
मुंबई विद्यापीठ नोंदणीकृत पदवीधर मतदार संघाच्या मतमोजणीत OBC प्रवर्गातून युवासेनेचे उमेदवार मयूर पांचाळ यांचा विजय झाला. सर्वात आधी मयूर पांचाळ यांचाच निकाल समोर आला. त्यांना तब्बल ५३५० मते मिळाली आहेत. त्यांनी अभाविपचे उमेदवार राकेश भुजबळ यांचा पराभव केला आहे. भुजबळ यांना केवळ ८८८ मतांवर समाधान मानावं लागलं आहे. तर दुसरा निकाल हा युवासेनेच्या स्नेहा गवळी यांचा आला. महिला प्रवर्गातून युवासेनेच्या स्नेहा गवळी यांचा विजय झाला आहे. त्यांना ५९१४ मते मिळाली आहेत. त्यांच्याविरोधात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या रेणूका ठाकूर या उमेदवार होत्या. रेणूका यांना केवळ ८९३ मतांवर समाधान मानावं लागलं आहे.

SC प्रवर्गातून युवासेनेच्या शीतल शेठ देवरुखकर यांचा विजय झाला आहे. त्यांना ५४८९ मते मिळाली आहेत. त्यांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे उमेदवार राजेंद्र सायगावकर यांचा पराभव केला आहे. सायगावकर यांना १०१४ मतांवर समाधान मानावं लागलं आहे.

ST प्रवर्गातून युवासेनेचे धनराज कोहचडे हे विजयी झाले आहेत. त्यांना ५२४७ मते मिळाली आहेत. अभाविपच्या निशा सावरा यांचा त्यांनी पराभव केला आहे. निशा सावरा यांना केवळ ९२४ मतांवर समाधान मानावं लागलं आहे. तर NT प्रवर्गातून युवासेनेचे युवासेना शशिकांत झोरे यांचा विजय झाला आहे. त्यांना तब्बल ५१७० मते मिळाली आहेत. त्यांनी अभाविपचे उमेदवार अजिंक्य जाधव यांचा पराभव केला आहे. अजिंक्य यांना १०६६ मतांवर समाधान मानावं लागलं आहे.

या निवडणुकीत सहावा निकाल हा युवासेनेचे प्रदीप सावंत यांचा आला. प्रदीप सावंत यांचादेखील या निवडणुकीत दणदणीत विजय झालाय. ते खुल्या प्रवर्गातून लढले होते. विशेष म्हणजे प्रदीप बाळकृष्ण सावंत हे पहिल्या पसंतीचे 1338 हून अधिक मते घेऊन सलग तिसऱ्यांदा विजयी झाले.

सिनेट निवडणुकीचा सातवा निकालदेखील युवासेनेच्याच बाजूने आला. युवासेनेचे उमेदवार मिलिंद साठम यांचा या निवडणुकीत विजय झाला.

खुल्या प्रवर्गातून युवासेनेचे परम यादव यांचादेखील दणदणीत विजय झाला.