Special Report | 12 वा खेळाडू जितेंद्र आव्हाड, लवकरच ईडीची धाड?

भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी नाशिकमध्ये येऊन मोठा राजकीय बॉम्ब टाकला आहे. ईडीच्या लिस्टमधील 12 वा खेळाडू राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड असल्याचा दावा किरीट सोमय्या यांनी केला आहे.

भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी नाशिकमध्ये येऊन मोठा राजकीय बॉम्ब टाकला आहे. ईडीच्या लिस्टमधील 12 वा खेळाडू राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड असल्याचा दावा किरीट सोमय्या यांनी केला आहे. त्यामुळे ईडीची पुढची नोटीस आव्हाडांना येणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. किरीट सोमय्या यांनी आज नाशिकमध्ये येऊन आधी राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या आर्मस्ट्राँग कंपनीची पाहणी केली. यावेळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. भुजबळांच्या मालमत्तेची पाहणी केल्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी पत्रकारांनी त्यांना काही प्रश्न विचारले. ईडीच्या लिस्टमधील 12 वा खेळाडू कोण आहे? असा सवाल सोमय्यांना करण्यात आला. त्यावर लिस्टमधला 12वा खेळाडू जितेंद्र आव्हाड आहे, असं मोठं विधान सोमय्या यांनी केलं आहे. तसेच यावर अधिक बोलणं त्यांनी टाळलं. त्यांनी हसून उत्तर देणं टाळलं. त्यामुळे ईडीची पुढची नोटीस आव्हाडांना येणार आहे का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. (Kirit Somaiya Claims ED’S next target is Jitendra Awhad?)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI