AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Eknath Shinde: माझ्या पतीला प्रेशराईज केलं जातंय, बंडखोर आमदार नितीन देशमुखांच्या पत्नीची तक्रार, एकनाथ शिंदेवर थेट आरोप

सूरतला तुमच्या पतीला भेटण्यासाठी जात असला तरी तुम्हाला त्या ठिकाणी भेटायला देणार का त्यावेळी त्यांनी सांगितले की, नितीन देशमुखे माझे पती आहेत. त्यामुळे पतीला भेटण्यासाठी मला कोण आडवणार आहे

Eknath Shinde: माझ्या पतीला प्रेशराईज केलं जातंय, बंडखोर आमदार नितीन देशमुखांच्या पत्नीची तक्रार, एकनाथ शिंदेवर थेट आरोप
प्रांजली देशमुख पती आमदार नितीन देशमुखांना भेटण्यासाठी सूरतला रवाना होणारImage Credit source: tv9marathi
| Updated on: Jun 21, 2022 | 11:14 PM
Share

मुंबईः विधान सभा निकालानंतर नाराजी नाट्यामुळे आणि एकनाथ शिंदे यांच्या आपल्यासोबत 35 आमदार आहेत असा दाव्यामुळे राज्यातील राजकारण ढवळून निघाले. एकनाथ शिंदे यांच्या बरोबर असलेले 35 आमदारांनी आपली सूरतमधून सुटका करा अशी मागणी केल्याची माहिती संजय राऊत यांनी सांगितले होते. त्यानंतर काही वेळातच अकोला जिल्ह्यातील शिवसेनेचे बाळापुरचे आमदार नितीन देशमुख हरवल्याची तक्रार त्यांची पत्नी प्रांजली देशमुख यांनी केली होती. अशी तक्रार त्यांनी शहरातील सिव्हील लाईन पोलीस ठाण्यात केली होती.

त्यानंतर काही वेळानंतर नितीन देशमुख यांच्या छातीत कळ आल्याचे कारण सांगत सूरतमधील सिव्हिल रूग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले.

गुजरातला गेल्यावरच छातीत कसं दुखू लागलं

त्यानंतर एकनाथ शिंदे यांनीही त्यांची भेट घेतली होती. आपले पती नितीन देशमुख यांची तब्बेत बिघडल्यानंतर त्यांची पत्नी प्रांजली देशमुख सूरतला जाण्यासाठी रवाना झाल्या. त्यावेळी त्यांनी सांगितले की, आपल्या पतीला प्रेशराईज केलं जात असून त्याचा त्रास माझ्या पतीला होत असल्याचेही त्यांनी सांगितले. गुजरातला घेऊन गेल्यानंतरच आपल्या पतीच्या छातीत कसं कय दुखू लागलं असा सवालही त्यांनी यावेळी केला आहे. ते गेल्यापासून आपल्याबरोबर त्यांचा संपर्क झाला नसल्याचेही त्यांनी सांगितले.

 मला कोण अडविणार

यावेळी त्यांना विचारण्यात आले की सूरतला तुमच्या पतीला भेटण्यासाठी जात असला तरी तुम्हाला त्या ठिकाणी भेटायला देणार का त्यावेळी त्यांनी सांगितले की, नितीन देशमुखे माझे पती आहेत. त्यामुळे पतीला भेटण्यासाठी मला कोण आडवणार आहे असं सांगत त्यांनी पतीला प्रेशराईज केलं जातय असा थेट आरोप त्यांनी बंडखोर आमदार एकनाथ शिंदे यांच्यावरच केला आहे. त्यांच्या या आरोपामुळे एकनाथ शिंदे यांच्याबरोबर किती आमदार आहेत असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.

सूरतमधील रुग्णालयात दाखल

आमदार नितीन देशमुख नॉट रिचेबल झाल्यापासून ते कोणाच्याही संपर्कात नव्हते, मात्र त्यानंतर आज त्यांच्या छातीत कळ आल्याने त्यांना सूरतमधील सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी त्यांची रुग्णालयात जाऊन भेट घेतली, आणि विचारपूस केली होती, मात्र नितीन देशमुख यांच्या पत्नीने आपल्या पतीला प्रेशराईज केले जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

मिसिंग केस दाखल

प्रांजली देशमुख यांनी नितीन देशमुख हरवल्याची तक्रार दाखल केली आहे. रात्रीपासूनच ते संपर्कात नसल्याची तक्रार त्यांनी दिली आहे. सोबतच्या लोकांनाही ते कुठे आहेत हे माहित नसल्याची माहिती आहे. आपल्या पतीला लवकर शोधा, अशी विनंती आमदार देशमुख यांच्या पत्नी प्रांजली यांनी पोलिसांकडे केली आहे.

दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा.
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी.
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण.
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर.
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?.