Navneet Rana : सलग दुसऱ्या दिवशी BMCचं पथक राणांच्या घरी! नवनीत राणा रवी राणांच्या घरात अवैध बांधकाम?

2 मे रोजी राणा दाम्पत्याच्या खार इथल्या घरी महापालिकेने पहिल्यांदा नोटीस दिली होती. 4 तारखेला पालिका अधिकारी पाहणीसाठी घरी येतील या अशायची नोटीस तेव्हा देण्यात आली होती.

Navneet Rana : सलग दुसऱ्या दिवशी BMCचं पथक राणांच्या घरी! नवनीत राणा रवी राणांच्या घरात अवैध बांधकाम?
रवी राणा आणि नवनीत राणाImage Credit source: Tv9
Follow us
| Updated on: May 05, 2022 | 10:10 AM

मुंबई : खासदार नवनीत राणा आणि रवी राणा (Navneet Rana & Ravi Rana) गेले दोन आठवडे सतत चर्चेत आहेत. दरम्यान, बुधवारी नवनीत आणि रवी राणा यांना जामीन मंजूर झाला. त्यानंतर अखेर त्यांनी कोठडीतून सुटका झाली. दरम्यान, बुधवारी बीएमसीचं (BMC) पथक रवी राणांच्या खारमधील घरी दाखल झालं होतं. रवी राणा यांच्या खारमधील (Ravi Rana Khar Residence) घराची पाहणी करण्याच्या उद्देशानं बीएमसीचं पथक पोहोचलं होतं. मात्र हे पथक घर बंद असल्यानं लगेचच माघारी परतलं. दरम्यान, आता आज पुन्हा एकदा नवनीत राणा आणि रवी राणा यांच्या घराची पाहणी करण्यात येणार आहे. नवनीत राणा आणि रवी राणा यांच्या खारमधील घरामध्ये अवैध बांधकाम करण्यात आलंय का? याचा तपास बीएमसीच्या पथकाकडून केला जाणार आहे. तसं जर पाहणीमध्ये आढळलं, तर त्यांच्या घरावर कारवाई केली जाण्याची शक्यता आहे. नवीन राणा यांच्या घराच्या मंजूर आराखड्याव्यतिरिक्त अधिकचं बांधकाम झाल्याचा आणि नियमांचे उल्लंघन झक्याची तक्रार पालिकेला प्राप्त झाली होती. त्यानंतर पालिकेने रवी राणा यांच्या खारमधील घराला नोटीस दिलेली.

आज पुन्हा पाहणी..

राणा दाम्पत्याच्या घरी महापालिकेची टीम आज पुन्हा दाखल होत पाहणी करेल. सकाळी 11 ते 12च्या दरम्यान महापालिकेची टीम राणा दाम्पत्याच्या घरी दाखल होईल. बुधवारी देखील पालिकेची टीम राणा दाम्पत्याच्या या खार इथल्या घरी पोहचली होती. यावेळी नोटीस चिटकवून ही टीम परतली होती. घरात कुणी नसल्यानं हे पथक पुन्हा परतलं होतं.

2 मे रोजी राणा दाम्पत्याच्या खार इथल्या घरी महापालिकेने पहिल्यांदा नोटीस दिली होती. 4 तारखेला पालिका अधिकारी पाहणीसाठी घरी येतील या अशायची नोटीस तेव्हा देण्यात आली होती. त्यानुसार पालिकेचं पथक घरी पाहणीसाठी दाखलही झालं होतं. मात्र तेव्हा राणा दाम्पत्याला जामीन मिळालेला नव्हता. ते कोठडीत होते. अखेर काल जामीन मिळाल्यानंतर राणा दाम्पत्य अखेर कोठडीतून बाहेर आलेत. त्यामुळे आज राणा दाम्पत्याच्या घरी जाऊन बीएमसीचं पथकं पाहणी करेल. या पाहणीतून नेमक्या गोष्टींचा खुलासा होतो, हे पाहणं महत्त्वाचंय.

हे सुद्धा वाचा

जामीन मिळालाय, पण…

नवनीत राणा आणि रवी राणा यांना बुधवारी मुंबई सत्र न्यायालयाकडून जामीन मिळाला असला, तरी त्यांना तीन अटी घालण्यात आलेल्या आहेत. या अटींनुसार नवनीत राणा आणि रवी राणा यांना माध्यमांशी बोलण्यास मनाई करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे त्यांना तपासात प्रभाव पडेल, अशी वागणूक करणं टाळावं लागले. शिवाय चौकशीला सहकार्यही करावं लागणार आहे. 50 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर राणा दाम्पत्याला जामीन अटीशर्थींसह मंजूर करण्यात आलाय.

पाहा महत्त्वाची बातमी :

Non Stop LIVE Update
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले.
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी.
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड.
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा.
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक.