Mumbai Rains Live: मुंबईत मोठी दुर्घटना, मालाडच्या मालवणीमध्ये चार मजली इमारतीचा काही भाग कोसळला, पोलीस आणि अग्निशमन दल घटनास्थळी दाखल

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: |

Updated on: Jun 10, 2021 | 12:09 AM

Mumbai Rains and Weather Today Live भारतीय हवामान विभागानं दिलेल्या इशाऱ्यानुसार मुंबईत सकाळपासून पावसानं (Mumbai Rains) हजेरी लावली आहे.

Mumbai Rains Live: मुंबईत मोठी दुर्घटना, मालाडच्या मालवणीमध्ये चार मजली इमारतीचा काही भाग कोसळला, पोलीस आणि अग्निशमन दल घटनास्थळी दाखल
Mumbai Rain Red alert

मुंबई: भारतीय हवामान विभागानं दिलेल्या इशाऱ्यानुसार मुंबईत सकाळपासून पावसानं (Mumbai Rains) हजेरी लावली आहे. मुंबईतील सायन, किंग्ज सर्कल, हिंदमाता याठिकाणी मोठ्याप्रमाणावर पाणी साचले आहे. त्यामुळे वाहनांना पाण्यातून वाट काढणे अवघड झाले आहे. परिणामी या भागात वाहतूक कोंडी पाहायला मिळत आहे. थोड्याचवेळात समुद्रालाही मोठी भरती येणार आहे. या काळात पाऊस असाच सुरु राहिल्यास या भागांमध्ये आणखी पाणी तुंबण्याची शक्यता आहे. सायनमध्ये अनेक घरे आणि दुकानांमध्ये पाणी शिरले आहे. शहर आणि उपनगराच्या परिसरात पहाटेपासून संततधार पाऊस पडताना दिसत आहे. हवामान खात्याने 9 ते 13 जूनदरम्यान मुंबई आणि परिसरात अतिवृष्टीचा इशारा दिला होता. हा अंदाज आता काहीप्रमाणात खरा ठरताना दिसत आहे. (Mumbai rains live Maharashtra weather forecast update today heavy rain alert in Thane Raigad konkan pune monsoon by IMD and skymet mumbai local update)

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
 • 09 Jun 2021 11:59 PM (IST)

  मुंबईत मोठी दुर्घटना, मालाडच्या मालवणीमध्ये चार मजली इमारत कोसळली, पोलीस आणि अग्निशमन दल घटनास्थळी दाखल

  मुंबईच्या मालाड इथला मालवणीमध्ये 8 नंबर गेटसमोर चार मजली इमारत कोसळल्याची माहिती, घटनास्थळी मालवणी पोलीस आणि अग्निशमन दल दाखल, मलब्याखाली काही लोक अडकल्याची प्राथमिक माहिती, बचावकार्य सुरु

 • 09 Jun 2021 10:42 PM (IST)

  मुंबईत पुन्हा पावसाला सुरुवात, दादर, लोअर परळ भागात पुन्हा रिमझिम पावसाला सुरुवात

  मुंबईत पुन्हा पावसाला सुरुवात, दादर, लोअर परळ भागात पुन्हा रिमझिम पावसाला सुरुवात

 • 09 Jun 2021 09:35 PM (IST)

  अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर पालघर जिल्ह्यात एनडीआरएफच्या 2 टीम दाखल होणार

  पालघर : हवामान खात्याकडून अतिवृष्टीचा इशारा देण्यात आल्यानंतर पालघर जिल्ह्यात उद्या एनडीआरएफच्या 2 टीम होणार दाखल. वसई विरार महानगरपालिका साठी एक तर पालघरच्या ग्रामीण भागासाठी एक अशा दोन टीम पालघर मध्ये होणार दाखल . हवामान खात्याच्या अंदाजानुसार पालघरमध्ये काल मध्यरात्रीपासून दमदार पावसाने हजेरी लावल्याने खबरदारी म्हणून एनडीआरएफच्या दोन टीम होणार तैनात . 11 जुने ते 15 जून दरम्यान अतिवृष्टी च्या इशाऱ्यामुळे प्रशासन सज्ज

 • 09 Jun 2021 09:34 PM (IST)

  अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर उल्हासनगर महापालिकेतील लसीकरण केंद्र 3 दिवस बंद राहणार

  अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर उल्हासनगर महापालिकेतील कोरोना लसीकरण केंद्र पुढील 3 दिवस बंद

  तर अंबरनाथमधील लसीकरण उद्याचा दिवस बंद राहणार

 • 09 Jun 2021 08:05 PM (IST)

  अतिवृष्टीमुळे मध्य रेल्वेच्या विशेष गाड्यांमध्ये परिवर्तन

  मध्य रेल्वे मुंबई विभागामध्ये जोरदार अतिवृष्टी झाल्यामुळे विशेष गाड्यांमध्ये परिवर्तन करण्यात आले आहे

  दिनांक 09.06.2021 रोजी मुंबईहून सुटणाऱ्या गाड्या या नियोजित वेळेपेक्षा उशिराने सुटणार आहेत.

  विवरण पुढील प्रमाणे

  1) 02362 मुंबई आसनसोल विशेष नियोजित वेळेपेक्षा 06.50 तास उशिराने सुटेल

  2) 02598 मुंबई गोरखपूर अंतोदय नियोजित वेळेपेक्षा 04.30 तास उशिराने सुटेल

  3) 02322 मुंबई हावडा विशेष व्हाया प्रयागराज नियोजित वेळेपेक्षा 03.45 तास उशिराने सुटेल

  4) 03202 लोकमान्य तिलक टर्मिनस पटना विशेष नियोजित वेळेपेक्षा 04.00 तास उशिराने सुटेल

  5) 02107 लोकमान्य टिळक टर्मिनस लखनऊ विशेष नियोजित वेळेपेक्षा 03.00 तास उशिराने सुटेल

  6) 01081 लोकमान्य टिळक टर्मिनस गोरखपुर विशेष नियोजित वेळेपेक्षा 03.00 तास उशिराने सुटेल

  7) 02141 लोकमान्य टिळक टर्मिनस पाटलिपुत्र विशेष नियोजित वेळेपेक्षा 03.30 तास उशिराने सुटेल

  8) 02193 मुंबई वाराणसी विशेष दिनांक 10.06.2021 ला सुटणारी गाडी नियोजित वेळेपेक्षा 03.50 तास उशिराने सुटेल

 • 09 Jun 2021 06:59 PM (IST)

  वाशिम जिल्ह्यातील मानोरा तालुक्यात मुसळधार पाऊस सुरू

  वाशिम जिल्ह्यातील मानोरा तालुक्यात मुसळधार पाऊस सुरू....

  मृग नक्षत्र लागताच पावसाचे आगमन झाल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे ....

  या पावसामुळे खरिपातील पेरणीला होणार सुरुवात

 • 09 Jun 2021 06:50 PM (IST)

  औरंगाबाद जिल्ह्यातील जुई नदीला तुफान पूर, नदीवरील पूल गेला वाहून

  औरंगाबाद जिल्ह्यातील जुई नदीला तुफान पूर

  जुई नदीला आलेल्या पुरात नदीवरील पूल गेला वाहून

  औरंगाबाद जळगाव महामार्ग गेल्या दोन तासापासून ठप्प

  सिल्लोड तालुक्यातील गोळेगाव परिसरातील घटना

  प्रशासनाचा रस्ता सुरू करण्याचा युद्धपातळीवर प्रयत्न सुरू

 • 09 Jun 2021 06:11 PM (IST)

  पुढील चार दिवस कोकण आणि गोव्यात अतिवृष्टी, विदर्भ आणि मराठवाड्यातही मुसळधार पावसाचा अंदाज

  पुढील चार दिवस कोकण आणि गोव्यात अतिवृष्टीचा इशारा,

  तर विदर्भ आणि मराठवाड्यातही मुसळधार पावसाचा अंदाज,

  नैऋत्य मोसमी पावसानं कोकण आणि महाराष्ट्र व्यापलाय,

  उत्तर महाराष्ट्र किनारपट्टी ते उत्तर केरळ किनारपट्टी भागात द्रोणीय क्षेत्र तयार झाल्यानं पावसाचा अंदाज,

  तर पुणे जिल्ह्यातही पुढचे चार दिवस मुसळधार पावसाचा इशारा,

  पुणे हवामान वेधशाळेनं वर्तवला अंदाज ...

 • 09 Jun 2021 05:56 PM (IST)

  भाईंदर पूर्वेच्या गोडदेव नाक्यावरील साई पॅलेस इमारतीचा चौथा मजला पडला

  मुसळधार पावसामुळे भाईंदर मध्ये एका रिकाम्या इमारतीचा चौथ्या मजल्याचा मलबा पडला..

  भाईंदर पूर्वेच्या एका इमारतीचा सज्जा कोसळला सुदैवाने इमारती मध्ये कोण राहत नसल्याने मोठी हानी टळली

  भाईंदर पूर्वेच्या गोडदेव नाक्यावरील साई पॅलेस इमारतीचे नाव असून,पालिका आज स्वतः इमारत पडण्याचं काम करत आहे.

  मुसळधार पाऊस असल्याने इमारतीच्या सज्जा कोसळला

 • 09 Jun 2021 05:36 PM (IST)

  विदर्भात वेळे आधीच मान्सून दाखल झाल्याने शेतकऱ्यांना आनंद

  विदर्भात मान्सून दाखल

  विदर्भात वेळे आधीच मान्सून दाखल झाल्याने शेतकऱ्यांना आनंद

  12 , 12 आणि 13 जून ला मुसळधार पावसाची इशारा

  नागपूर हवामान विभागाने दिली माहिती

  जून महिन्यात चांगल्या पावसाचा अंदाज

  या वर्षी विदर्भात चांगला पाऊस पडण्याचा अंदाज

 • 09 Jun 2021 05:03 PM (IST)

  बदलापुरात सबवेमध्ये साचलेल्या पाण्यात गाडी अडकली

  बदलापुरात सबवेमध्ये साचलेल्या पाण्यात गाडी अडकली

  बेलवली-कात्रपला जोडणाऱ्या सबवेमधील घटना

  बदलापूरचे सबवे पावसाळ्यात बंद करण्याची गरज

 • 09 Jun 2021 05:01 PM (IST)

  Mumbai Rain Accident | मुंबईतील पूर्व द्रुतगती मार्गावर टेम्पोला अपघात

 • 09 Jun 2021 04:53 PM (IST)

  वडाळा परिसररात 7 तासांपासून ट्राफिक जाम

  मुंबईतील पावसामुळे सखल भागात पाणी साचलं आहे. वडाळा परिसरात 7 तासांपासून ट्राफिक जाम आहे. वडाळ्यात 7 तासापासून वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे.

 • 09 Jun 2021 04:33 PM (IST)

  मुसळधार पावसाचा फटका मुंबईच्या बीकेसी कोव्हीड सेंटरला बसला, पाणी साचल्याचा आरोप फेटाळला

  मुसळधार पावसाचा फटका मुंबईच्या बी के सी कोव्हीड सेंटरला बसलाय. पावसाचे पाणी कोव्हिड सेंटरमध्ये साचल्याचा आरोप कोव्हिड सेंटर चे व्यवस्थापकीय संचालक डॉ राजेश ढेरे यांनी फेटाळला आहे. लसीकरण नित्यनियमाने सुरू आहे. वॉटर लोगिंग होऊ नये यासाठी चार पंप लावून पम्पिंग स्टेशनच्या माध्यमातून पाणी बाहेर नाल्यांमध्ये सोडण्यात येतं अशी माहिती डॉक्टर राजेश ढेरे यांनी दिली आहे

 • 09 Jun 2021 04:20 PM (IST)

  नवी मुंबईत पावसाचा जोर वाढला, सीबीडी बेलापूरचे बस स्टॉप देखील झाले जलमय

  काल रात्रीपासून सुरू असलेला पाऊस अद्यापही सुरूच

  नवी मुंबईत अनेक सखल भागात साठले पाणी

  सीबीडी बेलापूरचे बस स्टॉप देखील झाले जलमय

  नवी मुंबईत आतापर्यंत सरासरी मिलिमीटर 81.52 मिमी पावसाची नोंद

  बेलापुर: 73 mm, नेरुळ 70mm, vashi- 84mm, कोपरखैरणे: 100 mm, ऐरोली : 80 mm पावसाची नोंद

 • 09 Jun 2021 04:19 PM (IST)

  पालघरमध्ये होत असलेल्या मुसळधार पावसामुळे रस्ताच गेला पूर्ण वाहून

  पालघर मध्ये होत असलेल्या मुसळधार पावसामुळे रस्ताच गेला पूर्ण वाहून,

  कोळगाव येथील पालघर बोईसर रोड वर जिल्हा मुख्यालय समोर असलेला रस्ता गेला पूर्ण वाहून,

  पालघर बोईसर रोड वाहतूक दोन तासापासून पूर्ण बंद

 • 09 Jun 2021 04:02 PM (IST)

  रावेर तालुक्यातील जिन्सी येथे वीज पडल्याने दहा जण जखमी

  रावेर  तालुक्यातील विश्राम जिन्सी येथील एका शेतात काम करत असलेल्या परिवार पाऊस सुरु असताना एका ठिकाणी जमा होऊन बसले असता त्यांच्या जवळच वीज पडली व यात 10 जण जखमी झाले आहेत. वीज पडून सर्वजण आठ ते दहा फूट लांब फेकले गेले . दुखापत झाल्यामुळे काहींना रावेर ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी आणण्यात आले.

 • 09 Jun 2021 03:16 PM (IST)

  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मुंबई महापालिकेच्या कंट्रोल रुममध्ये दाखल

  मुंबईतल्या आजच्या पावसानं निर्माण झालेल्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मुंबई महापालिकेच्या आपत्कालीन कक्षात पोहोचले आहेत. मुख्यमंत्री पालिका अधिकाऱ्यांकडून आढावा घेत आहेत.

 • 09 Jun 2021 03:09 PM (IST)

  मुंबईच्या वांद्रे पूर्व इथल्या कलानगर जंक्शनवर पाणी तुंबलं

  मुंबईच्या वांद्रे पूर्व इथल्या कलानगर जंक्शनवर पाणी तुंबलं. कलानगर जंक्शन शेजारचा नाला भरून वाहू लागल्याने वांद्रे पूर्व येथे वाहतूक खोळंबलीय. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान मातोश्री आहे.

 • 09 Jun 2021 02:37 PM (IST)

  मान्सूननं महाराष्ट्राचा 80 टक्के भाग व्यापला, उत्तर महाराष्ट्रात लावणार हजेरी

  मान्सून राज्याच्या उत्तर महाराष्ट्रात लावणार हजेरी,

  वालवड, मालेगाव, नागपूर जिल्ह्यात कोसळणार मान्सून सरी,

  आज दिवसभरात मान्सूननं महाराष्ट्रात 80 टक्के भाग व्यापला,

  नागपूर, नाशिक जिल्ह्यात पावसाचा इशारा ....

 • 09 Jun 2021 02:08 PM (IST)

  मालाडमध्ये मुसळधार पावासमुळं पाणी साचलं

 • 09 Jun 2021 02:05 PM (IST)

  वरळीत पावसानं रस्त्यांना नदीचं स्वरूप, दुचाकी वाहनं पावसानं पडली बंद

  वरळीत पावसानं रस्त्यांना नदीचं स्वरूप

  अनेकांची दुचाकी वाहनं पावसानं पडली बंद

  वरळी , प्रभादेवी परिसरात गेल्या एक तासापासून मुसधार पाऊस

  वरळी गावाचा मुख्य रस्ता पाण्याखाली

  समुद्राच्या भरतीमुळे अनेक ठिकाणी पाण्याचा निचरा न झाल्यामुळे भरलं पाणी

 • 09 Jun 2021 01:51 PM (IST)

  ठाण्यातील वंदना एसटी डेपो याठिकाणी गुडघ्याच्यावर पाणी साचल्यामुळे वाहने अडकून पडली

  ठाण्यात देखिल पावसाने जोरदार बॅटिंग केल्यामुळे मोठ्या प्रमाणात सखल भागात पाणी साचले चित्र दिसून आले. ठाण्यातील वंदना एसटी डेपो याठिकाणी गुडघ्याच्या वर पाणी साचल्यामुळे अनेक वाहने अडकून पडली आहे दरवर्षीप्रमाणे यंदादेखील या भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने दुकानदारांना देखील याचा फटका बसला आहे... त्याच बरोबर वाहनांना देखील मोठा फटका बसला आहे.

 • 09 Jun 2021 01:14 PM (IST)

  मुंबईत 140 ते 160 मिमी पाऊस, एका तासात 60 मिमी पावसाची नोंद: आयुक्त इक्बाल सिंह चहल

  मुंबईत दहिसर सबवे, सायन ट्रॅक, चुनाभट्टी ट्रॅकवर पाणी आलेलं आहे. ही तीन ठिकाण सोडून मुंबईत ट्राफिक बाधित झालेलं नाही. हिंदमाता येथे पाणी साचलं पण तिथं वाहतूक थांबली नाही. हिंदमाताला साडेतीन फुटांपर्यंत पाणी साठलं तरी वाहतूक थांबली नव्हती. मुंबईत 140 ते 160 मिमी पाऊस झाला. एका तासात 60 मिमी पावसाची नोंद झाली.

 • 09 Jun 2021 01:08 PM (IST)

  कल्याण-डोंबिवलीत सकाळपासून पाऊस सुरू,पाणी साचल्याने नागरिक हैराण

  कल्याण-डोंबिवलीत सकाळपासून पाऊस सुरू आहे. आता पावसाने जोर धरला आहे. कल्याण पूर्वेतील दामोदर नगर परिसरात नागरिकांच्या घरात पाणी साचले होते. आता कल्याण पश्चिमेतील शिवाजी चौक परिसरात मुख्य रस्त्यावर पाणी साचल्याने नागरिक हैराण आहेत. नक्की महानगरपालिलेने नाला सफाई केली आहे की नाही असा सवाल उपस्थित केला जात आहे.
 • 09 Jun 2021 01:01 PM (IST)

  भिवंडीमध्ये भरपावसात रस्त्याचा अंदाज न आल्याने शेलार नदीनाका येथे कंटेनर उलटला

  भिवंडीमध्ये भरपावसात रस्त्याचा अंदाज न आल्याने शेलार नदीनाका या ठिकाणी कंटेनर उलटला आहे. यामुळे वाहतूक कोंडी झाली आहे.

 • 09 Jun 2021 12:46 PM (IST)

  भिवंडीत पहाटे पासून सुरू संततधार पाऊस

  भिवंडीत पहाटे पासून सुरू असलेल्या संततधार पावसाने शहरातील अनेक रस्त्यांवर सखल भागात साचले पावसाचे पाणी .

  कल्याण नाका ,बस स्थानक ,तीनबत्ती ,पद्मानगर या भागात साचले पावसाचे पाणी

 • 09 Jun 2021 12:45 PM (IST)

  पाणी साचणार नाही असा दावा केला नव्हता, काही नाले समुद्राच्या खाली असल्यानं पाणी साचणार: किशोरी पेडणेकर

  हिंदमाता परिसरातील पाण्याचा निचरा झाला आहे. पाणी साचणार नाही असा दावा केला नव्हता, असं मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी म्हटलं आहे. साचलेल्या पाण्याचा 4 तासात निचरा होत आहे. काही नाले समुद्राच्या खाली असल्यानं पाणी साचणारंच असं किशोरी पेडणेकर म्हणाल्या. जिथे निष्काळजीपणा दिसेल तिथं कारवाई केली जाईल, असंही त्यांनी सांगितलं. महापौरांनी मुंबई महापालिकेच्या आप्तकालीन विभागाला भेट दिली.

 • 09 Jun 2021 12:39 PM (IST)

  रायगड येथील श्रीवर्धनमध्ये अतिव्रुष्टीमुळे घरावर दरड कोसळली

  रायगड येथील श्रीवर्धनमध्ये अतिव्रुष्टीमुळे घरावर दरड कोसळली, मात्र जिवीतहानी नसली तरी घराचे नुकसान.

  श्रीवर्धन शहरातील रोहीदास आळीत जयवंत ऐटम याच्या घरावर शेजराच्या डोगंराळ भागातील दोन मोठाल्या दगडी येवुन पडल्या.

  तात्काळ या ठिकाणी मंडळ अधिकारी, स्थानिक नगरसेवक मदतीला पोहचले, सुदैवाने जिवीतहानी नाही, घरातील सदस्य मात्र सुखरुप.

  प्रशासनाने रितसर पचंनामा करुन पुढील कारवाई सुरु केली.

 • 09 Jun 2021 12:31 PM (IST)

  नाशिकच्या इगतपुरी सह तालुक्यात पावसाच्या जोरदार सरी पाहायला

  इगतपुरी सह तालुक्यात पावसाच्या जोरदार सरी पाहायला मिळाल्या. आज पहाटेपासून पावसाने जोरदार हजेरी लावली. पावसाच्या सरींनी हवेत गारवा पसलाय. त्यामुळे उकाड्याने त्रस्त असणाऱ्या नागरिकांना दिलासा मिळालाय. 1 जून पासून आता पर्यंत इगतपुरी तालुक्यात 122 मि. मी. पावसाची नोंद झाली असून पावसाच्या आगमनाने बळीराजा सुखावलाय

 • 09 Jun 2021 12:19 PM (IST)

  मुंबईहून गोरखपूर आणि आसनसोलला जाणाऱ्या विशेष रेल्वे गाड्यांच्या वेळा बदलल्या

  मुंबईहून गोरखपूर आणि आसनसोलला जाणाऱ्या विशेष रेल्वे गाड्यांच्या वेळा बदलल्या आहेत. मुंबई आसनसोल 11.05 वाजता सुटणारी गाडी 2.30 मिनिटांनी सीएसएमटीमधून सुटेल. तर, मुंबई गोरखपूर विशेष गाडी 1.30 वाजता सुटणारी गाडी 3.30 वाजता सुटेल.

 • 09 Jun 2021 12:10 PM (IST)

  ठाण्यात मुसळधार पाऊस, मुख्य बाजार पेठ या ठिकाणी पाणी साचले

  ठाण्यात मुसळधार पाऊस सुरु असून पावसाचा जोर वाढला आहे. ठाण्यात ढगाळ वातावरण आहे. चालती वाहने बंद पडल्यामुळे दुचाकी स्वारांची समोर अडचणी निर्माण झाल्या.  नागरिकांना पाण्यातून वाट काढावी लागत आहे.

 • 09 Jun 2021 11:37 AM (IST)

  वसई विरार नालासोपाऱ्यात सकाळी 11 वाजल्यापासून पावसाला सुरुवात , जोरदार पावसाचा अंदाज

  वसई विरार नालासोपाऱ्यात सकाळी 11 वाजल्यापासून रिमझिम पावसासह अधूनमधून जोरदार पाऊस सुरू...

  संपूर्ण परिसरात विजांच्या कडकडाटासह ढगाळ वातावरण आहे...

  मागच्या 24 तासात वसई ताल्युक्यात 70 मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून आतापर्यंत 174 मिलिमीटर पाऊस पडला आहे

  हवामान खात्याच्या अंदाजा नुसार जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे

 • 09 Jun 2021 11:36 AM (IST)

  पुण्यातही पावसाला सुरुवात,पावसामुळे नागरिकांची तारांबळ

  पुण्यातही पावसाला सुरुवात,पावसामुळे नागरिकांची तारांबळ

  दोन दिवसांपूर्वीच मान्सून पुण्यात दाखल झालाय..

  स्वारगेट, डेक्कन, भवानी पेठ, या भागात हलक्या पावसाची हजेरी,

  पुलाखाली थांबून पावसापासून नागरिक करतायेत बचाव,

 • 09 Jun 2021 11:25 AM (IST)

  मुंबई, ठाणे आणि पालघरमध्ये मान्सून दाखल, पुढील 2-3 दिवसात संपूर्ण महाराष्ट्रात सक्रिय होणार

 • 09 Jun 2021 10:52 AM (IST)

  Mumbai Rain Update | मुंबईत पावसामुळे लोकल ट्रॅक पाण्याखाली, मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

 • 09 Jun 2021 10:50 AM (IST)

  ठाण्यात रात्रीपासून पावसाची दमदार हजेरी, 65 मिलीमीटर पावसाची नोंद

  ठाण्यात काल पासून ढगाळ वातावरण आहे मध्य रात्री पासून पावसाने हजेरी लावलेली आहे . काल रात्री पासून पडत असलेल्या पावसामुळे कुठेही अद्याप दुर्घटना घडली नाही. तर आता पर्यंत 65 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

  ठाणे शहरातील रस्ते पूर्ण पणे जलमय झालेले आहे. पावसाच्या या संतत धारेमुळे ठाण्यातील काही सखल भागात पाणी साचण्यास देखील सुरवात झाली आहे.पालिका स्थरावर नाले सफाई च कामे सुरू असल्याचे सांगितले जात आहे मात्र जस जसा पाऊस जोर धरू लागले त्या प्रमाणे मोठ्या प्रमाणात सखोल भागातील रस्त्यावर पाणी साचल्याने चित्र दिसू शकते..तसेच सकाळवेळेस कामावर निघालेल्या ठाणेकरांना या पावसाचा सामना करावा लागत आहे.याचाच आढावा घेतला आहे.

 • 09 Jun 2021 10:49 AM (IST)

  मुंबई लोकलच्या सेंट्रल आणि हार्बर लाईनवरील वाहतूक ठप्प

  मुंबई लोकलच्या सेंट्रल आणि हार्बर लाईन ठप्प झाल्या आहेत. मुंबईत सकाळपासून सुरु असलेल्या पावसामुळे लोकलची वाहतूक ठप्प झाली आहे.

 • 09 Jun 2021 10:43 AM (IST)

  नवी मुंबई, पनवेलमध्ये रात्रीपासून जोरदार पाऊस, पनवेल शहरातील सखल भागता पाणी साचलं

  नवी मुंबई, पनवेलमध्ये पावसाला काल रात्री पासून जोरदार सुरुवात झाली आहे. यामुळे पनवेल शहरातील सखल भागात पाणी साचायला सुरुवात झाली आहे. महाराष्ट्र बँक जवळ असलेल्या काही दुकानांमध्ये पाणी गेल्याने दुकानातील वस्तू फर्निचरचे नुकसान झालेले आहे. नगरसेविका दर्शना भोईर यांनी मनपा प्रशासणाला याबाबत माहिती दिली. सद्या पंपाच्या साह्याने सखल भागात साचलेले पाणी उपसण्याचे काम सुरू आहे. पनवेल शहर सह पनवेल तालुक्यात ही जोरदार पाऊण सुरू झाला आहे.

 • 09 Jun 2021 10:42 AM (IST)

  मुंबई आणि उपनगरात पावसाची दमदार हजेरी

 • 09 Jun 2021 10:40 AM (IST)

  मुंबईत अतिमुसळधार पावसामुळे सेंट्रल रेल्वेची वाहतूक विस्कळीत, किंग्ज सर्कलवर पाणी साचलं

  अतिमुसळधार पावसामुळे सेंट्रल रेल्वे विस्कळीत झाली आहे. सीएसएमटी ते कुर्ला दरम्यान ट्रेन बंद करण्यात आल्या आहेत. सायन स्टेशन, किंग्ज सर्कल, अशा काही ठिकाणी ट्रॅकवर पाणी साचल्याने निर्णय घेतला..

 • 09 Jun 2021 10:36 AM (IST)

  मुंबई लोकलची कुर्ला ते सीएसएमटी वाहतूक स्थगित, सायन स्थानकात पाणी

Published On - Jun 09,2021 10:33 AM

Follow us

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI