AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबईतील 7 सर्वात महागडे परिसर, दोन चार नव्हे 92 अब्जाधीश राहतात या भागात; तुम्हाला माहीत आहे काय?

मुंबई हे भारताचे आर्थिक केंद्र असून येथील अनेक परिसर अत्यंत महागडे आहेत. मलबार हिल, कफ परेड, ताडदेव, जुहू, वांद्रे आणि वरळी हे काही प्रसिद्ध महागडे परिसर आहेत. या ठिकाणी अब्जाधीश आणि सेलिब्रिटीज राहतात. या भागात जागांची कमतरता आणि वाढती मागणी यामुळे मालमत्तांचे दर आकाशाला भिडले आहेत.

मुंबईतील 7 सर्वात महागडे परिसर, दोन चार नव्हे 92 अब्जाधीश राहतात या भागात; तुम्हाला माहीत आहे काय?
| Edited By: | Updated on: Jan 02, 2025 | 4:34 PM
Share

मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. या ठिकाणी आपलं हक्काचं घर असावं असं प्रत्येकाला वाटत असतं. त्यामुळे प्रत्येकजण त्यासाठी धडपडत असतो. त्यातही अत्यंत अलिशान भागात आपलं घर असावं असं अनेकांना वाटत असतं. त्यादृष्टीने त्यांचा प्रयत्नही असतो. पण मुंबई अत्यंत महाग आहे. या शहरात सर्वच येऊन राहतात. जागा कमी आणि माणसं जास्त. शिवाय जगभरातील असंख्य कंपन्या मुंबईत. बॉलिवूड मुंबईत. त्यामुळे श्रीमंतांचा भरणाही मुंबईत. त्यामुळे मुंबईत घर घेणं म्हणजे दिव्य कामच आहे. मुंबईतील अनेक परिसर तर अत्यंत महागडे आहेत. त्याला कारणही तसंच आहे. कारण या भागात अब्जाधीश राहतात. त्यामुळे या परिसरांना भाव येणार नाही तर काय?

मुंबई शहरात एकूण 92 अब्जाधीश आहेत. म्हणजे चीनची राजधानी बिजींगमध्येही एवढे अब्जाधीश नाहीत तेवढे एकट्या मुंबईत आहेत. समुद्र किनाऱ्यावर असलेल्या या शहरात उद्योगपती, बॉलिवूड कलाकार, क्रिकेट खेळाडू यांच्यासह असंख्य नावाजलेली लोकं राहतात. एक परिसर तर असा आहे, त्या ठिकाणी अब्जाधीशच राहतात. अब्जाधीशांची आळीच जणू. त्यामुळे हे परिसर महागडे आहेत. कोणते परिसर आहेत हे यावर टाकलेला हा प्रकाश.

मलबार हिल

मुंबईतील सर्वात महागडा परिसर म्हणजे मलबार हिल. या ठिकाणी प्रतिष्ठांची घरे आहेत. सर्वात श्रीमंतांची घरे आहेत. गोदरेज इंडस्ट्रीजचे चेअरमन नादिर गोदरेज सारख्या अब्जाधीशांचं घर याच भागात आहे. भारतातील दुसरी सर्वात श्रीमंत महिला रेखा झुनझुनवाला यांचं घरही याच परिसरात आहे. त्यांनी 118 कोटीत या ठिकाणी फ्लॅट घेतलाय.

कफ परेड

कफ परेड परिसर दक्षिण मुंबईत आहे. हा सुद्धा अत्यंत महागडा परिसर आहे. दिवंगत उद्योगपती रतन टाटा यांचं घर याच ठिकाणी आहे. या परिसरात अत्यंत महागडी घरे आहेत. फाइव्हस्टार हॉटेलही याच परिसरात आहे. नरीमन प्वॉइंटचा समुद्र हा या भागाचं वैशिष्ट्ये आहे.

ताडदेव

दक्षिण मुंबईतील ताडदेव हा भागही तितकाच महागडा. या ठिकाणी देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी राहतात. त्यांचा अँटिलीया याच ठिकाणी आहे. अंबानी परिवार या ठिकाणी राहतो. ताडदेवमध्ये असंख्य व्यासायिक मालमत्ता आहेत. शैक्षणिक संस्था आहेत. या परिसरातील मालमत्तांच्या रेट्स गेल्या काही दिवसांपासून वाढत आहेत.

जुहू

जुहू हे मुंबईतील खास आकर्षणाचं केंद्र आहे. याच परिसरात जुहू चौपाटी आहे. या चौपाटीवर फिरण्यासाठी जगभरातून लोक येतात. जुहूमध्ये बॉलिवूड कलाकार मोठ्या प्रमाणावर राहतात. अमिताभ बच्चन, अक्षय कुमार, ऋतिक रोशन, अजय देवगन यांची घरे याच ठिकाणी आहे. त्यामुळे हा परिसरा अत्यंत महागडा मानला जातो.

वांद्रे

वांद्रे परिसरही महागडा आहे. वांद्रे हे बॉलिवूडच्या कलाकारांचं ठिकाण आहे. या ठिकाणी साहित्यिकही राहतात. मोठे कलावंत राहतात. शाहरुख खानचा मन्नत बंगला याच ठिकाणी आहे. तर सलमान खानही बांद्र्यातच राहतो. उद्धव ठाकरेही याच परिसरात राहतात. अभिनेता सुकुमारन यांनी बांद्रा पश्चिमेच्या पाली हिल येथे 30 कोटीचा डुप्लेक्स खरेदी केला होता.

वरळी

वरळी आणि कुलाबा या ठिकाणी अत्यंत उंच इमारती आहे. या ठिकाणी कार्पोरेट ऑफिस आहेत. त्यामुळे हा परिसर आता धनिकांचा आवडता स्पॉट झाला आहे. वरळीनंतर कुलाब्यातही प्रतिष्ठित लोक राहू लागले आहेत. कुलाब्यात गेट वे ऑफ इंडिया आहे. समोरच ताज हॉटेल आहे. मंत्रालय आहे. त्यामुळे हा परिसर पर्यटकांचंही आकर्षणाचं केंद्र ठरत आहे.

नगरसेवक बनायचं असेल तर... इच्छुक उमेदवारांवर गडकरींचं खास शैलीत सल्ला
नगरसेवक बनायचं असेल तर... इच्छुक उमेदवारांवर गडकरींचं खास शैलीत सल्ला.
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत भाजपचाच महापौर... नरेंद्र पवाराचा दावा
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत भाजपचाच महापौर... नरेंद्र पवाराचा दावा.
कार ते एक गुंठा जमीन, पुण्यात उमेदवाराकडून मतदारांना भन्नाट ऑफर्स
कार ते एक गुंठा जमीन, पुण्यात उमेदवाराकडून मतदारांना भन्नाट ऑफर्स.
शेलारांना आठवले चावले, त्यांना पक्षात..संदीप देशपांडे यांची बोचरी टीका
शेलारांना आठवले चावले, त्यांना पक्षात..संदीप देशपांडे यांची बोचरी टीका.
...हे श्रीमंत भिकाऱ्यांचं लक्षण, संजय राऊत यांची भाजपवर जहरी टीका
...हे श्रीमंत भिकाऱ्यांचं लक्षण, संजय राऊत यांची भाजपवर जहरी टीका.
नाशकात भूंकप, युतीनंतर ठाकरे बंधूंना धक्का; मनसे-ठाकरे नेते भाजपवासी
नाशकात भूंकप, युतीनंतर ठाकरे बंधूंना धक्का; मनसे-ठाकरे नेते भाजपवासी.
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक.
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित.
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?.
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया.