AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“जितेंद्र आव्हाड राजकारणातील राखी सावंत, प्रसिद्धीसाठी अजितदादांवर बोलतात”

Jitendra Awhad Statement About Ajit Pawar : जितेंद्र आव्हाड यांच्यावर अजित पवार गटाच्या नेत्याचा हल्लाबोल... थेट केली अभिनेत्री राखी सावंतशी तुलना. या नेत्यानं काय म्हटलंय? अजित पवार आणि जितेंद्र आव्हाड यांच्यातील वाद नेमका काय आहे? वाचा सविस्तर बातमी...

जितेंद्र आव्हाड राजकारणातील राखी सावंत, प्रसिद्धीसाठी अजितदादांवर बोलतात
आयेशा सय्यद
आयेशा सय्यद | Updated on: Dec 07, 2023 | 12:45 PM
Share

अक्षय कुडकेलवार, प्रतिनिधी- टीव्ही 9 मराठी, मुंबई | 07 डिसेंबर 2023 : अजित पवार… राज्याचे उपमुख्यमंत्री आणि जितेंद्र आव्हाड राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आक्रमक नेते… या दोघांमध्ये मागच्या काही दिवसांपासून वाद सुरु आहे. हा वाद सुरु आहे तो फिजिकल फिटनेसला घेऊन… जितेंद्र आव्हाड यांच्या वाढलेल्या पोटावरून अजित पवार यांनी टीपण्णी केली अन् मग जितेंद्र आव्हाड यांनीही त्याला जशास तसं पुराव्यासकट उत्तर दिलं. मग काय? सुरु झाला राष्ट्रवादीच्या दोन गटांमधील वाद… या वादात आता अजित पवार गटातील एका युवा नेत्यानं उडी घेतली. जितेंद्र आव्हाड यांच्यावर टीका करताना थेट अभिनेत्री राखी सावंतचा दाखला देण्यात आला आहे.

आव्हाडांवर टीका

राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांनी जितेंद्र आव्हाड यांच्यावर टीका केली आहे. जितेंद्र आव्हाड हे राजकारणातील राखी सावंत आहेत. ते प्रसिद्धी मिळवण्यासाठी अजितदादा पवार यांच्याबाबत वक्तव्य करत असतात. मात्र त्यांच्या एवढ्या गोष्टी आमच्याकडे आहेत की, दादा मला माफ करा, असं म्हणायची वेळ त्यांच्यावर येईल, असा घणाघात सूरज चव्हाण यांनी केली आहे.

अजित पवार यांनी जितेंद्र आव्हाड यांच्या वाढलेल्या पोटावर टीका केली आहे. त्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनीही अजित पवार यांच्या वाढलेल्या पोटाचा फोटो ट्विट करत उत्तर दिलं. या प्रकरणावर सूरज चव्हाण यांनी ट्विट करत प्रतिक्रिया दिली आहे. हाच तो सिक्सपॅक वाला फोटो…, म्हणत सूरज चव्हाण यांनी आव्हाडांना डिवचलं आहे.

कार्यालयावरून आव्हाडांवर घणाघात

आज विधिमंडळ अधिवेशनासाठी अजित पवार यांच्या शेजारी जितेंद्र आव्हाड यांना कार्यालय देण्यात आलं होतं. मात्र नंतर आव्हाडांच्या नावाची पाटी हटवण्यात आली. यावर सूरज चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली आहे. जितेंद्र विधीमंडळ कार्यालयात त्यांच्या नावाची पाटी लावली. विधीमंडळ हे काही त्यांचं कळवा मुंब्रा मतदारसंघ नाही, असं सूरज चव्हाण म्हणालेत.

रोहित पवारांवर टीकास्त्र

आमदार रोहित पवार यांची युवा संघर्ष यात्रा सध्या सुरू आहे. यावरही सूरज चव्हाण यांनी टीका केली आहे. ही संघर्ष यात्रा नाही तर पिकनीक सुरु आहे. या यात्रेवर मीच नाही संपूर्ण जनता टीका करत आहे. मी फक्त व्हीडीओ ट्वीट केला. यांच्या राशीत कधीच संघर्ष नव्हता आणि संघर्ष यात्रा काढायला लागलेत. राहुल गांधीनी ज्याप्रमाणे देशत भारत यात्रा काढली. तसाच प्रकार रोहित पवार महाराष्ट्रात करत आहेत, असं सूरज चव्हाण म्हणालेत.

Follow Us
उदय सामंत: 'एमआयडीसीच्या समस्यांवर लक्ष, मराठी भाषेला प्राधान्य'
उदय सामंत: एमआयडीसीच्या समस्यांवर लक्ष, मराठी भाषेला प्राधान्य
मराठीची सक्ती नाही मराठीची भक्ती आहे
'मराठीची सक्ती नाही मराठीची भक्ती आहे', रिक्षाचालकांच्या मराठी सक्तीवरून शिंदेंची प्रतिक्रिया
मराठी न बोलल्यास परवाना रद्द करण्याच्या धमक्यांवरचा दुबेंचा इशारा
संजय दुबे यांचा प्रताप सरनाईक यांच्या मराठी भाषेच्या सक्तीला थेट विरोध
प्रवीण दरेकर यांचा नवनाथ वाघमारे यांच्या वक्तव्यावर हल्लाबोल
प्रवीण दरेकर यांचा नवनाथ वाघमारे यांच्या वक्तव्यावर हल्लाबोल:
शरद पवार एनडीएमध्ये जाणार नाहीत, विरोधातच राहणार
पवारांकडून एनडीएमध्ये जाण्याच्या चर्चा फेटाळल्या; पक्ष कार्यकर्त्यांना दिले स्पष्ट निर्देश
देशमुखांचं कारागृह महानिरीक्षकांना पत्र; गैरप्रकारांच्या चौकशीची मागणी
धनंजय देशमुखांचे बीड कारागृह महानिरीक्षकांना पत्र: गैरप्रकार चौकशी आणि आरोपी स्थलांतराची मागणी
भाजप-शिवसेनेतील सुप्त संघर्ष पुन्हा चव्हाट्यावर
भाजप-शिवसेनेतील सुप्त संघर्ष पुन्हा चव्हाट्यावर? ठाण्यातील कार्यक्रमात भाजप नेत्यांची अनुपस्थिती
बेस्ट कामगारांचा बेमुदत संप; प्रलंबित मागण्यांसाठी कर्मचारी आक्रमक
बेस्ट कामगारांचा मंगळवारपासून बेमुदत संप: प्रलंबित मागण्यांसाठी कर्मचारी आक्रमक
पालकमंत्री महाजनांच्याविरोधात पहिल्याच दिवशी ठाकरे गटाचे आंदोलन
नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्याविरोधात पहिल्याच दिवशी ठाकरे गटाचे आंदोलन
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून गरजू रुग्णांना मदत
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून गरजू रुग्णांना अवयव प्रत्यारोपणासाठी मदत