Nagar Palika Election 2025: मतदान सुरु होताच EVM मशीन बंद, मतदारांचा मोठा खोळांबा…संतापच संताप

EVM Machines Shut Down: थंडीचा कडाका असताना सकाळीच मतदार मोठ्या उत्साहात मतदान केंद्रावर पोहचले. पण येथे पोहचताच त्यांना ईव्हीएम मशीन बंद पडल्याचा अनुभव आला. त्यामुळे मतदारांचा संताप अनावर झाला.

Nagar Palika Election 2025: मतदान सुरु होताच EVM मशीन बंद, मतदारांचा मोठा खोळांबा...संतापच संताप
ईव्हीएम मशीनमध्ये बिघाड
Updated on: Dec 02, 2025 | 2:19 PM

आज स्थानिक निवडणुकांमध्ये मोठा गोंधळ उडालेला दिसला. काही ठिकाणी कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांमध्ये हाणामारी, मारामारी झाली. काही ठिकाणी बोगस मतदारही पकडल्या गेले. निवडणूक आयोगाचा डावात मचाळा पुन्हा दिसला. थंडीचा कडाका असताना मतदारांनी सकाळीच मतदानासाठी रांग लावली. पण ईव्हीएम मशीनच काम करत नसल्याचे समोर आले. EVM Machine मध्ये बिघाड झाल्याचे समजताच मतदारांचा उत्साह मावळला. यामुळे मतदारांचा संताप अनावर झाला. या मशीन सकाळीच तापसल्या का नाही असा सवाल अनेक मतदारांनी विचारला.

अकलूजमध्ये मतदार जवळपास एक तास ताटकाळले

अकलूज मतदान केंद्रावर गेल्या 50 मिनिटांपासून ईव्हीएम बंद पडले. त्यामुळे मतदारांचा त्रागा झाला. ईव्हीएम बंद पडल्याने मतदारांच्या रांगाच रांगा लागल्या. आयोगाच्या वतीने तंत्रज्ञ आणि तज्ञांकडून ईव्हीएमची तपासणी करण्यात आली.ईव्हीएम मशीन बंद पडल्याचे समजताच जयसिंह उर्फ बाळ दादा मोहिते पाटील मतदान केंद्रावर दाखल झाले.

नाशिकमध्ये मतदान केंद्रावर गोंधळ

नाशिकमधील त्र्यंबकेश्वरच्या आनंद आखाड्यातील मतदान केंद्रावर गोंधळ समोर आला. उमेदवार, उमेदवारांचे प्रतिनिधी आणि निवडणूक कर्मचाऱ्यांमध्ये बाचाबाची झाली. 10 ते 15 मिनिटांपासून मशीन बंद असल्याने गोंधळ उडाला. उमेदवारांकडून मतदान थांबल्यामुळे आक्षेप घेण्यात आला.

अमरावती एका तासाहून अधिक काळ मतदान ठप्प

अमरावती जिल्ह्यातील दर्यापूरमध्ये एका मतदान केंद्रावरील ईव्हीएम मशीन एक तासापासून बंद आढळले.नगरपालिका हद्दीमधील शहीद अब्दुल हमीद उर्दू उच्च प्राथमिक शाळा बाबळी या ठिकाणी मतदान होत असून खोली क्रमांक १ मधील गेल्या एक तासांपासून मतदान मशीन बंद असल्याने मतदान मध्ये मोठी नाराजी समोर आली. 27 मतदान झाल्यानंतर हे मशीन बंद पडल्याचे समोर आले. निवडणूक विभागाच्या वतीने मशीन दुरुस्त करण्यात आले.

बीडमध्ये ईव्हीएम मशीनमध्ये बिघाड

बीड शहरातील वार्ड क्रमांक 15 यशवंतराव नाट्यगृह येथील मधील ईव्हीएम मशीन बंद पडले. मशीनमध्ये एरर येत असल्याने मतदान प्रक्रियेत अडथळा आला. दुसरे मशीन बसवण्याची उमेदवारांकडून मागणी करण्यात आली. सकाळी 7.30 वाजल्यापासून मतदान सुरू होते. 45 मिनिटे मशीन बंद होते. सगळ्या मशीन तात्काळ बदलल्या असून मतदान प्रक्रिया सुरळीत सुरू झाली.

हिंगोलीत मतदान प्रक्रियेला ब्रेक

हिंगोलीमध्ये काही काळ इव्हीएम मशीन बंद पडल्याने मतदान प्रक्रिया स्थगित करण्यात आली. मशीन बदलल्यानंतर सुरळीत मतदानाला सुरुवात झाली. शहरातील गणेश वाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथील वार्ड क्रमांक 02 ईव्हीएम मशीन काही काळ बंद होते. मशीन मधील बटन प्रेस होत नसल्याने मशीन चेंज झाल्यानंतर मतदान प्रक्रियेला सुरळीत सुरुवात झाली.

वाशिममध्ये मतदान प्रक्रिया खोळंबली

वाशिम जिल्ह्यातील मालेगाव नगर पंचायत निवडणुकीच्या मतदानाला सुरुवात झाली असताना नाना मुंदडा शाळेतील मतदान केंद्र क्रमांक 10 मधील ईव्हीएम मशीन अचानक बंद पडली. त्यामुळे मतदानासाठी आलेल्या मतदारांना थांबण्याची वेळ आली. नंतर अडचण दूर करण्यात आली.

सातारा-रायगड वोटिंग मशीन बंद

सातारा येथील आझाद कॉलेज येथील मतदान केंद्रावर ईव्हीएम मशीन मध्ये बिघाड झाला. तांत्रिक अडचणीमुळे वोटिंग मशीन बंद पडले. प्रभाग क्रमांक 16 मधील 1 मशीन बंद पडली. काही वेळातच मशीन बदलल्यामुळे मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली. तर रायगडमधील महाड नगरपालिकेमध्ये प्रभाग क्रमांक दोन मध्ये मतदान केंद्रावरील मशीन बंद पडल्यामुळे मतदानावर केंद्रावर मतदारांचा खोळंबा झाला. सकाळपासून या मतदान केंद्रावर मशीन सुरूच न झाल्यामुळे मतदारांनी संताप व्यक्त केला.