Narhari Zirwal: नरहरी झिरवळांची विकेट? कॅबिनेट बैठकीपूर्वी मोठी घडामोड, सुनेत्रा पवारांच्या उपस्थिती घडलं काय?

Narhari Zirwal Pre Cabinet Meeting: आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मंत्री नरहरी झिरवळ यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. तर आज मंत्रिमंडळ बैठकीपूर्वी अनेक घडामोडी घडल्या आहेत. झिरवळ यांच्या राजीनाम्याविषयी चर्चा सुरू असतानाच ही घाडमोड घडल्याने चर्चेला उधाण आले आहे.

Narhari Zirwal: नरहरी झिरवळांची विकेट? कॅबिनेट बैठकीपूर्वी मोठी घडामोड, सुनेत्रा पवारांच्या उपस्थिती घडलं काय?
नरहरी झिरवळ
Image Credit source: गुगल
| Updated on: Apr 01, 2026 | 12:36 PM

Narhari Zirwal Pre Cabinet Meeting: सातारा प्रकरणी नाराज असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री मकरंद पाटील आणि वायरल क्लिपमुळे वादग्रस्त राहिलेले मंत्री नरहरी झिरवळ यांची प्री कॅबिनेट बैठकीला दांडी मारली. मंत्री मकरंद पाटील आणि मंत्री नरहरी झिरवळ यांच्या व्यतिरिक्त बाबासाहेब पाटील, इंद्रनील नाईल यांचीही प्री कॅबिनेटला पाठ फिरवल्याने एकच चर्चा सुरू झाली आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या प्री कॅबिनेट बैठकीत छगन भुजबळ, अदिती तटकरे, दत्तामामा भरणे, हसन मुश्रीफ उपस्थित होते. या घाडमोडींमुळे झिरवळ यांचा राजीनामा घेतला जाणार की त्यांना पक्ष अभय देणार याची जोरदार चर्चा रंगली आहे.

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीलाही दांडी

आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक दुपारी 12:00 वाजता सुरू झाली. या बैठकीलाही झिरवळ अनुपस्थित असल्याची माहिती समोर येत आहे. तर त्यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाची प्री कॅबिनेट बैठक उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत झाली. या बैठकीत प्रामुख्याने अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या संदर्भातील व्हायरल व्हिडिओ प्रकरणावर चर्चा होऊन पक्ष काय भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष आहे. झिरवाळ यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांकडून केली जात असून, त्यांचे मंत्रिपद धोक्यात असल्याची चर्चा आहे. मंत्रिमंडळ बैठकीला आणि पक्षाच्या कॅबिनेट बैठकीला नरहरी झिरवाळ अनुपस्थित राहिल्याने आता चर्चांना उधाण आले आहे.

पवन यादव याच्या भावाविरोधात FIR

अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ यांचा पवन यादव या तृतीय पंथियासोबत वावर एका व्हिडिओतून समोर आला. या व्हिडिओत खाद्य पदार्थांसह मद्यही दिसत असल्याने व्हिडिओ व्हायरल झाला. याप्रकरणात काल पवन यादव याच्या भावाविरोधात पहिला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ट्रान्सजेंडर पवन यादव याने कफ परेड पोलीस ठाण्यात भावाविरोधात तक्रार दिली. त्याच्याविरोधात पहिला गुन्हा दाखल झाला. FDA मध्ये नोकरी लाव नाहीतर मंत्र्यांसोबतचा व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे. व्हिडिओ व्हायरल करण्यापूर्वी तो एडिट केल्याचा आरोपही करण्यात आला आहे. त्याआधारे पहिला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पण या सर्वच प्रकरणात टीकेची झोड उठल्यानंतर झिरवळ यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

Follow Us