महिलांना दहा जणांची लाथाबुक्क्यांनी मारहाण, रिक्षाचालकाचा प्रताप!

जालना शहरात रिक्षाचालकांच्या मुजोरीचा एक प्रकार समोर आलाय. काल सायंकाळी रिक्षाभाडे ठरवण्यावरुन तीन महिलांना रिक्षाचालकांनी मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणाचा एक व्हिडिओ समोर आल्यानंतर शहरात खळबळ माजली.

महिलांना दहा जणांची लाथाबुक्क्यांनी मारहाण, रिक्षाचालकाचा प्रताप!
शहरात रिक्षाचालकाच्या मुजोरीचा एक प्रकार समोर आलाय. काल (शुक्रवार) सायंकाळी रिक्षाभाडे ठरवण्यावरुन तीन महिलांना रिक्षाचालकांनी मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे.

जालना : शहरात रिक्षाचालकाच्या मुजोरीचा एक प्रकार समोर आलाय. काल (शुक्रवार) सायंकाळी रिक्षाभाडे ठरवण्यावरुन तीन महिलांना रिक्षाचालकांनी मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणाचा एक व्हिडिओ समोर आल्यानंतर शहरात खळबळ माजली.

सदर महिलांचा आणि रिक्षाचालकाचा वाद हा रिक्षाभाडे ठरवण्यावरुन झाला. वादाचं रुपांतर हाणामारीत झालं. संबंधित रिक्षाचालकाने टोकाला जात मित्रांना बोलावून सदर महिलांना मारहाण केल्याचा आरोप आहे.  घटनेप्रकरणी सदर बाजार पोलिस ठाण्यात रिक्षा चालक आणि इतर तीन आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. मारहाण झालेल्या महिलांवर जिल्हा सरकारी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

घटना नेमकी काय?

शहरातल्याच एका ठिकाणी सदर महिलांना जायचं होतं. म्हणून त्यांनी रिक्षाचा आधार घेण्याचं ठरवलं. यावेळी त्यांचा रिक्षा भाड्यावरुन रिक्षा चालकाशी वाद झाला. काल सायंकाळी जालना शहरातील रहेमानगंज भागात ही घटना घडली. मात्र रिक्षाचालकाने त्याच्या 8 ते 10 सहकारी मित्रांच्या सहाय्याने या महिलांना शिवीगाळ करत लाथा बुक्क्यांनी मारहाण केल्याचा आरोप या महिलांकडून करण्यात आलाय.

रिक्षात बसल्यावर चालकाचे बदलले हावभाव, छेडछाडीच्या भीतीने तरुणीने धावत्या रिक्षातून मारली उडी

औरंगाबादमध्ये शहराचा मध्यवर्ती भाग असलेल्या मोंढा नाका ते आकाशवाणी चौकादरम्यान एक तरुणी रिक्षात बसली होती. पण काही अंतरावर गेल्यावर तिला चालकाच्या हावभावावर शंका आली. रिक्षात एकटीच असल्याने तरुणी प्रचंड घाबरली होती. त्यानंतर रिक्षा चालकाचे हावभाव बदलल्यावर तरुणीनं तत्काळ रिक्षा बाजूला घेऊन थांबवायला सांगितले. मात्र तिचे काहीही न ऐकता रिक्षा चालकानं वेगानं रिक्षा चालवायला सुरुवात केली. अखेर छेडछाड किंवा अपहरणाच्या भीतीनं धावत्या रिक्षातून तरुणीने उडी मारली.

थांबवायला सांगितले तरीही वेग वाढवला

रिक्षा चालकाचे हावभाव बदलल्यावर तरुणीनं तत्काळ तो रिक्षा बाजूला घेऊन थांबवायला सांगितले. मात्र तिचे काहीही न ऐकता रिक्षा चालकानं आणखीच वेगानं रिक्षा चालवायला सुरुवात केली. अखेर छेडछाड किंवा अपहरणाच्या भीतीनं धावत्या रिक्षातून उडी मारली.
या प्रकरात तरुणी गंभीर जखमी झाली.

औरंगाबादच्या मुजोर रिक्षाचालकाला 28 ऑगस्टला अटक करण्यात आली. शनिवारी शहरातील मोंढा नाका परिसरातून मुलीचे अपहरण करत रिक्षाचालकाने तिच्यासोबत छेडछाड केली होती. औरंगाबादमधील जिंसी पोलीस आणि क्राईम ब्रांचने ही कारवाई केली आहे. या घटनेमुळे औरंगाबमध्ये चांगलीच खळबळ उडाली होती. आनंद पहुळकर असे अटक करण्यात आलेल्या रिक्षाचालकाचे नाव आहे.

(Dispute over rickshaw fare, rickshaw driver beating women Maharashtra Jalna Video)

हे ही वाचा :

ते अचानक भरदुपारी घरात शिरले, मारहाण आणि शिवीगाळ करु लागले, तुंबळ हाणामारी, डोंबिवलीत खळबळ

जंगलात 11 वर्षीय मुलाच्या मृतदेहाचे तब्बल 11 तुकडे, हत्येचं गूढ उकललं, सत्य समोर येताच पोलीसही चक्रावले

राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्याकडून महिला सरपंचाला मारहाण, पुणे ग्रामीण हादरलं

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI