BREAKING | महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी, हसन मुश्रीफ ईडी चौकशीला सामोरं जाणार

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ यांनी अखेर मोठा निर्णय घेतला आहे. ईडीकडून सातत्याने सुरु असलेल्या कारवाईनंतर मुश्रीफांनी ईडी चौकशीला सामोरं जाण्याचा निर्णय घेतला आहे. मुश्रीफांनी आज प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी भूमिका मांडली.

BREAKING | महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी, हसन मुश्रीफ ईडी चौकशीला सामोरं जाणार
Image Credit source: tv9
Follow us
| Updated on: Mar 14, 2023 | 5:28 PM

मुंबई : महाराष्ट्राचे माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांचे विश्वासू नेते हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) आता ईडी (ED) चौकशीला सामोरे जाणार आहेत. ईडीकडून हसन मुश्रीफ यांच्याविरोधात गेल्या दोन महिन्यांपासून कारवाई केली जात आहे. ईडीने हसन मुश्रीफ यांच्या घरावर दोनवेळा धाड टाकलीय. याशिवाय मुश्रीफ यांच्या संबंधित आणखी ठिकाणी छापे टाकले आहेत. विशेष म्हणजे ईडीने दोन दिवसांपूर्वी मुश्रीफांच्या घरावर धाड टाकल्यानंतर मुश्रीफ कुटुंबियांसह राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झालेले. या दरम्यान मुश्रीफ नॉट रिचेबल होते. पण त्यांच्या वतीने वकिलांनी मुंबई हायकोर्टात धाव घेतलेली.

हसन मुश्रीफ यांनी दाखल केलेल्या याचिकेत ईडीवर आरोप करण्यात आलेले. त्यांच्या याचिकेवर युक्तिवाद झाल्यानंतर कोर्टाने हसन मुश्रीफ यांना दोन आठवड्यांसाठी अटकेपासून सुरक्षा दिली. हसन मुश्रीफ यांना पुढचे दोन आठवडे अटक करु नये, असे आदेश कोर्टाने दिले. त्यानंतर आता हसन मुश्रीफ ईडी अधिकाऱ्यांच्या चौकशीला सामोरे जाणार आहेत. मुश्रीफ यांनी स्वत: याबाबत प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली. हसन मुश्रीफ आज मुंबईत ईडी कार्यालयात दाखल झाले. तिथे त्यांनी ईडी अधिकाऱ्यांची भेट घेतली. त्यानंतर ते ईडी कार्यालयातून बाहेर आले आणि त्यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली.

हसन मुश्रीफ नेमकं काय म्हणाले?

“कोर्टाकडून मला दोन आठवड्यांचा दिलासा मिळाला आहे. हा दिलासा मिळाल्यानंतर मी तातडीने ईडी कार्यालयात आलो. त्यांचे काही प्रश्न आहेत, त्या प्रश्नांना उत्तर देण्यासाठी मला कधी बोलवणार, मी चौकशीसाठी कधी येऊ, उद्या येऊ किंवा परवा येऊ. विधिमंडळाचं सध्या अधिवेशन सुरु आहे. पण ते जेव्हा बोलतील तेव्हा मी चौकशीसाठी येईन”, असं हसन मुश्रीफ यांनी स्पष्ट केलं.

हे सुद्धा वाचा

“नेमकं काय सुरुय ते आपल्या सगळ्यांना माहिती आहे. मला ईडी अधिकाऱ्यांनी उद्या चौकशीसाठी बोलावलं आहे. त्यानुसार मी उद्या विधिमंडळाचं कामकाज आटोपून इथे ईडी कार्यालयात चौकशीसाठी येणार आहे”, अशी माहिती हसन मुश्रीफ यांनी दिली. “मी याचिकेत सर्व लिहिलं आहे. नेमकं काय सुरुय ते सविस्तर आणि सगळं लिहिलं आहे. आता फक्त ईडीच्या प्रश्नांना उत्तरं द्यायची आहेत. मी सगळ्या आरोपांवर खुलासा करेन. भाजप नेते किरीट सोमय्या यांच्याबद्दल याचिकेत सर्व लिहिलं आहे. दोन दिवसांपूर्वी निकाल आलेला आहे. त्यामध्ये स्वत: न्यायमूर्तींनीच त्याबद्दल भाष्य केलं आहे”, असं हसन मुश्रीफ यांनी सांगितलं.

Non Stop LIVE Update
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.
ही धमकी समजा नाहीतर... , राज ठाकरेंच्या टीकेवरून मनसेचा राऊतांना इशारा
ही धमकी समजा नाहीतर... , राज ठाकरेंच्या टीकेवरून मनसेचा राऊतांना इशारा.
सांगलीत तिहेरी लढत, मविआतच बंड अन् ठाकरेंचं वाढलं टेन्शन
सांगलीत तिहेरी लढत, मविआतच बंड अन् ठाकरेंचं वाढलं टेन्शन.
अमरावतीत शरद पवारांचा माफीनामा, ... तेव्हा चूक झाली, यापुढं होणार नाही
अमरावतीत शरद पवारांचा माफीनामा, ... तेव्हा चूक झाली, यापुढं होणार नाही.
वंचित उमेदवाराची माघार, भाजपची डोकेदुखी तर काँग्रेसला मिळणार दिलासा
वंचित उमेदवाराची माघार, भाजपची डोकेदुखी तर काँग्रेसला मिळणार दिलासा.