AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nawab Malik | नवाब मलिक यांचे भाऊ ढसाढसा रडले, रडत-रडत म्हणाले, ‘आम्ही कसे दिवस काढले…’

नवाब मलिक यांना जामीन मिळाल्याने त्यांच्या कुटुंबियांना मोठा दिलासा मिळाला आहे. मलिक यांंना जामीन मिळाल्यानंतर त्यांचे लहान भाऊ कप्तान मलिक यांनी 'टीव्ही 9 मराठी'ला प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांना प्रतिक्रिया देताना रडू कोसळलं.

Nawab Malik | नवाब मलिक यांचे भाऊ ढसाढसा रडले, रडत-रडत म्हणाले, 'आम्ही कसे दिवस काढले...'
Chetan Patil
Chetan Patil | Updated on: Aug 11, 2023 | 6:13 PM
Share

मुंबई | 11 ऑगस्ट 2023 : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांना जामीन मिळाल्याने त्यांच्या कुटुंबियांनादेखील मोठा दिलासा मिळाला आहे. मलिक यांना गेल्या अनेक दिवसांपासून किडनीशी संबंधित आजार आहे. त्यांची एक किडनी निकामी झाली असल्याची माहिती त्यांचे लहान भाऊ कप्तान मलिक यांनी ‘टीव्ही 9 मराठी’सोबत बोलताना दिली. नवाब मलिक यांना जामीन मिळाल्यानंतर कप्तान मलिक यांनी ‘टीव्ही 9 मराठी’ला प्रतिक्रिया दिली. यावेळी ते प्रचंड भावूक झाले. कप्तान मलिक प्रतिक्रिया देताना अक्षरश: ढसाढसा रडले. त्यांनी सुप्रीम कोर्टाचे आभार मानले.

गेल्या दीड वर्षांपासून आमचं कुटुंब कोणत्या संकटातून जात होतं हे आपण शब्दांमध्ये सांगू शकत नाही, अशी प्रतिक्रिया कप्तान मलिक यांनी दिली. यावेळी त्यांना रडू कोसळलं. नवाब मलिक हे गेल्या वर्षभरापासून आजारी आहेत. त्यांच्यावर जे जे रुग्णालयातही उपचार सुरु होते. याशिवाय खासगी रुग्णालयातही उपचार करण्यात आले. त्यानंतर आता सुप्रीम कोर्टाने मलिक यांच्यावर उपचार करण्यासाठी दोन महिम्यांचा जामीन मंजूर केलाय. सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयावर मलिक कुटुंबियांकडून समाधान व्यक्त केलं जात आहे.

नवाब मलिक यांचे भाऊ कप्तान मलिक नेमकं काय म्हणाले?

“सर्वप्रथम सुप्रीम कोर्टाने आमची दोन महिन्यांसाठी बेल मंजूर केली यासाठी मी सुप्रीम कोर्टाचा अतिशय आभारी आहे. नवाब मलिक यांची प्रकृती एक वर्षापासून खूप खराब झाली होती. त्यांची एक किडनी फेल झाला होता. अखेर त्यांना उपचाराच्या पार्श्वभूमीवर एक महिन्यांसाठी जामीन मंजूर झालाय. त्यासाठी आम्ही सुप्रीम कोर्टाचे आभारी आहोत”, असं कप्तान मलिक म्हणाले.

“नवाब मलिक माझे मोठे बंधू आहेत. मी त्यांच्यापेक्षा लहान आहे. 10 वर्षे झाले, आमचे वडील या जगात नाहीयत. नवाब मलिक आमचे वडील आणि भाऊ दोन्ही होते. दीड वर्षात आमच्या कुटंबासोबत जे घडलं आहे, आम्ही कसे दिवस काढले ते आम्हालाच माहिती”, असं बोलत असताना कप्तान मलिक यांना रडू कोसळलं.

नवाब मलिक यांच्या जामीन अर्जावर सुनील तटकरे म्हणाले…

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाचे नेते सुनील तटकरे यांनीदेखील नवाब मलिकांच्या जामिनावर प्रतिक्रिया दिलीय. मलिकांनी आपली भूमिका स्पष्ट केली की आम्ही आमची बाजू मांडू, असं सुनील तटकरे म्हणाले आहेत. “दिर्घ काळ प्रतिक्षेनंतर आज नवाब मलिक यांना सुप्रीम कोर्टाने दिलासा दिला आहे. आम्हाला सर्वांना या गोष्टीचं समाधान आहे. कारण गेले 25 ते 30 वर्षात त्यांनी मुंबईत आपल्या कार्यप्रणालीचा ठसा उमटवला आहे. आम्ही सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचं स्वागत करतो”, असं सुनली तटकरे म्हणाले.

नवाब मलिक यांनी भाजपवर गंभीर आरोप केले होते. पण आता अजित पवार गट भाजपसोबत सत्तेत सहभागी झालाय. त्यामुळे मलिक सोबत आले तर अजित पवार गटाची काय भूमिका असेल? असा सवाल सुनील तटकरे यांना विचारण्यात आला. त्यावर सुनील तटकरे यांनी “नवाब मलिक हे स्वत: दिर्घकाळ राजकारण करणारे प्रगल्भ असे नेते आहेत. त्यांनी आपली भूमिका मांडल्यानंतर आम्ही आमची भूमिका मांडू”, अशी प्रतिक्रिया दिली.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?