Corona | विद्यापीठाच्या सर्व परीक्षा रद्द, शिक्षकांना ‘वर्क फ्रॉम होम’ची परवानगी : उदय सामंत

| Updated on: Mar 17, 2020 | 12:47 PM

महाविद्यालयातील सर्व शिक्षकांना 25 मार्चपर्यंत घरी राहून कामकाज करण्यास परवानगी देण्यात आली (Mumbai University Exam Postpone)  आहे.

Corona | विद्यापीठाच्या सर्व परीक्षा रद्द, शिक्षकांना वर्क फ्रॉम होमची परवानगी : उदय सामंत
Follow us on

मुंबई : राज्यात कोरोना विषाणू (कोवीड 19) चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा भाग (Mumbai University Exam Postpone)  म्हणून सर्व महाविद्यालय, विद्यापीठे 31 मार्चपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे. उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी याबाबतची माहिती दिली. तसेच 31 मार्चपूर्वी आयोजित केलेल्या सर्व परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत, असेही उदय सामंत यांनी सांगितले.

उच्च व तंत्र शिक्षण विभागांतर्गत असलेली ग्रामीण (Mumbai University Exam Postpone)  आणि शहरी भागातील सर्व महाविद्यालये, विद्यापीठे तसेच परवानगी असलेले खाजगी क्लासेस बंद असणार आहेत. येत्या 26 आणि 27 एप्रिलला राज्यातील कोरोनाची स्थिती पाहण्यासाठी आढावा बैठक आयोजित केली आहे. त्यानंतर पुढील निर्णय घेण्यात येईल. या नियमांचे सर्व महाविद्यालयांनी आणि विद्यापीठानी तंतोतंत पालन करणे बंधनकारक आहे.

त्याशिवाय सर्व सरकारी/ अनुदानित/ खाजगी शैक्षणिक संस्था/ महाविद्यालये/ अकृषि विद्यापीठे/ तंत्रशास्त्र विद्यापीठे/ तंत्र निकेतने/ अभियांत्रिकी/ औषधनिर्माणशास्त्र/ कला महाविद्यालये या मधील सर्व शिक्षकांना 25 मार्चपर्यंत घरी राहून कामकाज करण्यास परवानगी देण्यात आली आहे.

राज्यात ‘स्टेज 2’चा कोरोना, होम कोरेनटाईन व्यक्तीच्या हातावर निळ्या रंगाचा शिक्का : राजेश टोपे

वसतिगृहात राहणाऱ्या मुलांची काळजी घेण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात येत आहेत. तसेच वसतिगृहातील विद्यार्थ्यांना घरी जाण्याची सुद्धा परवानगी देण्यात येत आहे. राज्यात शिक्षण घेणारे जे विद्यार्थी परदेशात गेले आहेत, त्यांना देशात परत येण्यास निर्बंध घालण्यात आलेले आहेत. विभागामार्फत पुढील अधिकृत सूचना येईपर्यंत कोणत्याही अफवांवर आणि माहितीवर विश्वास ठेऊ नये, असेही उदय सामंत म्हणाले.

त्याशिवाय जर आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास प्रशासकीय कारणास्तव संबंधित विद्यापीठाचे कुलगुरूंसह इतर वरिष्ठांनी निर्देश दिल्यास शिक्षकांना संस्थेत तातडीने हजर राहणे बंधनकारक राहील. तर विद्यापीठाचे कुलगुरू/ उपकुलगुरू/ कुलसचिव/ उपकुलसचिव तसेच महाविद्यालयाचे/ तंत्रनिकेतनांचे प्राचार्य/ संचालक/ अधिष्ठाता व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी नियमितरित्या कार्यालयामध्ये उपस्थित राहणे आवश्यक (Mumbai University Exam Postpone)  आहे.