सूर्याची आग विझली तर काय होईल? पृथ्वीचा विनाश होणार? वाचा…
सूर्य अचानक गायब झाला किंवा त्याची आग विझली तर काय होईल? पृथ्वीवर काय परिणाम होईल? या प्रश्नांची उत्तरे आज आपण जाणून घेणार आहोत.

सूर्य अचानक गायब झाला किंवा त्याची आग विझली तर काय होईल? असा प्रश्न नक्कीच अनेकांच्या मनात आला असेल. सूर्याची आग विझली तर त्याचा पृथ्वीवर काय परिणाम होईल? मानवी जीवन नाश पावणार की आणखी काही होणार? आपली सूर्यमाला नाहीसी तर नाही ना होणार? या सर्व प्रश्नांची उत्तरे आज आपण जाणून घेणार आहोत.
सूर्य हा केवळ पृथ्वीसह इतर ग्रहांना प्रकाश आणि उष्णता देत नाही तर तो आपल्या गुरुत्वाकर्षण शक्तीने पृथ्वीसह सर्व ग्रहांना कक्षेत ठेवतो. अहवालानुसार, सूर्य 4.6 अब्ज वर्षांपासून जळत आहे आणि तो आणखी 5 अब्ज वर्षे जळत राहणार आहे. मात्र भविष्यात सूर्याचे इंधन म्हणजे हायड्रोजन संपेल, त्यानंतर सौरमालेचा नाश होईल.
सूर्याची आग विझल्यावर काय होणार?
सूर्य अचानक विझणार नाही. प्रथम तो लाल रंग धारण करेल आणि त्याच्या जवळील बुध आणि शुक्र या ग्रहांना गिळंकृत करेल. तो पृथ्वीला देखील गिळंकृत करण्याची शक्यता आहे, मात्र असे झाले नाही तरी पृथ्वीचा विनाश होईल. जीवन नाहीसे होईल, कारण उष्णता आणि प्रकाश नसेल, पृथ्वीवर सर्वत्र फक्त बर्फ आणि अंधार असेल.
अशा प्रकारे पृथ्वीचा विनाश होईल
सूर्य नाहीसा झाल्यानंतर पृथ्वीवरील तापमान शून्यापेक्षा खूप खाली जाईल. यामुळे महासागर गोठतील, हवा ही थांबेल आणि जीवन पूर्णपणे नष्ट होईल. त्याचबरोबर अंतराळवीर कोणत्याही अंतराळ स्थानकात अडकतील. काही काळानंतर त्यांचाही मृत्यू होईल. सूर्याचे गुरुत्वाकर्षण संपल्यानंतर सर्व ग्रह आपली कक्षा सोडतील आणि इरतत्र भटकतील. यामुळे अनेक ग्रहांची टक्कर होण्याचीही शक्यता आहे.
मानवाचे काय होईल?
समोर आलेल्या काही अहवालांनुसार सूर्य पूर्णपणे विझण्याच्या आधी मानव पृथ्वीवरून गायब होईल. कदाचित मानव दुसऱ्या ग्रहावर असू शकतो किंवा नसूही शकतो. याचाच अर्थ मानवाचा पूर्णपणे नाश होईल. संपूर्ण सूर्यमाला ही इतिहासात जमा झालेली असेल. ही सूर्यमाला म्हणजे सूर्याची राख आणि त्याच्या आसपास असणारे काही ग्रह अशी दिसेल. मात्र हे सर्व घडण्यासाठी अजून कोट्यवधी वर्षांचा वेळ लागेल. मात्र त्यापूर्वीच युद्ध आणि अणुबॉम्ब किंवा इतर घटनांमुळे मानवजात नष्ट होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
