Maratha Reservation : राष्ट्रपतींना भेटीसाठी गेलेल्या शिष्टमंडळात एकमत नाही? राष्ट्रपतींनी विचारणा केल्यावर भाजप खासदाराची स्वाक्षरी!

शिष्टमंडळाकडून राष्ट्रपती कोविंद यांना एक निवदेन देण्यात आलं. या निवेदनावर संभाजीराजे यांच्यासह काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या प्रतिनिधीची सही आहे. पण भाजपच्या प्रतिनिधींनी या निवदेनावर सही करणं टाळलं असल्याचं पाहयला मिळत आहे.

Maratha Reservation : राष्ट्रपतींना भेटीसाठी गेलेल्या शिष्टमंडळात एकमत नाही? राष्ट्रपतींनी विचारणा केल्यावर भाजप खासदाराची स्वाक्षरी!
संभाजीराजे आणि शिष्टमंडळ राष्ट्रपती रामनाथ कोविंद याांच्या भेटीला
Follow us
| Updated on: Sep 02, 2021 | 11:59 PM

नवी दिल्ली : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन राज्यातील राजकारण चांगलंच तापलेलं आहे. मराठा संघटनांनी राज्य आणि केंद्र सरकारला इशारा देत आंदोलनाचा पवित्रा घेतलाय. तर दुसरीकडे खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या नेतृत्वात सर्वपक्षीय शिष्टमंडाने आज राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतली. त्यावेळी या शिष्टमंडळाकडून राष्ट्रपती कोविंद यांना एक निवदेन देण्यात आलं. या निवेदनावर संभाजीराजे यांच्यासह काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या प्रतिनिधीची सही आहे. पण भाजपच्या प्रतिनिधींनी या निवदेनावर सही करणं टाळलं असल्याचं पहायला मिळालं. त्यामुळे राष्ट्रपतींना भेटण्यासाठी गेलेल्या शिष्टमंडळात एकी नसल्याचं दिसून आलं. (All party delegation led by Sambhaji Raje Chhatrapati meets President Ramnath Kovind)

दरम्यान, राष्ट्रपतींना भेटण्यासाठी शिष्टमंडळ पोहोचलं त्यावेळी निवेदनावर भाजप खासदारीच स्वाक्षरी नसल्याचं त्यांच्या लक्षात आलं. त्यावेळी राष्ट्रपती कोविंद यांनी याबाबत विचारला केली. राष्ट्रपतीनी चौकशी केल्यानंतर मात्र भाजप खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी सर्वपक्षीय शिष्टमंडळाच्या निवेदनावर स्वाक्षरी केल्याची माहिती मिळतेय.

संभाजीराजे यांनी राज्यातील चारही प्रमुख पक्षांना आपले प्रतिनिधी पाठवण्याचं आवाहन केलं होतं. त्याला राजकीय पक्षांनी सकारात्मक प्रतिसाद देत आपले प्रतिनिधी पाठवले. त्यात शिवसेनेकडून खासदार विनायक राऊत, भाजपकडून रणजितसिंह नाईक-निंबाळकर, राष्ट्रवादीकडून वंदना चव्हाण, तर काँग्रेसकडून संग्राम थोपटे यांचा समावेश होता. दरम्यान, राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या भेटीपूर्वी संभाजीराजे आणि शिष्टमंडळातील अन्य नेत्यांची एक बैठक पार पडली. या बैठकीत सर्व मुद्द्यांवर सविस्तर चर्चा झाली. त्यानंतर या शिष्टमंडळाने राष्ट्रपतींची भेट घेतली.

50 टक्क्याच्या मर्यादेवरुन एकमत नाही

दरम्यान, मराठा आरक्षण प्रश्नी घटनादुरुस्ती करत राज्यांना अधिकार दिले असले तरी 50 टक्क्यांची मर्यादा काढावी अशी मागणी यावेळी काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेकडून करण्यात आली. तशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार वंदना चव्हाण यांनी दिलीय. तर आम्ही आरक्षणासाठी एकत्र आहोत. पण 50 टक्क्यांची मर्यादा वाढवण्यावर एकमत नसल्याचं भाजपचे खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी सांगितलं. तसंच गरज पडल्यास शक्य ती सर्व मदत करणार, असंही रणजितसिंह यावेळी म्हणाले.

Statement to President

सर्वपक्षीय शिष्टमंडळाकडून राष्ट्रपतींना निवेदन

राष्ट्रपतींनी अभ्यासासाठी वेळ मागितला

राष्ट्रपती कोविंद यांची भेट घेतल्यानंतर संभाजीराजे यांनी पत्रकार परिषद घेतली. आम्ही सविस्तरपणे आमची बाजू मांडली. राष्ट्रपतींनी सर्व पार्श्वभूमी ऐकून घेतली आहे. तसंच राजर्षी शाहू महाराज हे आरक्षणाचे जनक असल्याचे उद्गार राष्ट्रपतींनी काढल्याची माहिती संभाजीराजेंनी दिली. तसंच मी तुमचं म्हणणं शांतपणे ऐकून घेतलं आहे. आता मला या विषयी अभ्यासासाठी थोडा वेळ द्या, असं राष्ट्रपतींनी सांगितल्याचं संभाजीराजे म्हणाले.

इतर बातम्या :

MPSC परीक्षार्थींना शनिवारी लोकल प्रवासाची परवानगी, शेलारांच्या पाठपुराव्याला यश

उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका, नेमकं प्रकरण काय?

All party delegation led by Sambhaji Raje Chhatrapati meets President Ramnath Kovind

Non Stop LIVE Update
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?.
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान.
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात.