AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी: चंद्रकांत पाटलांच्या नावाने वनविभागाची पुण्यातील 18 एकर जमीन बळकावण्याचा प्रयत्न

Pune Land | हडपसरमध्ये वनविभागाच्या मालकीची 18 एकर जमीन आहे. वनविभागाची ही जमीन बळकावण्यासाठी फडणवीस सरकारच्या काळात महसूलमंत्री असलेल्या चंद्रकांत पाटील यांची बनावट स्वाक्षरी असलेल्या एका आदेशपत्राचा वापर करण्यात आला.

मोठी बातमी: चंद्रकांत पाटलांच्या नावाने वनविभागाची पुण्यातील 18 एकर जमीन बळकावण्याचा प्रयत्न
चंद्रकांत पाटील, भाजप प्रदेशाध्यक्ष
| Edited By: | Updated on: Sep 04, 2021 | 8:01 AM
Share

पुणे: भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या नावाने वनखात्याची तब्बल 18 एकर जमीन बळकावण्याचा प्रयत्न पोलिसांनी हाणून पाडला आहे. महसूल विभागाच्या सतर्कतेमुळे हा सर्व प्रकार वेळीच लक्षात आला. मात्र, या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली आहे. (Man trying to capture land in pune by using fake orders of bjp former minister Chandrakant Patil)

प्राथमिक माहितीनुसार, हडपसरमध्ये वनविभागाच्या मालकीची 18 एकर जमीन आहे. वनविभागाची ही जमीन बळकावण्यासाठी फडणवीस सरकारच्या काळात महसूलमंत्री असलेल्या चंद्रकांत पाटील यांची बनावट स्वाक्षरी असलेल्या एका आदेशपत्राचा वापर करण्यात आला. हे आदेशपत्र देऊन जमीन बळकावणाऱ्या व्यक्तीने प्रशासनाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. या व्यक्तीने जमिनीच्या सातबाऱ्यावर स्वत:चे नाव लावून घेतले होते. सध्या बाजारभावानुसार हडपसरमधील या जागेची किंमत साधारण 200 कोटी रुपये इतकी आहे. हा प्रकार लक्षात आल्यानंतर महसूल विभागाकडून पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली. त्यामुळे आता पोलीस याप्रकरणात काय कारवाई करणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

अजित पवारांवरही आरोप

काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावरही बारामतीमधील जमीन लाटल्याचा आरोप करण्यात आला होता. याप्रकरणी त्यांच्याविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याचा प्रयत्नही झाला होता. मात्र, न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावली होती. बारामती शहरात जवळपास 3 हजार 408 वर्ग मीटर जमीन अनधिकृतपणे बळकावल्याचा आरोप या याचिकेत करण्यात आला होता. निर्धारित नियमांचं पालन न करता अजित पवार यांनी सदर जमीन ही 99 वर्षाच्या लीजवर आपल्या जवळच्या नगरसेवकाच्या ट्रस्टला देण्याचा आरोप करण्यात आला होता. ही जमीन गतीमंद मुलांच्या शाळेसाठी आरक्षित आहे. मात्र, त्या जमिनीवर थिएटर बनवण्याचा घाट घालण्यात आल्याचे याचिकेत म्हटले होते.

किरीट सोमय्यांचा भुजबळांवर गंभीर आरोप

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे अजून एक बडे नेते छगन भुजबळ यांच्यावर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी एक दिवसापूर्वीच गंभीर आरोप केलाय. छगन भुजबळ यांनी मुंबईत नऊ मजली इमारत बांधली आहे. या इमारतीत संपूर्ण भुजबळ कुटुंब राहत आहे. मात्र, कागदावर परवेज कन्स्ट्रक्सशनची मालकी दाखवली आहे. त्यामुळे भुजबळांनी या परवेजशी आणि इमारतीशी काय संबंध आहे हे स्पष्ट करावं, या परवेजला भुजबळ राहण्याचं भाडं देतात का? की त्यांच्याकडून ही इमारत विकत घेतली आहे, याचा खुलासाही भुजबळ यांनी करावा, अशी मागणी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केली आहे.

इतर बातम्या :

अजितदादांनी पालकत्व स्वीकारलेल्या कारखान्याची अवस्था वाईट! चेअरमन भगीरथ भालके यांच्या राजीनाम्याची मागणी

गणेशोत्सवानिमित्त कोकण वासियांसाठी रेल्वेचं मोठं गिफ्ट, वातानुकूलित विशेष गाड्या उपलब्ध होणार

(Man trying to capture land in pune by using fake orders of bjp former minister Chandrakant Patil)

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.