Mumbai Rain | मुंबईकर सुखावले, मध्यरात्रीपासून पावसाची रिमझिम

| Updated on: Jun 01, 2020 | 8:10 AM

यंदा जून महिन्याच्या पहिल्याच दिवशी मान्सून पूर्व पावसाने ठिकठिकाणी हजेरी लावली आहे. त्यामुळे नागरिकांना दिलासा (Mumbai Maharashtra Rain) मिळाला आहे.

Mumbai Rain | मुंबईकर सुखावले, मध्यरात्रीपासून पावसाची रिमझिम
Follow us on

मुंबई : मुंबईसह महाराष्ट्रात ठिकठिकाणी मान्सून पूर्व पावसाने हजेरी लावली. मुंबईतील चेंबूर, कुर्ला, सायन, अंधेरी, दादर या परिसरात पहाटेच्या सुमारास पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. यामुळे उकाड्याने हैराण झालेल्या मुंबईकरांची सकाळ काहीशी दिलासादायक (Mumbai Maharashtra Rain) झाली.

दरवर्षी महाराष्ट्रात जूनच्या दुसऱ्या आठवड्यापासून पावसाला सुरुवात (Mumbai Maharashtra Rain) होते. मात्र यंदा जून महिन्याच्या पहिल्याच दिवशी मान्सून पूर्व पावसाने ठिकठिकाणी हजेरी लावली आहे. त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

दक्षिणपूर्व आणि लगतच्या मध्यपूर्व अरबी समुद्र आणि लक्षद्वीप भागात कमी दाबाचं क्षेत्र तयार झालं आहे. त्यामुळे चक्रीवादळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे येत्या 48 तासात मुंबईसह ठाणे, पालघर या जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

मुंबई, ठाणे आणि पालघर जिल्ह्यांमध्ये येत्या 3 आणि 4 जून रोजी अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. सध्या राज्यातील काही भागात थोड्या फार पावसाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे राज्यातील नागरिक सुखावले आहेत.

पिंपरी चिंचवड शहरातही जून महिन्याच्या पहिल्या दिवशी पावसाने हजेरी लावली. गेल्या काही दिवसांपासून शहरात प्रचंड प्रमाणात उकाडा जाणवत होता. मात्र रिमझिम पावसाने नागरिक सुखावले आहेत.

जालन्यात वीज पडून शेतकऱ्याचा मृत्यू 

जालना जिल्ह्यात वादळी वारा, विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. जाफराबाद आणि बदनापूर तालुक्यातील चिखली परिसरात जोरदार पाऊस कोसळला. त्यामुळे जाफराबाद तालुक्यातील आळंद परिसरात वीज पडून तरुण शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. प्रभाकर सूर्यभान गायकवाड (27) असे या मृत शेतकऱ्याचे नाव आहे.

पिकांचे नुकसान 

तर पंढरपूरमधील करमाळा तालुक्यात मान्सून पूर्व पावसाला सुरुवात झाली. मात्र यामुळे आंबा, केळी, कांदा पिकांचे नुकसान झाले आहे.

मान्सून केरळात दाखल

भारतीय हवमान विभागाने (IMD) 1 जूनला मान्सून केरळात दाखल होणार असल्याची शक्यता वर्तवली होती. मात्र, बंगालच्या खाडीत निर्माण झालेल्या चक्रीवादळामुळे केरळात  30 मे रोजी आगमन झालं.

यावर्षी मान्सून सरासरी राहणार आहे, अशी माहिती हवामान विभागाने दिली होती. त्यानुसार, यंदाच्या वर्षी 96 ते 100 टक्के पाऊस पडण्याचे भाकित वर्तवण्यात आले आहे. गेल्या वर्षी मान्सून 8 जून रोजी केरळात दाखल झाला (Mumbai Maharashtra Rain) होता.

संबंधित बातम्या : 

सातारा कोल्हापूरमध्ये मुसळधार पाऊस, कुठे गारांचा वर्षाव, तर कुठे वादळाने झाडांची पडझड

Monsoon | मान्सून केरळात दाखल, 2 ते 4 जूनदरम्यान पाऊस मुंबईत बरसणार

Amphan cyclone | अम्फान चक्रीवादळाचा चार दिवस प्रभाव, मान्सून महाराष्ट्रात वेळेवरच येणार : हवामान तज्ज्ञ

कोरोनाचा फटका, मुंबईतील मान्सूनपूर्व कामांचा वेग मंदावला