AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! मृतांचा मेंदू, हृदय आणि… कलिंगड खाऊन कुटुंबातील त्या मृत्यूंप्रकरणी अत्यंत धक्कादायक खुलासा…फॉरेन्सिक चाचणीत नेमकं काय?

Watermelon Death Case Update: मुंबईतील पायधुणी येथील डोकाडिया कुटुंबाने बिर्याणी खाल्ल्यानंतर कलिंगड खाल्ले. त्यानंतर संपूर्ण कुटुंबच संपले. याप्रकरणी आता मोठी धक्कादायक बाब समोर आली आहे. फॉरेन्सिक चाचणीत अत्यंत धक्कादायक खुलासा समोर आला आहे.

मोठी बातमी! मृतांचा मेंदू, हृदय आणि... कलिंगड खाऊन कुटुंबातील त्या मृत्यूंप्रकरणी अत्यंत धक्कादायक खुलासा...फॉरेन्सिक चाचणीत नेमकं काय?
कलिंगड खाल्ल्याने मृत्यूप्रकरणात धक्कादायक खुलासाImage Credit source: एजन्सी
| Updated on: May 01, 2026 | 10:20 AM
Share

Dokadia Family Watermelon Death Case Update: कलिंगड खाल्ल्यानंतर एकाच कुटुंबातील चौघांच्या मृत्यूप्रकरणी मोठी अपडेट समोर येत आहे. मुंबईमधील पायधुणी येथील डोकाडिया कुटुंबातील चार सदस्यांचा या घटनेत मृत्यू झाला होता. या कुटुंबाने रात्री बिर्याणी खाल्ली. तर मध्यरात्री कलिंगड खाल्ले होते. त्यानंतर सकाळी उलट्या आणि जुलाबाचा त्रास त्यांना झाला. त्यानंतर कुटुंबातील सदस्यांचा मृत्यू झाला. आता याप्रकरणात फॉरेन्सिक चाचणीचा धक्कादायक अहवाल समोर आला आहे.

मृतांचे महत्त्वाचे अवयव हिरवट

फॉरेन्सिक अहवालानुसार, डोकाडिया कुटुंबातील मृतांचे महत्वाचे अवयव हिरवट पडल्याचे प्राथमिक चाचणीत समोर आले आहे. मृतांचा मेंदू, हृदय आणि आतडी हिरवट पडल्याची माहिती समोर आली आहे.तज्ञांच्या मते सामान्य अन्न विषबाधेपेक्षा ही स्थिती वेगळी आहे. विषबाधेची शक्यता डॉक्टरांकडून वर्तवण्यात आली आहे. असे बदल जेव्हा एकाच वेळी अनेक अवयवांमध्ये दिसतात, तेव्हा एखाद्या विषारी घटका शरीरात पसरतो, असे  डॉक्टरांचे संकेत आहेत. नवीन खुलास्यामुळे चौघांच्या मृत्यूला घेऊन संशय आणखीन बळावला आहे. तर अब्दुल्ला यांच्या शरीरात मोर्फिन देखील आढळले आहे.

फॉरेन्सिक लॅबच्या अहवालाने धक्का

गेल्या शनिवारी डोकाडिया कुटुंबियांनी बिर्याणी खाल्ली आणि नंतर झोपण्यापूर्वी कलिंगड खाल्ले होते. सकाळी त्यांना उलट्या आणि जुलाबाचा त्रास झाला. तातडीने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. रविवारी अब्दुल्ला डोकाडिया, त्यांची पत्नी आणि दोन अल्पवयीन मुलींचा जे. जे. रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. शवविच्छेदन अहवालात त्यांच्या शरीरात वेदनानाशक औषधांचे घटक आढळले होते. अन्न आणि औषध प्रशासनाने डोकाडिया यांच्या घरातून बिर्याणी, कलिंगड, माठातील पाणी, शिजवलेला व कच्चा भात, चिकन, खजूर आणि मसाले असे 11 प्रकारचे नमुने जप्त केले होते.

पण केवळ अन्नातून इतक्या लवकर विषबाधा कशी होऊ शकते हा तज्ज्ञांसमोर यक्ष प्रश्न होता. याप्रकरणी रासायनिक प्रयोगशाळेत ही नमुने पाठवण्यात आले होते. फॉरेन्सिक अहवालानुसार डोकाडिया कुटुंबातील मृतांचे महत्वाचे अवयव हिरवट पडल्याचे समोर आले आहे. आता हा घातपात आहे की, एखाद्या औषधाची तीव्र प्रतिक्रिया आहे या दिशेने तपासाची चक्र फिरण्याची शक्यता आहे. डोकाडिया कुटुंबीयांनी 25 एप्रिल रोजी रात्री बिर्याणी खाल्ली आणि मध्यरात्री कलिंगड खाल्ले होते. चौघांनाही उलट्या, चक्कर आणि पोटदुखीचा त्रास सुरू झाला. दोन्ही मुली बेशुद्ध आढळल्या. रुग्णालयात नेताच एका मुलीला डॉक्टरांनी मृत घोषीत केले. दुसऱ्या मुलीच्या मृत्यूनंतर पालकांचा मृत्यू झाला.

Follow Us
शिवसेना कुणाची हे तर... आजच सुनावणी पार पडली अन् शिंदे गटातील महिला...
शिवसेना कुणाची हे तर... आजच सुनावणी पार पडली अन् शिंदे गटातील महिला नेत्याचं मोठं विधान
दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंनी मांडली भूमिका, स्वतः ट्वीट...
दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंनी मांडली भूमिका, स्वतः ट्वीटद्वारे केला खुलासा!
माझा मुंबईत जाऊनच जीव निघालाा तर... जरांगे पाटलांची प्रतिक्रिया...
माझा मुंबईत जाऊनच जीव निघालाा तर...  आंदोलनाविषयी मनोज जरांगे पाटलांची मोठी प्रतिक्रिया!
त्यांच्यांतील लोकंच म्हणातात, जरांगे आंदोलनस्थळी... छगन भुजबळ नेमकं...
त्यांच्यांतील लोकंच म्हणातात, जरांगे आंदोलनस्थळी... छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?
बीड पाटोदा रस्त्यावर मराठा आंदोलकांचा रास्ता रोको; चलो मुंबईचा नारा...
बीड पाटोदा रस्त्यावर मराठा आंदोलकांचा रास्ता रोको; चलो मुंबईचा नारा...
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, डॉक्टरांनी दिली महत्त्वाची...
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, डॉक्टरांनी दिली महत्त्वाची माहिती
बिमारी का बहाना है, तुम्हे मुंबई... गुणरत्न सदावर्तेंनची जरांगेंवर...
बिमारी का बहाना है, तुम्हे मुंबई... गुणरत्न सदावर्तेंनची मनोज जरांगेंवर अजब कविता
...तरच राष्ट्रवादीचं विलिनीकरण शक्य; त्या एका अटीबाबत रोहित पवारांची..
...तरच राष्ट्रवादीचं विलिनीकरण शक्य; त्या एका अटीबाबत रोहित पवारांची मोठी प्रतिक्रिया
PM मोदींच्या सेवायात्रेत महाराष्ट्र महत्त्वाचा भाग! कृष्णराज महाडीक...
PM मोदींच्या सेवायात्रेत महाराष्ट्र महत्त्वाचा भाग! कृष्णराज महाडीक यांनी सांगितला भाजपचा खास प्लॅन
तीन टेस्ट, पक्षाची संघटना ते निवडणूक आयोगाची भूमिका, शिंदे गटाचा युक्त
तीन टेस्ट, पक्षाची संघटना ते निवडणूक आयोगाची भूमिका, शिंदे गटाचा युक्तिवाद काय? वाचा महत्त्वाचे मुद्दे