गटाराच्या उघड्या चेंबरमध्ये पडून वाहून गेला, नालासोपाऱ्यातील 4 वर्षांचा चिमुरडा अद्यापही बेपत्ता

पाण्याचा प्रवाह जोरात असल्याने आपल्या घरासमोर पाण्यात खेळताना मुलगा वाहत जाऊन उघड्या चेंबरमध्ये पडला असल्याचे स्थानिक रहिवाशांचे म्हणणे आहे.

गटाराच्या उघड्या चेंबरमध्ये पडून वाहून गेला, नालासोपाऱ्यातील 4 वर्षांचा चिमुरडा अद्यापही बेपत्ता
नालासोपाऱ्यात चिमुरडा गटारात पडला
Follow us
| Updated on: Jul 19, 2021 | 10:44 AM

नालासोपारा : मुसळधार पावसात गटाराच्या उघड्या चेंबरमध्ये पडून वाहून गेलेला 4 वर्षांचा मुलगा अद्यापही बेपत्ता आहे. नालासोपारा पूर्व भागातील बिलालपाडा परिसरात रविवारी ही घटना घडली. अनमोल सिंग असे पावसामुळे साचलेल्या पाण्यात वाहून गेलेल्या मुलाचे नाव आहे.

24 तासांनंतरही चिमुरडा सापडला नाही

वसई विरार महापालिका अग्निशमन दल, स्थानिक रहिवासी यांच्याकडून चिमुरड्याचा शोध सुरु आहे, मात्र तो अद्यापही सापडलेला नाही. नालासोपारा पूर्व बिलालपाड्याच्या हनुमान नगर चाळीमध्ये रविवारी सकाळी साडेदहा वाजताच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली होती. घटनेला 24 तासांचा कालावधी उलटून गेल्यानंतरही मुलगा कुठेच सापडला नसल्याने त्याचे कुटुंबीय मात्र हवालदिल झाले आहेत.

आजूबाजूचे नैसर्गिक नाले भूमाफियांनी बुजवली असल्याने मुसळधार पावसाचे पाणी पूर्णपणे चाळीत भरले होते. पाण्याचा प्रवाह जोरात असल्याने आपल्या घरासमोर पाण्यात खेळताना मुलगा वाहत जाऊन उघड्या चेंबरमध्ये पडला असल्याचे स्थानिक रहिवाशांचे म्हणणे आहे.

कांदिवलीत बापलेक पाण्यात पडले

दुसरीकडे, जोरदार पावसामुळे मुंबईतील कांदिवली भागातही पोटरीभर पाणी साचलं होतं. कांदिवली वाहतूक चौकीसमोर एक व्यक्ती साचलेल्या पाण्यातून आपल्या लहान मुलीला सुरक्षित ठिकाणी घेऊन जात होता. मात्र पाण्याच्या प्रवाहातून चालताना फुटपाथला अडखळून तो पडला.

यावेळी रात्रपाळी कर्तव्यावर असलेले पोलीस राजेंद्र शेगर यांनी तत्परता दाखवली आणि ते त्याच्या मदतीला धावून गेले. हा पिता आपल्या मुलीला सुखरुप प्रवाहातून बाहेर काढून जाईपर्यंत त्यांनी सोबत केली आणि बापलेकीला सुरक्षित ठिकाणी पोहोचवले.

संबंधित बातम्या :

VIDEO | मुंबईत साचलेल्या पाण्यातून चालताना बापलेक अडखळून पडले, पोलिसाची मदत

एक फोन आला, बापाची नजर हटली, तीन मुलं वाहून गेली, ‘लुशी’चं काय झालं? सांगली हादरली

(Nalasopara 4 Years old boy drown in open gutter during flooded water in Rains)

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.