पक्षांवर ईडी कशी काय कारवाई होते, असा सवाल सुभाष देसाई यांनी उपस्थित केलाय. यांचं राजकारण आता सर्वाना कळलंय असून अशा प्रकारच्या कारवायांना महाविकास आघाडीचे नेते तोंड द्यायला समर्थ आहेत, असं म्हणत त्यांनी भाजपविरोधात दंड थोपटले. ते अहमदनगरमध्ये पत्रकारांशी बोलत होते.

त्याचबरोबर मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरेंनी ओबीसी आणि मराठा आरक्षणाच्या मुद्यावर बैठक घेतलीये. राज्य सरकार अत्यंत गंभीर असून दोन्ही समाजाला न्याय मिळण्यासाठी राज्य सरकार आपल्या जबाबदारीतील कामे करायला तयार आहेय. मात्र केंद्राने देखील जबाबदारी घेतली पाहिजे म्हणजे दोन्ही समाजाला न्याय मिळेल असंही ते म्हणाले.

किरीट सोमय्यांचे अनिल परब यांच्यावर गंभीर आरोप

रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील मुरुड समुद्रकिनारी परिवहन मंत्री अनिल परब यांचे दोन अनधिकृत रिसॉर्ट असल्याचा दावा भाजपचे नेते किरिट सोमय्या यांनी केलाय. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेल्या किरीट सोमय्या यांनी परिवहन मंत्री अनिल परब यांच्याविरोधात आणखी एक आरोप केलाय. मुरुड मधील साई रिसॉर्ट एन एक्स हे अनधिकृत आहे, त्याशिवाय अनिल परब यांचे आणखी एक अनधिकृत रिसॉर्ट आहे. हे लपवलेल्या रिसॉर्टचे नाव सी कॉन्च रिसॉर्ट असल्याचा दावा भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केलाय.

महाराष्ट्र कोस्टल झोन ऑथोरिटीकडून कारवाई करण्याचे आदेश दिलेत. या आदेशाच्या पत्रातून हे दुसरं रिसॉर्ट अनधिकृत असल्याचा दावा किरीट सोमय्या यांनी केला. हे दोन्ही रिसॉर्ट अनधिकृत असल्याचं पत्र राज्याच्या पर्यावरण खात्याने देखील दिलंय. मात्र अनिल परब यांचे अनधिकृत दुसरे रिसॉर्ट ठाकरे सरकराने लपवल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केलाय.

(Maharashtra Minister Subhash Desai Doubt ED Action Slam BJP)

हे ही वाचा :

किरीट सोमय्यांच्या राणेंवरील आरोपांचे जुने व्हिडीओ LED वर लावले, शिवसेनेकडून अनोखं स्वागत

Special Report | 12 वा खेळाडू जितेंद्र आव्हाड, लवकरच ईडीची धाड?

किरीट सोमय्या यांचा छगन भुजबळांवर गंभीर आरोप, आता भुजबळांचं प्रत्युत्तर

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI