AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबईत भीषण अग्नितांडव! विलेपार्ले परिसरात इमारतीच्या 11 व्या मजल्याला भीषण आग

Mumbai Fire : विले पार्ले पश्चिम येथील चर्च रोडजवळील एका इमारतीच्या 12 व्या मजल्याला भीषण आग लागली आहे. आगीची पातळी लेव्हल-2 असल्याची माहिती समोर आली आहे.

मुंबईत भीषण अग्नितांडव! विलेपार्ले परिसरात इमारतीच्या 11 व्या मजल्याला भीषण आग
mumbai FireImage Credit source: Google
बापू गायकवाड
बापू गायकवाड | Updated on: Aug 12, 2026 | 12:03 AM
Share

मुंबईतून मोठी बातमी समोर आली आहे. विले पार्ले पश्चिम येथील चर्च रोडजवळील एका इमारतीच्या 12 व्या मजल्याला भीषण आग लागली आहे. आगीची पातळी लेव्हल-2 असल्याची माहिती समोर आली असून ही घटना 10 वाजण्याच्या सुमारास घडली आहे. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या असून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या घटनेत 2 जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.

विले पार्ले परिसरात इमारतीला आग

समोर आलेल्या माहितीनुसार, मुंबईतील विले पार्ले पश्चिम, चर्च रोड परिसरात एका 12 मजली इमारतीच्या 11 व्या मजल्यावर आग लागली आहे. ही आग लेव्हल-2 असल्याचे सांगितले जात आहे. या आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग आटोक्यात आणण्याचे काम सुरू आहे. या आगीत 2 जण गंभीर जखमी असून त्यांना जवळील रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले आहे.

आगीची ही घटना ग्राउंड प्लस 12 मजली इमारतीत घडली. मुंबई अग्निशमन दलाने रात्री 10.08 वाजता या घटनेला लेव्हल-1 (किरकोळ) घोषित केले. त्यानंतर रात्री 10.16 वाजता आगीची तीव्रता वाढल्याने लेव्हल-2 (मध्यम) करण्यात आली. मुंबई अग्निशमन दलाला रात्री 10.02 वाजता आगीची माहिती मिळाली होती. त्यानंतर रात्री सुमारे 10.26 वाजता घटनेबाबत अपडेट जारी करण्यात आले.

अग्निशमन दल घटनास्थळी दाखल

या घटनेची माहिती मिळताच मुंबई अग्निशमन दल, मुंबई पोलीस, अदानी, 108 रुग्णवाहिका सेवा आणि वॉर्ड कर्मचाऱ्यांना घटनास्थळी पाचारण करण्यात आले. अग्निशमन दलाचे जवान आणि इतर आपत्कालीन पथके इमारतीत बचाव व आग नियंत्रणाचे काम करत होते. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत आगीच्या या घटनेत 2 जणांना दुखापत झाल्याची माहिती समोर आलेली नाही. आगीचे नेमके कारण आणि झालेल्या नुकसानीची माहिती अद्याप समोर आलेली नाही. मुंबई अग्निशमन दलाचे जवान या आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. ही आग नेमकी कशामुळे लागली याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.

Follow Us
राज ठाकरे यांचा मुंबईत ईव्हीएमविरोधात विशाल मोर्चा, तिरंगा घेऊन...
राज ठाकरे यांचा मुंबईत ईव्हीएमविरोधात विशाल मोर्चा, तिरंगा घेऊन सहभागी होण्याचे आवाहन
मुंबईच्या आझाद मैदानावर उपवर्गीकरण आंदोलन; मातंग समाजातील आंदोलक...
मुंबईच्या आझाद मैदानावर उपवर्गीकरण आंदोलन; मातंग समाजातील आंदोलक आणि पोलिसांमध्ये झटापट
राज ठाकरे-राहुल गांधींमध्ये संवाद? संजय राऊतांच्या विधानाने राजकीय...
राज ठाकरे-राहुल गांधींमध्ये संवाद? संजय राऊतांच्या विधानाने राजकीय चर्चांना उधाण
बँक ऑफ इंडियाच्या इमारतीत अचानक आग; चौथ्या मजल्यावर धुराचे लोट...
Pune : बँक ऑफ इंडियाच्या इमारतीत अचानक आग; चौथ्या मजल्यावर धुराचे लोट, अग्निशमन दलाकडून युद्धपातळीवर बचावकार्य सुरू
राज्यातील धरणांमध्ये सरासरी किती टक्के पाणी साठा शिल्लक?
Water Level In Dams : पुढील 9 महिने पाण्याची चिंता वाढणार? राज्यातील धरणांमध्ये सरासरी किती टक्के पाणी साठा शिल्लक?
इंडिया ब्लॉक-मविआच्या भवितव्यावर राऊतांचं मोठं वक्तव्य; शरद पवार हे...
Sanjay Raut : इंडिया ब्लॉक-मविआच्या भवितव्यावर राऊतांचं मोठं वक्तव्य; शरद पवार हे....
अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणासाठी राज्यभरातून आंदोलक मुंबईत दाखल
SC Reservation : निर्णय झाला, पण अंमलबजावणी कुठे? अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणासाठी राज्यभरातून आंदोलक मुंबईत दाखल
मुख्य निवडणूक अधिकारी चोक्कलिंगम यांचं ECIला पत्र; काय आहेत मागण्या?
S. Chockalingam : मुख्य निवडणूक अधिकारी चोक्कलिंगम यांचं ECIला पत्र; काय आहेत मागण्या?
बुलढाण्याचा बिहार झालाय, पुन्हा...; महालेंचा विरोधकांवर हल्लाबोल
Shweta Mahale : बुलढाण्याचा बिहार झालाय, पुन्हा...; श्वेता महालेंचा विरोधकांवर हल्लाबोल
4 ऑक्टोबरच्या महामोर्चाचा मार्ग आज ठरणार?; भायखळा ते....
Thackeray Brothers : 4 ऑक्टोबरच्या महामोर्चाचा मार्ग आज ठरणार? राज-उद्धव ठाकरे 11.30 वाजता पत्रकार परिषद घेणार; भायखळा ते...