AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हिंमत होती म्हणून लढलो, तुमच्यासारखे पक्ष सोडून केंद्रीय मंत्री झालो नाही; नवाब मलिक यांचा राणेंवर घणाघात

राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी केंद्रीय सुक्ष्म, लघु, मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे. आमच्यात हिंमत होती म्हणून आम्ही लढलो. (nawab malik)

हिंमत होती म्हणून लढलो, तुमच्यासारखे पक्ष सोडून केंद्रीय मंत्री झालो नाही; नवाब मलिक यांचा राणेंवर घणाघात
nawab malik
| Edited By: | Updated on: Aug 30, 2021 | 10:45 AM
Share

मुंबई: राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी केंद्रीय सुक्ष्म, लघु, मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे. आमच्यात हिंमत होती म्हणून आम्ही लढलो. तुमच्यासारखे पक्ष सोडून केंद्रीय मंत्री झालो नाहीत, असा जोरदार हल्ला नवाब मलिक यांनी चढवला आहे. (ncp leader nawab malik slams narayan rane over arrest drama)

नवाब मलिक यांनी मीडियाशी संवाद साधताना थेट नारायण राणेंना लक्ष्य केलं. आमच्यात हिंमत होती म्हणून आम्ही लढलो. कायदेशीर लढा जो आहे तो लढावा लागेल. पण आम्ही तुमच्यासारखे पक्ष सोडून आलो नाही. तुमच्यासारखे केंद्रिय मंत्री झालो नाहीत. भाजप केंद्रीय यंत्रणांचा दुरुपयोग करत आहे. त्यामुळेच ज्यांच्यात हिंमत नाही ते पक्ष सोडून भाजपमध्ये जात आहेत. भाजप बेजबाबदारपणे कृत्य करत आहे, अशी टीका नवाब मलिक यांनी केली.

नोटीस येणार हे अपेक्षितच होतं

परिवहन मंत्री अनिल परब यांना ईडीची नोटीस आली आहे. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. ईडीची नोटीस येणं हे अपेक्षितच होतं. राणेंना अटक झाल्यानंतर तर ते अपेक्षितच होतं. परब यांना ईडीच्या माध्यमातून त्रास दिला जाईल. सूडबुद्धीने हे राजकारण सुरू आहे. याबाबत आता लोकांच्या मनात कसलीच शंका उरली नाही, असं त्यांनी सांगितलं.

भाजप जनतेला धोका देतेय

यावेळी त्यांनी भाजपच्या मंदिर उघडण्याच्या आंदोलनावरही टीका केली. कोविडचा धोका आहे हे जनतेला कळत आहे. मोदी साहेब स्वत: सांगत आहेत तरी हे लोक ऐकत नाहीत. भाजप जनतेला धोका देत आहे. लोकांची दिशाभूल करत आहे, असा आरोपही त्यांनी केला.

आम्ही पंतप्रधान, गृहमंत्र्यांना धमक्या देणार नाही

दरम्यान, शिवसेना नेते संजय राऊत यांनीही परब यांना आलेल्या नोटिशीवरून भाजपवर जोरदार टीका केली. भाजपच्या नेत्यांना या या दिवशी अनिल परबांना चौकशीला बोलवणार हे कसं कळतं? किरीट सोमय्या, चंद्रकांत पाटील यांना कळतं… अजून दहा लोकांना महितीय… काय चाललंय? नोटिसा पाठवा, प्रेम पत्र आहेतही. राजकारणात काम करणाऱ्या माणसाला पाठवलेली. आम्ही त्यांना उत्तर देऊ.. आमच्यावर कायदेशीर कारवाई होतेय म्हणून आम्ही पंतप्रधानांना, गृहमंत्र्यांना धमक्या वगैरे देणार नाही. आम्ही या प्रक्रियेला पूर्ण सामोरं जाऊ, अनिल परब उत्तर देण्यास समर्थ आहेत, असं राऊत म्हणाले.

डोमकावळ्यांचा फायदा होणार नाही

माझ्या माहितीप्रमाणे आमच्या घरीही अशा नोटीस आल्या. परब रत्नागिरीचे पालकमंत्री आहेत. ते मंत्री आहेत त्यापेक्षा ते शिवसैनिक आहेत. शिवसेना कमजोर होईल, सरकारला तडे जातील आणि टपून बसलेल्या डोमकावळ्यांचा फायदा होईल असं होणार नाही. असे घाव आम्ही पचवले आहेत. आमची चिंता, अनिल परबांची चिंता अजिबात करू नका, असं सांगतानाच केंद्रीय मंत्र्यांवर कायदेशीर कारवाई झाली. या देशात कोणावरही होऊ शकते. जर एखादी जबाबदार व्यक्ती कायद्याचं पालन न करता बेफाम वागली तर कायदेशीर कारवाई होईल. माझ्यावरही होऊ शकते. कायद्याचं उल्लंघन केल्यावर आरती करायची का? असं नाही होतं. विशेषत: जबाबदार पदावर असणाऱ्या व्यक्तींनी विशेष जबाबदारीने वागलं पाहिजे, असे टोलेही त्यांनी लगावले. (ncp leader nawab malik slams narayan rane over arrest drama)

संबंधित बातम्या:

अनिल परबच काय, अनिल देशमुखही मुख्यमंत्र्यांच्या जवळचे होते, कितीही नोटिसा पाठवा : संजय राऊत

काही धागेदोरे हाती लागले असतील म्हणूनच ईडीने नोटीस बजावली असेल; प्रविण दरेकरांचं सूचक विधान

काँग्रेसनंतर आता राष्ट्रावादीचाही कोल्हापुरात स्वबळाचा नारा, स्थानिक स्वराज्यसंस्थांसह 10 विधानसभा लक्ष्य

(ncp leader nawab malik slams narayan rane over arrest drama)

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.