AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

किरीट सोमय्या यांचा छगन भुजबळांवर गंभीर आरोप, आता भुजबळांचं प्रत्युत्तर

आमच्या न्याय देवतेवर विश्वास आहे आणि त्याप्रमाणे आम्ही कोर्टात लढत आहोत. त्यामुळे मी याबाबत जास्ती बोलणार नाही. एवढंच सांगेन की त्यांनी केलेल्या आरोपांमध्ये काडीमात्र तथ्य नाही, असा दावा भूजबळांनी केलाय.

किरीट सोमय्या यांचा छगन भुजबळांवर गंभीर आरोप, आता भुजबळांचं प्रत्युत्तर
छगन भुजबळ, अन्न व नागरी पुरवठा मंत्री
| Edited By: | Updated on: Sep 01, 2021 | 5:20 PM
Share

मुंबई : महाविकास आघाडी सरकारमधील एका पाठोपाठ एका मंत्र्यावर गंभीर आरोप होत आहेत. भाजपचे खासदार किरीट सोमय्या यांनी आज नाशिकमध्ये पत्रकार परिषद घेत अन्न व नागरी पुरवठा मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांच्यावर गंभीर आरोप केलाय. मुंबईत सांताक्रुझ येथे भुजबळांची 9 मजली इमारत आहे. या इमारतीत अख्खं भुजबळ कुटुंब राहतं. या बिल्डिंगची त्यांचा संबंध काय? असा सवाल सोमय्या यांनी विचारला आहे. किरीट सोमय्या यांच्या आरोपांना आता भुजबळांनीही प्रत्युत्तर दिलंय. (Chhagan Bhujbal responds to BJP leader Kirit Somaiya’s allegations of corruption)

‘गेल्या चार पाच वर्षापूर्वीच त्यांनी आमच्यावर आरोप केले. ईडीला कळवलं. त्या प्रॉपर्टी अटॅच करायला लावल्या. आज दाखवलेली जमीन आहे ती नाशिकपासून 20 किमी लांब एक लहानसा रस्ता होता. त्यावेळेला 1980 मध्ये घेतलेली जमीन आहे. त्यांनी आज शिळ्या कडीलाच उत आणायचा प्रयत्न केला आहे. या सगळ्याबाबत आता सेशन कोर्ट आणि हायकोर्टात केस सुरु आहे. त्या केसेसवर प्रभाव टाकण्याचा त्यांचा हेतू आहे की काय? मला माहिती नाही. आमच्या न्याय देवतेवर विश्वास आहे आणि त्याप्रमाणे आम्ही कोर्टात लढत आहोत. त्यामुळे मी याबाबत जास्ती बोलणार नाही. एवढंच सांगेन की त्यांनी केलेल्या आरोपांमध्ये काडीमात्र तथ्य नाही’, असा दावा भूजबळांनी केलाय.

‘तुमच्यासारखे खोटे आरोप करुन बाकीचे धंदे केले नाहीत’

‘मुंबईतील घराबाबत केलेल्या आरोपांवरही भुजबळ यांनी उत्तर दिलंय. ते जुनं घर होतं. ते पाडून त्यावर 2.5 एफएसआय मिळतो. पुनर्बांधणीच्या स्किममधली ती इमारत आहे. त्यातील अर्ध माळे मूळ मालकाला द्यायचे आहेत आणि अर्धे आमच्याकडे राहणार आहेत. कोर्ट कचेऱ्या चालू असल्यामुळे सध्या ते ठप्प आहे’.

‘त्यांचं हे कामच आहे की वारेमार आरोप करायचे. आमचं वय 75 आहे. त्यावेळी कधी लहान असताना 10 हजार, 15 हजार रुपये एकरनं घेतलेल्या जागा आहेत. त्याचा आता भाव वाढला आणि ते आता तुम्ही सांगता. जणू काही आम्ही 75 वर्षे काय घरातच बसलो होतो काय बोळ्यानं दूध पित? काही काम धंदा आम्ही पण केला आहे ना. अजूनही आमचे काही बिझनेस सुरु आहेत. पण तुमच्यासारखे खोटे आरोप करुन बाकीचे धंदे केले नाहीत आम्ही’, असा टोलाही भुजबळ यांनी सोमय्यांना लगावलाय.

सोमय्यांचे भुजबळांवरील आरोप काय?

किरीट सोमय्या आज नाशिकमध्ये आले होते. त्यांनी छगन भुजबळ यांच्या आर्मस्ट्राँग कंपनीची पाहणी केली. यावेळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. त्यानंतर सोमय्या यांनी मीडियाशी संवाद साधताना भुजबळांवर आरोपाचा भडिमार केला. मुंबईत सांताक्रुझ येथे भुजबळांची 9 मजली इमारत आहे. या इमारतीत अख्खं भुजबळ कुटुंब राहतं. या बिल्डिंगची त्यांचा संबंध काय? ही इमारत परवेज कन्स्ट्रक्शनच्या नावाने आहे. त्याच्याशी तुमचा संबंध काय? या इमारतीचं भाडं तुम्ही भरता की ही इमारतच तुम्ही विकत घेतली आहे? इथे एक खोली कुणी कुणाला राहायला देत नाही, तिथे भुजबळांना 9 मजली इमारत कशी दिली?, ही इमारत बांधण्यासाठीचा पैसा कुठून आला? असे सवाल करतानाच परवेज कन्स्ट्रक्शन ही बोगस कंपनी असून या कंपन्या चालवणारे लोक बनावट आहेत, असा सोमय्या यांनी केला. तसेच येत्या शनिवारी या इमारतीची पाहणी करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.

‘लिस्टमधला 12 वा खेळाडू जितेंद्र आव्हाड’

भुजबळांच्या मालमत्तेची पाहणी केल्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी पत्रकारांनी त्यांना काही प्रश्न विचारले. ईडीच्या लिस्टमधील 12 वा खेळाडू कोण आहे? असा सवाल सोमय्यांना करण्यात आला. त्यावर लिस्टमधला 12वा खेळाडू जितेंद्र आव्हाड आहे, असं मोठं विधान सोमय्या यांनी केलं आहे. तसेच यावर अधिक बोलणं त्यांनी टाळलं. त्यांनी हसून उत्तर देणं टाळलं. त्यामुळे ईडीची पुढची नोटीस आव्हाडांना येणार आहे का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

संबंधित बातम्या :

योग्यवेळी सीडी लावणार; ईडीच्या चौकशीवरून एकनाथ खडसेंचा पुन्हा इशारा

मुंबईतील ‘त्या’ नऊ मजली इमारतीशी तुमचा संबंध काय?; किरीट सोमय्यांचा भुजबळांना सवाल

Chhagan Bhujbal responds to BJP leader Kirit Somaiya’s allegations of corruption

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.