मुंबई बनले ‘हॉट’ शहर, दहा वर्षांतील एप्रिल महिन्यातील सर्वाधिक तापमान

Maharashtra Heatwave Warning:मुंबईत मंगळवारी कमाल तापमान चार अंशानी वाढले होते. यापूर्वी २२ एप्रिल रोजी मुंबईमधील तापमान ३९ अंश सेल्यियसवर पोहचले होते. तो विक्रम मंगळवारी मोडीत निघाला. ३९.७ अंश सेल्सिअस कमाल तापमान नोंदवण्यात आले.

मुंबई बनले 'हॉट' शहर, दहा वर्षांतील एप्रिल महिन्यातील सर्वाधिक तापमान
Follow us
| Updated on: Apr 17, 2024 | 11:26 AM

हवामान विभागाने मुंबई, ठाणे आणि रायगड जिल्ह्यात उष्णतेची लाट येण्याचा इशारा दिला होता. हवामान विभागाचा हा अंदाज खर ठरला. मुंबई शहरातील गेल्या दहा वर्षांतील तापमानाचा उच्चांक नोंदवला गेला. मुंबईत गेल्या दहा वर्षांतील एप्रिल महिन्यातील सर्वाधिक तापमानाची नोंद मंगळवारी झाली. सांताक्रूज केंद्रात सरासरी ३९.७ अंश सेल्सिअस कमाल तापमान नोंदवण्यात आले तर ठाण्यात सरासरी ४२ अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले. या वाढलेल्या तापमानामुळे मुंबईकरांच्या अंगाची लाही लाई होत आहे.

चार अंशानी वाढले तापमान

मुंबईत मंगळवारी कमाल तापमान चार अंशानी वाढले होते. यापूर्वी २२ एप्रिल रोजी मुंबईमधील तापमान ३९ अंश सेल्यियसवर पोहचले होते. तो विक्रम मंगळवारी मोडीत निघाला. ३९.७ अंश सेल्सिअस कमाल तापमान नोंदवण्यात आले. मुंबई शहरात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने तापमानात वाढत आहे. यामुळे मुंबईकर कमालीचे त्रस्त झाले आहेत.

वाढत्या उन्हाचा पक्षांना फटका

वाढत्या उष्म्याचा पक्ष्यांनाही फटका बसू लागला आहे. मुंबईमध्ये १ एप्रिलपासून सुमारे १०० हून अधिक पक्षी व प्राण्यांना उन्हाचा त्रास झाला आहे. एप्रिल महिन्यात सरासरी रोज १० पक्षी रुग्णालयात दाखल केले जात आहेत. वाढत्या उन्हामुळे पक्ष्यांच्या शरीरातील पाणी कमी होते. यामुळे झाडावरून किंवा उडताना अचानक खाली पडून जखमी होत असल्याच्या अनेक घटना घडत आहेत.

हे सुद्धा वाचा

मुंबईमध्ये एप्रिल महिन्यांत १०० हून अधिक पक्षी व प्राण्यांना उन्हाचा त्रास झाला आहे. त्यामध्ये ४० गायी आहेत. तसेच सुमारे ५८ पक्षी जखमी झाले आहेत. यामध्ये २२ कबूतर, १६ कावळे, एक पोपट, दोन मैना, १७ घारींचा वाढत्या उष्म्याने पक्षी त्रस्त समावेश आहे.

हवामान विभागाने दोन दिवस दिला होता इशारा

हवामान विभागाने मुंबई, रायगड, ठाणे शहरात १५ एप्रिल आणि १६ एप्रिल रोजी उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. त्यानुसार या दोन्ही दिवस उष्णतेची लाट आली. सकाळी आणि रात्रीचे तापमान जास्त होते. यामुळे आरोग्य विभागाने नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.

Non Stop LIVE Update
हंडाभर पाण्यासाठी जीवाच रान, विहिरीतून पाणी मिळवण्यासाठी जीवघेणी चढाओढ
हंडाभर पाण्यासाठी जीवाच रान, विहिरीतून पाणी मिळवण्यासाठी जीवघेणी चढाओढ.
अंजली दमानिया रिचार्जवर चालणारी बाई, सुपारी मिळाली की... कुणाची टीका?
अंजली दमानिया रिचार्जवर चालणारी बाई, सुपारी मिळाली की... कुणाची टीका?.
राहुलबाबा को ये क्या हुआ...भाषण सुरू अन् स्वतःच्या डोक्यावरच ओतलं पाणी
राहुलबाबा को ये क्या हुआ...भाषण सुरू अन् स्वतःच्या डोक्यावरच ओतलं पाणी.
पैसे घ्या, पण... ; बिल्डरपुत्रानं पोर्शे कार अपघातानंतर काय म्हटलं
पैसे घ्या, पण... ; बिल्डरपुत्रानं पोर्शे कार अपघातानंतर काय म्हटलं.
BIG Breaking : आता सातबाऱ्यावर आईचंही नाव लागणार, कुणासाठी होणार नियम
BIG Breaking : आता सातबाऱ्यावर आईचंही नाव लागणार, कुणासाठी होणार नियम.
पॅन-आधार लिंक केलंय? नसेल केलं तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची
पॅन-आधार लिंक केलंय? नसेल केलं तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची.
पुणे अपघात अन् आरोप थेट अजितदादांपर्यंत, नार्को टेस्टची होतेय मागणी
पुणे अपघात अन् आरोप थेट अजितदादांपर्यंत, नार्को टेस्टची होतेय मागणी.
लोकसभेत पाठिंबा पण त्याबदल्यात आता मदत नाही? या निवडणुकीत मनसे vs भाजप
लोकसभेत पाठिंबा पण त्याबदल्यात आता मदत नाही? या निवडणुकीत मनसे vs भाजप.
राज्यात 40 पार कोण? महायुती की मविआ? काय म्हणताय राजकीय विश्लेषक?
राज्यात 40 पार कोण? महायुती की मविआ? काय म्हणताय राजकीय विश्लेषक?.
बिल्डरपुत्रान दोन जीव चिरडले अन व्यवस्थेन नियम तुडवले, धंगेकरांचा सवाल
बिल्डरपुत्रान दोन जीव चिरडले अन व्यवस्थेन नियम तुडवले, धंगेकरांचा सवाल.