मुंबई : कोकणात गणपती उत्सवासाठी जाणाऱ्या कोकणवासीयांची सोय लक्षात घेता गणपती उत्सवासाठी मुंबई ते कुडाळ दरम्यान वातानुकूलित विशेष गाड्या उपलब्ध करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दरवर्षी प्रमाणे गणपती उत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या प्रवाश्यांची संख्या अधिक असते. गणपती उत्सवाची मागणी पूर्ण करण्याच्या हेतूने या आधीही रेल्वेने 217 अधिक विशेष गाड्या उपलब्ध केल्या आहेत. आता प्रवाश्यांच्या सोयीसाठी वातानुकूलित 8 विशेष गाड्या उपलब्ध करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असे केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटिल दानवे यांनी आज जाहिर केले. (Special air-conditioned trains are available for the people of Konkan)