Lok Sabha Election 2024 : नाशिकमध्ये भाजप, शिंदे गटाऐवजी भुजबळ? केंद्रीय पातळीवरुन हालचाली

| Updated on: Mar 26, 2024 | 9:31 PM

नाशिक लोकसभेच्या जागेवरुन शिंदेंच्या शिवसेनेसोबत भाजप नेत्यांचे टोकाचे मतभेद झालेत. नाशिकमध्ये महायुतीतच दोन्ही नेते आमनेसामने आलेत. मात्र, असं असलं तरी ही जागा आता भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेऐवजी दादांच्या गटाला मिळण्याची शक्यता आहे. नाशिकमधून भुजबळांना मैदानात उतरवण्याच्या हालचाली केंद्रीय पातळीवरुन सुरु झाल्यात.

Lok Sabha Election 2024 : नाशिकमध्ये भाजप, शिंदे गटाऐवजी भुजबळ? केंद्रीय पातळीवरुन हालचाली
Follow us on

राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ ओबीसी नेते असून देशपातळीवर त्यांना ओबीसी म्हणून प्रोजेक्ट करता येईल. देशभरात भाजपचा ओबीसी मतदार अधिक भाजपची स्वत: इमेज प्रो ओबीसी आहे. देशभरात ओबीसी नेतृत्वासाठी भुजबळांच्या चेहऱ्याचा फायदा घेता जावू शकतो. त्यासाठी भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाकडून शिंदे आणि अजित पवारांसोबत चर्चा सुरु असल्याची माहिती आहे. नाशिकची जागा सध्या शिंदेंच्या शिवसेनेकडे आहे. हेमंत गोडसे खासदार असून शिंदे गट आणि भाजप आमनेसाने आलेत.भाजपचे इच्छुक उमेदवार दिनकर पाटलांनी तर हेमंत गोडसेंना भाजप मतदान करणार नाही, असा पवित्रा घेतला.

हेमंत गोडसे तिसऱ्यांदा इच्छुक आहेत. त्यासाठी त्यांनी ठाण्यात मुख्यमंत्र्यांच्या घराबाहेर शक्तिप्रदर्शनही केलं. तर नाशिकच्या भाजपच्या आमदार सीमा हिरे आणि देवयानी फरांदेंसह इच्छुक उमेदवार दिनकर पाटलांनीही फडणवीसांची भेट घेऊन, भाजपचा उमेदवार देण्याची मागणी केली. मात्र ही जागा अजित पवार गटाला आणि तीही भुजबळांना देवून वादच निकाली निघू शकतो. तर सोशल मीडियात कार्ययोद्धा म्हणत भुजबळांचे व्हिडीओ व्हायरल होत आहेत.

नाशिक जिल्ह्याचा विचार केला तर लोकसभेचे 2 मतदारसंघ आहेत. एक आहे नाशिक आणि दुसरा मतदारसंघ आहे दिंडोरी, भुजबळ आमदार ज्या येवल्यातून आमदार आहेत तो मतदारसंघ दिंडोरी लोकसभेत येतो. 2014 मध्येही छगन भुजबळांनी लोकसभा लढवली त्यावेळी शिवसेनेच्याच हेमंत गोडसेंनी 1 लाख 87 हजार मतांनी पराभूत केलं.

पाहा व्हिडीओ

2019 मध्ये छगन भुजबळांचे पुतणे समीर भुजबळ राष्ट्रवादीकडून नाशिकमधूनच लढले…शिवसेनेच्या हेमंत गोडसेंनीच तब्बल 2 लाख 92 हजार मतांनी पराभूत केलं. म्हणजेच नाशिकमधून स्वत: छगन भुजबळही पराभूत झालेत आणि त्यांचे पुतणेही पराभूत झालेले आहेत. मात्र आता परिस्थितीत बदललीय…महायुती आणि महाविकास आघाडीचं समीकरण बदलल्यानं महायुती कडून भुजबळांनाच दादांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार म्हणून तिकीट देण्याच्या हालचाली सुरु झाल्यात.