Mumbai Rains: भूमिगत टाक्यांचा प्रकल्प रखडल्याने यंदा सुद्धा हिंदमाता पाण्याखाली

| Updated on: Jun 09, 2021 | 11:04 AM

मुसळधार पाऊस झाल्यास या परिसरात पाणी मोठ्या प्रमाणात साचते व त्याचा लवकर निचरा होत नाही. अशा वेळी या पाण्याचा निचरा करण्यासाठी महापालिकेमार्फत या भूमिगत टाक्या बांधण्यात येत आहेत. | waterlogging at hindmata area

Mumbai Rains: भूमिगत टाक्यांचा प्रकल्प रखडल्याने यंदा सुद्धा हिंदमाता पाण्याखाली
हिंदमाता आणि किंग्ज सर्कलचा परिसर जलमय
Follow us on

मुंबई: दरवर्षी पावसाळ्यात मुंबईतल्या हिंदमाता परिसरात जलकोंडी पाहायला मिळते. दरवेळी तिथे पूरपरिस्थिती निर्माण होत असून गुडघ्याभर पाणी साचतं (Water Logging). मात्र आता मुंबई महानगरपालिकेचा (BMC) महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे हाती घेतलाय , पण प्रकल्पच पाण्याखाली गेलाय , पालिकेने हा प्रकल्प उशिरा सुरू केल्याने यंदा सुद्धा पहिल्या पावसात हिंदमाताकडे पाणी साचलं आहे. त्यामुळे बेस्ट बसेसच्या वाहतुकीचा मार्ग बदलण्यात आला आहे. (Water logging in Mumbai due to heavy Rain)

भूमिगत टाक्यांचा उपयोग काय?

हिंदमाता परिसरात पावसाळ्यात साचणाऱ्या पाण्यासाठी उपाय म्हणून प्रमोद महाजन उद्यान, हिंदमाता फ्लायओव्हर, सेंट झेव्हियर्स ग्राऊंड इथं बांधण्यात येत आहेत. हिंदमाता परिसर खोल असल्यामुळे पावसाळ्यात त्याठिकाणी पाणी साचते. मुसळधार पाऊस झाल्यास या परिसरात पाणी मोठ्या प्रमाणात साचते व त्याचा लवकर निचरा होत नाही. अशा वेळी या पाण्याचा निचरा करण्यासाठी महापालिकेमार्फत या भूमिगत टाक्या बांधण्यात येत आहेत.

या मोठ्या भूमिगत टाक्या पावसाळ्यामध्ये कमीतकमी तीन तास पावसाचे अतिरिक्त पाणी साठवून ठेवण्यास मदत करतील. जोरदार पर्जन्यवृष्टी तसेच हायटाइडच्या कालावधीमध्ये याचा विशेष उपयोग होईल.पर्जन्यवृष्टी कमी झालं की आणि ओहटी आली की या टाकीतील पाणी पर्जन्यजलवाहिनी मार्फत समुद्रात सोडलं जाईल.त्यामुळे या ठिकाणी साचणाऱ्या पाण्याचा प्रश्न सुटण्यास मदत होईल.

मुंबईत मुसळधार पाऊस, ट्रॅकवर पाणी साचल्याने मध्य आणि हार्बर रेल्वे वाहतूक ठप्प

मुंबईत सकाळपासून पडत असणाऱ्या मुसळधार पावसामुळे मध्य आणि हार्बर रेल्वेची वाहतूक ठप्प झाली आहे. राज्यातील लॉकडाऊनचे निर्बंध शिथील झाल्यानंतर लोकल ट्रेनने प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढली होती. मात्र, आज पहिल्याच पावसात कामावर जाणाऱ्या चाकरमान्यांना मध्य रेल्वे (Local Train) ठप्प झाल्याने गैरसोयीचा सामना करावा लागणार आहे.

मध्य रेल्वेने ट्विट करुन यासंदर्भात माहिती दिली आहे. सकाळपासून पाऊस पडत असल्याने कुर्ला आणि सीएसएमटी या रेल्वे स्थानकांदरम्यानच्या रेल्वे ट्रॅकवर पाणी साचले आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून 9 वाजून 50 मिनिटांनी अप मार्गावरील रेल्वेसेवा थांबवण्यात आली. ट्रॅकवरील पाणी ओसरल्यानंतर ही रेल्वे सेवा पुन्हा सुरु करण्यात येईल, असे मध्य रेल्वेच्या जनसंपर्क कार्यालयाकडून सांगण्यात आले आहे.

संबंधित बातम्या:

मोठी बातमी: मुंबईत मुसळधार पाऊस, ट्रॅकवर पाणी साचल्याने मध्य आणि हार्बर रेल्वे वाहतूक ठप्प

Mumbai Rains Live: मुंबईतील पावसामुळं मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, नवी मुंबई, पनवेलमध्ये जोरदार पाऊस

Mumbai Rains: मुंबईत पावसाची जोरदार बॅटिंग, सखल भागांमध्ये साचले पाणी

(Water logging in Mumbai due to heavy Rain)