Video: रिक्षा अडवली म्हणून थेट पोलिसाच्याच अंगावर घातली; रिक्षाचालकांचा मुजोरपणा वाढला

| Updated on: May 19, 2022 | 7:31 PM

नालासोपाऱ्यात रिक्षाचालकांची दादागिरी दिवसागणिक वाढत चालली आहे. आज दुपारी कारवाई करत असणाऱ्या एका वाहतूक पोलिसांच्या अंगावरच रिक्षाचालकाने रिक्षा घातली असल्याचा एक सीसीटीव्ही समोर आला आहे.

Video: रिक्षा अडवली म्हणून थेट पोलिसाच्याच अंगावर घातली; रिक्षाचालकांचा मुजोरपणा वाढला
नालासोपाऱ्यात वाहतूक पोलिसांच्या अंगावर घातली रिक्षा
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

नालासोपारा: नालासोपाऱ्यात रिक्षाचालकांची (Nalasopara Rickshaw) दादागिरी दिवसागणिक वाढत चालली आहे. आज दुपारी कारवाई करत असणाऱ्या एका वाहतूक पोलिसांच्या (Traffic Police) अंगावरच रिक्षाचालकाने रिक्षा घातली असल्याचा एक सीसीटीव्ही (CCTV) समोर आला आहे. नालासोपारा पूर्व आचोळा रोडवरील रेल्वे ब्रिज खाली आज दुपारी दीडच्या सुमारास ही घटना घडली आहे. याबाबत तुलिंज पोलिसांना याची माहिती विचारली तर आमच्याकडे अशी कोणती घटना दाखल झाली नसल्याचे सांगण्यात आले आहे.

रिक्षाचालकांचा सुळसुळाट

नालासोपारा परिसरात परप्रांतीय रिक्षाचालकांचा मोठ्याप्रमाणात सुळसुळाट झाला आहे. तुलिंज पोलीस ठाणे, पूर्व पश्चिमेला जोडणारा रेल्वे ब्रिज, रेल्वे स्थानक परिसरात चक्क रस्त्यावर रिक्षा उभा करून, वाहतूक कोंडी ही मोठ्या प्रमाणात करत असतात.

दादागिरीची भाषा

त्यांना जर कोणी प्रवाशी, वाहनधारक, किंवा वाहतूक पोलिसांनी जरी अडवले किंवा हटकले तर त्यांच्याकडून दादागिरीची भाषा केली जाते. प्रवाशांना मारण्याचाही प्रयत्न केला जातो. पोलीस जर कारवाई करत असतील तर त्यांच्या अंगावर रिक्षा घालतात अशा अनेक घटना घडलेल्या आहेत.

वाहतूक पोलिसांच्या अंगावर रिक्षा

आचोळा, तुलिंज रोडवरील वाहतूक कोंडी हटवण्यासाठी वाहतूक पोलीस कायम रेल्वे ब्रिजखाली असतात, त्याच पोलीस पैकी एक पोलीस ओहर सीट घेऊन जाणाऱ्या रिक्षा चालकांवर कारवाई करण्यासाठी पुढे सरसावला असताना त्याने आपली रिक्षा न थांबवता चक्क वाहतूक पोलिसांच्या अंगावर रिक्षा घालून पुढे निघून गेला आहे. हा सर्वप्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाल्याने सर्व प्रकार उघड झाला आहे. आता अशा या मुजोर रिक्षाचालकावर पोलीस कारवाई करून त्यांच्या मुसक्या आवळतात की त्यांना सोडून देतात हे पाहणे गरजेचे आहे.

अजून तक्रार नाही

वाहतूक पोलिसांच्या अंगावर रिक्षा घातल्याची आमच्याकडे कोणतीही तक्रार आली नाही. आम्ही याची चौकशी करून, काय प्रकार आहे ते पाहून कारवाही करू असे तुलिंज चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कांबळे यांनी सांगितले आहे.