AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारतातील ‘या’ ठिकाणी पहिली पत्नी नवऱ्याला देते दुसऱ्या लग्नाची परवानगी, कारण आहे खास

भारतात असे एक ठिकाण आहे तिथे पुरुषांना जबरदस्तीने किंवा श्रद्धेमुळे दोन लग्न करावी लागतात. यामागील कारण जाणून घेऊयात.

भारतातील 'या' ठिकाणी पहिली पत्नी नवऱ्याला देते दुसऱ्या लग्नाची परवानगी, कारण आहे खास
Marriage
| Updated on: Jul 19, 2025 | 9:43 PM
Share

भारतात दुसऱ्या लग्नाला परवानगी नाही. मात्र असे एक ठिकाण आहे तिथे पुरुषांना जबरदस्तीने किंवा श्रद्धेमुळे दोन लग्न करावी लागतात. हे ठिकाण म्हणजे राजस्थानातील बारमेर जिल्ह्यातील देरासर गाव. या गावातील प्रत्येक पुरूषाला दोन बायका असतात. आज आपण ही प्रथा काय आहे आणि पुरुषांना दोन लग्न करण्याची परवानगी कशी मिळते याबाबत माहिती जाणून घेऊयात.

या कारणामुळे करतात दोनदा लग्न

देरासर या गावात 70 मुस्लिम कुटुंबे आहेत, यातील एक किंवा दोन घरे सोडता प्रत्येक पुरूषाला दोन बायका आहेत. या गावातील लोक छंद म्हणून नव्हे तर श्रद्धेमुळे दोनदा लग्न करतात. या गावातील लोकांचा असा विश्वास आहे की येथील कोणत्याही व्यक्तीला आतापर्यंत पहिल्या पत्नीपासून मूल झालेले नाही. त्यामुळे त्याचे दुसरे लग्न लावले जाते. या गावातील लोकांना दुसऱ्या पत्नीपासूनच मुले होतात.

या गावातील लोकांनी सांगितले की, ‘गावात कोणालाही पहिल्या पत्नीपासून मुलं होत नाहीत. त्यामुळे दुसरे लग्न केले जाते. त्यानंतर दुसऱ्या पत्नीपासून मुले होतात. मात्र या गावात अशी काही कुटुंबे आहेत ज्यांनी ही परंपरा पाळली नाही आणि एकाच पत्नीसोबत संसार केला, मात्र अशा लोकांना मुले झाली नाहीत.

या गावातील मिठा नावाच्या व्यक्तीने दुसरे लग्न करण्यास नकार दिला होता, मात्र त्याला मुले झाली नाहीत. त्याची पहिली पत्नी वयाच्या 55 व्या वर्षी मरण पावली, त्यामुळे त्याने कुटुंबाच्या दबावामुळे दुसरे लग्न केले. दुसऱ्या पत्नीपासून त्याला एक मुलगी आणि तीन मुले आहेत.

पहिली पत्नी दुसऱ्या लग्नाला का परवानगी देते?

पहिली पत्नी पतीला दुसरे लग्न करण्याची परवानगी का देते असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. मात्र या गावातील पहिली पत्नी दुसऱ्या लग्नाला सहज परवानगी देते. पहिली पत्नी पतीच्या दुसऱ्या बायकोला कोणताही त्रास देत नाही. सगळे एकत्र राहतात. दोघींमध्ये कधीही वाद होत नाही. दुसऱ्या पत्नीपासून झालेली मुलेही त्यांच्या दोन्ही आईंची पूर्ण काळजी घेतात अशी माहिती समोर आली आहे.

तरुणांचा परंपरेला विरोध

नवीन पिढीतील तरुणांनी या परंपरेला विरोध केला आहे. अनेक शिक्षित तरुण वाढत्या महागाईमुळे आणि आधुनिकतेमुळे ही परंपरा पाळत नाहीत, ते दोन लग्न करत नाहीत. यामुळे ही परंपरा हळूहळू संपुष्टात येत आहे. आता ही परंपरा फक्त काही कुटुंबांपुरती मर्यादित राहिली आहे.

'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.